Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

भंडारदरा धरणातून खरीप पिकांसाठी सोमवारपासून पाणी सुटणार; गणेशोत्सवात दिलासा : आमदार खताळ

13/09/2026

माजी मंत्री थोरात आणि डॉ. तांबे यांनी घेतली पद्मभूषण अण्णा हजारे यांची भेट; प्रकृतीची केली चौकशी

13/09/2026

गणेश मूर्ती आगमन मिरवणुकीत कर्णकर्कश साऊंड सिस्टीम वाजवल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल; सिस्टीम जप्त करून १५ हजारांचा दंड

13/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » आदेशानंतरही गुन्हा दाखल न केल्याने उच्च न्यायालय पोलिसांवर संतापले, अवमान कारवाईचा इशारा
न्यायालय

आदेशानंतरही गुन्हा दाखल न केल्याने उच्च न्यायालय पोलिसांवर संतापले, अवमान कारवाईचा इशारा

7 एप्रिल रोजी मुंबई उच्च न्यायालयाने बदलापूर पोलीस एन्काऊंटर प्रकरणात सहभागी असलेल्या 5 पोलिसांविरुद्ध एफआयआर नोंदवण्याचे कठोर आदेश दिले होते. न्यायालयाने मुंबईचे सहपोलीस आयुक्त लखमी गौतम यांच्या नेतृत्वाखाली एसआयटीची स्थापना केली होती.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar26/04/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज – मुंबई

बदलापूरमधील एका खासगी शाळेतील दोन अल्पवयीन मुलींवरील लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याच्या कोठडी मृत्यूप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. न्यायालयाने या प्रकरणात स्पष्ट आदेश देऊनही संबंधित 5 पोलिसांविरुद्ध अद्याप गुन्हा दाखल न केल्याने न्यायालयाने शुक्रवारी (25 एप्रिल) पोलिसांना फटकारले.

न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि न्यायमूर्ती नीला गोखले यांच्या खंडपीठासमोर बदलापूर एन्काऊंटर प्रकरणाची सुनावणी झाली. या वेळी न्यायालयाने पोलिसांना आदेश देऊनही पाच पोलिसांविरुद्ध एफआयआर नोंदवण्यात आलेल्या दिरंगाईवर गंभीर चिंता व्यक्त केली.

इतकेच नव्हे, तर या प्रकरणाशी संबंधित कागदपत्रे विशेष तपास पथकाकडे (एसआयटी) हस्तांतरित करण्याचे आदेश न्यायालयाने 7 एप्रिल रोजी दिले होते. या आदेशाचेही पालन न झाल्याने आश्चर्य व्यक्त करत, हे न्यायालयाच्या आदेशांचे सरळ उल्लंघन असल्याचे खंडपीठाने म्हटले.

उच्च न्यायालयाने राज्य सरकारला धारेवर धरत विचारले की, न्यायालयाच्या आदेशांचे पालन सरकार का करत नाही? न्यायालयाने स्पष्ट शब्दांत सांगितले की, जर आजच प्रकरणाची कागदपत्रे एसआयटीकडे सोपवण्यात आली नाहीत, तर पोलिसांविरुद्ध फौजदारी अवमान कारवाई सुरू केली जाईल.

या पार्श्वभूमीवर, 7 एप्रिल रोजी मुंबई उच्च न्यायालयाने बदलापूर पोलीस एन्काऊंटर प्रकरणात सहभागी असलेल्या 5 पोलिसांविरुद्ध एफआयआर नोंदवण्याचे कठोर आदेश दिले होते. न्यायालयाने मुंबईचे सहपोलीस आयुक्त लखमी गौतम यांच्या नेतृत्वाखाली एसआयटीची स्थापना केली होती. तसेच, गुन्हे अन्वेषण विभागाला (सीआयडी) दोन दिवसांच्या आत सर्व आवश्यक कागदपत्रे एसआयटीकडे सुपूर्द करण्याचे निर्देश देण्यात आले होते. मात्र, राज्य सरकारकडून अद्याप यापैकी एकाही आदेशाची अंमलबजावणी झालेली नाही.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,002
अक्षय शिंदे एन्काऊंटर बदलापूर मुंबई उच्च न्यायालय
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

फायनान्सचा चेक बाऊन्स: अकोले तालुक्यातील कर्जदाराला ६ महिने कारावास आणि दुप्पट दंडाची शिक्षा

04/09/2026

संगमनेर सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल: प्राणघातक हल्ल्याप्रकरणी तिघा आरोपींची २ वर्षांची सक्तमजुरी कायम

02/09/2026

दारूच्या नशेत झालेल्या वादातून मारहाण करून हत्या करणाऱ्या आरोपीस जन्मठेप; संगमनेर न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

01/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
पाण्याचे राजकारण

भंडारदरा धरणातून खरीप पिकांसाठी सोमवारपासून पाणी सुटणार; गणेशोत्सवात दिलासा : आमदार खताळ

By Annant Ppangarkar13/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- कमी पावसामुळे संकटात सापडलेली खरीप पिके आणि आगामी गणेशोत्सवाची…

माजी मंत्री थोरात आणि डॉ. तांबे यांनी घेतली पद्मभूषण अण्णा हजारे यांची भेट; प्रकृतीची केली चौकशी

13/09/2026

गणेश मूर्ती आगमन मिरवणुकीत कर्णकर्कश साऊंड सिस्टीम वाजवल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल; सिस्टीम जप्त करून १५ हजारांचा दंड

13/09/2026

रविवार विशेष लेख — अमृता वहिनींची मात्रा कारणी लागो!

13/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.