Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आमदार अमोल खताळ यांनी वेधले ऊर्जा राज्यमंत्र्यांचे लक्ष; मेंढवन उपकेंद्राचे काम तातडीने सुरू करण्याची मागणी

10/10/2026

शनिवार १० ऑक्टोंबर — जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा असेल

10/10/2026

३९ ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त, तरी आरोपीला जामीन! संगमनेर न्यायालयाच्या आदेशात नेमके काय?

09/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » लाचेच्या गुन्ह्यात आरोपी असलेल्या पत्रकार रमजान शेखला अतिरिक्त सत्र न्यायालयाने…
न्यायालय

लाचेच्या गुन्ह्यात आरोपी असलेल्या पत्रकार रमजान शेखला अतिरिक्त सत्र न्यायालयाने…

अर्जदार शेख याच्या वकिलांनी युक्तिवाद केला की, गुन्ह्यात जास्तीत जास्त सात वर्षं शिक्षेची तरतूद आहे, अर्जदार सरकारी कर्मचारी नाही आणि तपास पूर्ण झाला आहे, त्यामुळे त्यांना जामीन मिळावा.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar24/04/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज – संगमनेर

गुरुवार, दि. २४ एप्रिल – लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यांतर्गत संगमनेर तालुक्यातील घारगाव पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील आरोपी असलेल्या पत्रकार रमजान नजीर शेख याला अतिरिक्त सत्र न्यायालयाने गुरुवारी जामीन मंजूर केला आहे.

या प्रकरणातील फिर्यादी यांच्याकडे खडी वाहतूक करणारे चार ट्रक आहेत. २० मार्च २०२५ रोजी तलाठी अक्षय ढोकळे यांनी दोन ट्रकवर खोटी कारवाई करून प्रत्येकी एक लाख तेवीस हजार रुपये दंड आकारला होता. अर्जदार रमजान शेख हे मांडवे गावात पत्रकार म्हणून काम करतात. त्यांनी फिर्यादीला तलाठी अक्षय ढोकळे यांच्याशी भेट करून देण्याची मध्यस्थी केली, जेणेकरून ‘सेटलमेंट’ करता येईल. मात्र, तलाठी लाच मागणार, या विचाराने फिर्यादीने लाच प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली.

फिर्यादीने तलाठी अक्षय ढोकळे यांना खडी वाहतूक सुरळीत चालू ठेवण्यासाठी विनंती केली, तेव्हा ढोकळे यांनी दरमहा ४० हजार रुपये लाच मागितली. मात्र कोणते कारवाई न करण्यासाठी फिर्यादीने पन्नास हजार रुपये देण्याचे मान्य केले. नंतर, १६ एप्रिल २०२५ रोजी लाच प्रतिबंधक विभागाने सापळा रचला आणि रमजान शेख यांनी तलाठी अक्षय ढोकळे यांच्यासाठी फिर्यादीकडून ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना त्यांना रंगेहात पकडले. पत्रकार शेख आठवडाभरापासून तुरुंगात आहे.

अर्जदार शेख याच्या वकिलांनी युक्तिवाद केला की, गुन्ह्यात जास्तीत जास्त सात वर्षं शिक्षेची तरतूद आहे, अर्जदार सरकारी कर्मचारी नाही आणि तपास पूर्ण झाला आहे, त्यामुळे त्यांना जामीन मिळावा. तर, सरकारी वकिलांनी जामीनाला विरोध केला. अतिरिक्त सत्र न्यायाधीश योगेश मनाठकर दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून आणि आरोपांची गंभीरता लक्षात घेऊन २५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर पत्रकार रमजान नजीर शेख याला जामीन मंजूर केला.

लाचखोरीचा प्रकार उघडकीस आल्यानंतर गेल्या आठवड्यापासून महसूल आणि माध्यमांमध्ये हा चर्चेचा विषय ठरला होता.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,179
अतिरिक्त व जिल्हा सत्र न्यायालय नियमित जामीन रमजान शेख
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

३९ ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त, तरी आरोपीला जामीन! संगमनेर न्यायालयाच्या आदेशात नेमके काय?

09/10/2026

सायखिंडी फाटा गांजा तस्करीत आरोपींना पुन्हा १२ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कस्टडी; बँक खात्यांचे आर्थिक व्यवहार पोलिसांच्या रडारवर

09/10/2026

झाडपाल्याचे औषध देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीस मिठी मारली, संगमनेरच्या जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपीला दिली शिक्षा; काय आहे प्रकार….

09/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

आमदार अमोल खताळ यांनी वेधले ऊर्जा राज्यमंत्र्यांचे लक्ष; मेंढवन उपकेंद्राचे काम तातडीने सुरू करण्याची मागणी

By Annant Ppangarkar10/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- मतदारसंघातील वीजपुरवठ्याशी संबंधित गंभीर समस्या तातडीने सोडवण्यासाठी आमदार अमोल खताळ पाटील…

शनिवार १० ऑक्टोंबर — जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा असेल

10/10/2026

३९ ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त, तरी आरोपीला जामीन! संगमनेर न्यायालयाच्या आदेशात नेमके काय?

09/10/2026

सायखिंडी फाटा गांजा तस्करीत आरोपींना पुन्हा १२ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कस्टडी; बँक खात्यांचे आर्थिक व्यवहार पोलिसांच्या रडारवर

09/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.