Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

घारगाव बहुचर्चित खून प्रकरणात मोठा ट्विस्ट! मुख्य आरोपीच्या जामीन अर्जावर न्यायालयाचा निर्णय… न्यायालयीन युक्तिवादात काय घडले वाचा सविस्तर

16/10/2026

शुक्रवार १६ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या

16/10/2026

कर्ज वसुलीच्या नावाखाली संगमनेरात महिलेचा विनयभंग; आरोपीवर गुन्हा दाखल

15/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचा दबदबा! जिल्ह्यात अव्वल, नाशिक विभागात द्वितीय क्रमांक!
यश / निवड / पुरस्कार

संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचा दबदबा! जिल्ह्यात अव्वल, नाशिक विभागात द्वितीय क्रमांक!

विशेष म्हणजे, यावर्षी सलग दुसऱ्यांदा संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीने जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवून आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar25/04/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज – संगमनेर 

राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीने मानाचा तुरा रोवला आहे. महाराष्ट्र शासनाच्या पणन विभागाने जाहीर केलेल्या स्मार्ट प्रकल्पांतर्गत गुणवत्तेच्या क्रमवारीत संगमनेर बाजार समितीने अहिल्यानगर जिल्ह्यात प्रथम, तर संपूर्ण नाशिक विभागात द्वितीय क्रमांक पटकावला आहे, अशी माहिती सभापती शंकरराव खेमनर आणि सचिव सतीश गुंजाळ यांनी दिली.

महाराष्ट्र सरकारच्या पणन विभागाने बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्पांतर्गत राज्यातील तब्बल ३०५ बाजार समित्यांची वार्षिक क्रमवारी नुकतीच जाहीर केली. यासाठी निबंधक आणि सहाय्यक निबंधक यांनी कसून तपासणी करून विविध निकषांनुसार मूल्यांकन केले होते. या मूल्यांकनात २०२३-२४ या वर्षासाठी संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीने उत्कृष्ट कामगिरी करत अहिल्यानगर जिल्ह्यात पहिला क्रमांक मिळवला, तर नाशिक विभागातील सर्व बाजार समित्यांमध्ये दुसरा क्रमांक प्राप्त केला आहे.

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या दूरदृष्टी नेतृत्वाखाली संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीने शेतकरी आणि व्यापारी बांधवांना अत्याधुनिक सोयीसुविधा पुरवण्यावर भर दिला आहे. संगणकीय कामकाज, उपबाजार समित्यांचे प्रभावी व्यवस्थापन, उत्कृष्ट स्वच्छता आणि कामकाजातील विश्वासार्हता यांसारख्या महत्त्वाच्या निकषांवर संगमनेर बाजार समिती नेहमीच अग्रेसर राहिली आहे. विशेष म्हणजे, यावर्षी सलग दुसऱ्यांदा संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीने जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवून आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे.

या उल्लेखनीय कामगिरीमध्ये बाजार समितीचे सभापती शंकरराव खेमनर, उपसभापती गीताराम गायकवाड, संचालक कैलास पानसरे, सुरेश कान्होरे, सतीश खताळ, मनीष गोपाळे, अरुण वाघ, विजय सातपुते, सुधाकर ताजणे, सखाराम शेरमाळे, अनिल घुगे, निलेश कडलग, संजय खरात, मनसुख भंडारी, निसार शेख, सचिन करपे, दिपाली वर्पे, रुक्मिणी साकुरे आणि सचिव सतीश गुंजाळ यांच्यासह सर्व संचालक मंडळाने सातत्याने परिश्रम घेतले आहेत.

संगमनेर बाजार समितीच्या या यशाबद्दल माजीमंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, दुर्गाताई तांबे, रणजितसिंह देशमुख, डॉ. जयश्री थोरात यांच्यासह अनेक मान्यवर आणि पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 856
पुरस्कार संगमनेर बाजार समिती
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेर येथे ३० ऑगस्टला ‘लोकनेते बाळासाहेब थोरात गुणगौरव पुरस्कार’ सोहळा; विविध क्षेत्रांतील मान्यवरांसह २० शिक्षकांचा होणार सन्मान

23/08/2026

प्रवीण बागडे यांना ‘लोकशाहीर अण्णाभाऊ साठे साहित्यरत्न’ राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर

18/08/2026

संगमनेर तालुका व शहर काँग्रेसच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर; अजय फटांगरे, सोमेश्वर दिवटे आणि अमोल शेलकर यांच्यावर मोठी जबाबदारी

18/07/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
न्यायालय

घारगाव बहुचर्चित खून प्रकरणात मोठा ट्विस्ट! मुख्य आरोपीच्या जामीन अर्जावर न्यायालयाचा निर्णय… न्यायालयीन युक्तिवादात काय घडले वाचा सविस्तर

By Annant Ppangarkar16/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर तालुक्यातील घारगाव परिसरातील बहुचर्चित खून प्रकरणात मुख्य आरोपी प्रकाश जाधव…

शुक्रवार १६ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या

16/10/2026

कर्ज वसुलीच्या नावाखाली संगमनेरात महिलेचा विनयभंग; आरोपीवर गुन्हा दाखल

15/10/2026

‘ब्रिक्स’ आंतरराष्ट्रीय महोत्सवात संगमनेरी योगवैभव! अहमदाबादेत ध्रुव ग्लोबलच्या १० खेळाडूंनी घडवले योगपरंपरेचे दर्शन

15/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.