Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

“गंभीर दुष्काळाने साखर कारखानदारी अडचणीत; सरकारने तातडीने मदत करावी” – बाळासाहेब थोरात यांची जोरदार मागणी

14/10/2026

‘ये पब्लिक है, सब जानती है!’ — निळवंडेच्या पाण्याचे श्रेय लाटणाऱ्याना संगमनेरची जनता निवडणुकीत देणार सडेतोड उत्तर; अमोल शेलकर यांचा घणाघात

14/10/2026

सरकारी जमिनीवर अतिक्रमण! प्रशासनाचा डोळेझाक कारभार; अधिकाऱ्यांना सरकारी मालमत्ता सांभाळता येईना

14/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » माजी मंत्री बाळासाहेब थोरातांच्या नेतृत्वाखाली संगमनेर साखर कारखाना निवडणूक बिनविरोध! नूतन संचालकात यांची लागली वर्णी
निवडणूक

माजी मंत्री बाळासाहेब थोरातांच्या नेतृत्वाखाली संगमनेर साखर कारखाना निवडणूक बिनविरोध! नूतन संचालकात यांची लागली वर्णी

शेतकरी विकास मंडळाच्या सर्व जागा बिनविरोध झाल्याने विरोधकांनीही 'एक तालुका, एक परिवार' या भावनेचा आदर करत माघार घेतली, ही बाब कौतुकास्पद आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar29/04/2025Updated:29/04/2025No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज – संगमनेर
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या कणखर नेतृत्वाखाली सहकार क्षेत्रातील दीपस्तंभ असलेल्या सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याची आगामी पंचवार्षिक निवडणूक (२०२५-२०३०) अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पुन्हा एकदा बिनविरोध पार पडली आहे. या बिनविरोध निवडीमुळे सहकार क्षेत्रात विश्वासाचे वातावरण निर्माण करणाऱ्या तालुक्यात एकी आणि विश्वासावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे.
राज्याच्या सहकार चळवळीत संगमनेर नेहमीच अग्रेसर राहिले आहे. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या विचारांचा वारसा जपत या कारखान्याने ग्रामीण आणि शहरी भागाच्या विकासात मोलाची भूमिका बजावली आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचा पराभव झाल्याने कारखाना निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र, तालुक्यातील सभासद, सामान्य नागरिक आणि जनतेने पुन्हा एकदा बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वावर दृढ विश्वास व्यक्त केला. त्यांच्या मार्गदर्शनाखालील शेतकरी विकास मंडळाच्या सर्व जागा बिनविरोध झाल्याने विरोधकांनीही ‘एक तालुका, एक परिवार’ या भावनेचा आदर करत माघार घेतली, ही बाब कौतुकास्पद ठरली आहे.
या निवडणुकीसाठी तालुक्यातील तब्बल १३३ इच्छुक उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. परंतु, थोरात यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आणि कारखान्याच्या हिताला प्राधान्य देत, सर्वांनी माघार घेतली. सोसायटी मतदारसंघातून खुद्द माजी मंत्री बाळासाहेब भाऊसाहेब थोरात यांची बिनविरोध निवड झाली आहे.
इतर बिनविरोध निवड झालेले संचालक पुढीलप्रमाणे:
साकुर गट– खेमनर इंद्रजीत अशोकराव, वर्पे सतीश चंद्रभान, धुळगंड रामदास लक्ष्मण
जोर्वे गट- थोरात इंद्रजीत पंडितराव, डॉ. दिघे तुषार दिनकर, शिंदे विलास गंगाधर
तळेगाव गट- गोडगे संपतराव श्रीरंगराव, कुटे रामनाथ बाळाजी, आरगडे नवनाथ धोंडीबा
धांदरफळ गट- घुले पांडुरंग दामोदर, राहणे विजय रामनाथ, हासे विनोद गणपत
अकोले जवळे गट- देशमुख गुलाब सयाजी, हासे संतोष रखमा, वाकचौरे अरुण सोन्याबापू
अनुसूचित जाती जमाती मतदार संघ- भालेराव योगेश निवृत्ती
महिला राखीव मतदार संघ- गायकर लता बाबासाहेब आणि डूबे सुंदरबाई रावसाहेब
भटक्या विमुक्त जाती जमाती मतदार संघ- नागरे दिलीप श्रीहरी
इतर मागासवर्गीय मतदार संघ- ताजने अंकुश बाळासाहेब.
या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेत निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून संगमनेरचे प्रांत अधिकारी शैलेश हिंगे यांनी यशस्वीरित्या कामकाज पाहिले. या ऐतिहासिक बिनविरोध निवडीनंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, बाजीराव खेमनर, ॲड. माधवराव कानवडे, सौ. दुर्गाताई तांबे, कारखान्याचे विद्यमान चेअरमन बाबासाहेब ओहोळ, रणजीतसिंह देशमुख, डॉ. जयश्रीताई थोरात, सुधाकर जोशी, संपतराव डोंगरे, इंद्रजीत भाऊ थोरात, शंकरराव खेमनर, रामहरी कातोरे, हौशीराम सोनवणे, अर्चनाताई बालोडे, प्रमिला अभंग, निखिल पापडेजा, कारखान्याचे कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांच्यासह अनेक मान्यवर आणि पदाधिकाऱ्यांनी नवनिर्वाचित संचालक मंडळाचे अभिनंदन केले आहे.

“सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना हा केवळ एक कारखाना नसून तो आपल्या तालुक्याचे हृदय आहे. या कारखान्यावर सभासद, शेतकरी आणि नागरिकांचा अतूट विश्वास आहे. संचालकपदासाठी अनेक सक्षम कार्यकर्ते इच्छुक होते, आणि ते सर्वच तोलामोलाचे आहेत. मात्र, कारखान्याचे हित आणि तालुक्याची प्रगती याला सर्वोच्च प्राधान्य देत ज्या कार्यकर्त्यांनी आणि सभासदांनी माघार घेतली, त्यांचे मी मनःपूर्वक अभिनंदन करतो. त्यांनी चांगल्या राजकीय परंपरेचा आदर्श घालून दिला आहे. यापुढेही याच एकजुटीने आणि समृद्ध विचारांनी आपण सर्वजण एकत्र काम करू, असा मला विश्वास आहे.” – बाळासाहेब थोरात, माजी मंत्री.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 3,656
थोरात कारखाना निवडणूक बाळासाहेब थोरात बिनविरोध निवडणूक
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

“गंभीर दुष्काळाने साखर कारखानदारी अडचणीत; सरकारने तातडीने मदत करावी” – बाळासाहेब थोरात यांची जोरदार मागणी

14/10/2026

‘ये पब्लिक है, सब जानती है!’ — निळवंडेच्या पाण्याचे श्रेय लाटणाऱ्याना संगमनेरची जनता निवडणुकीत देणार सडेतोड उत्तर; अमोल शेलकर यांचा घणाघात

14/10/2026

थोरात सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा उद्या शुभारंभ; जाणून घ्या कितवा आहे हा हंगाम!

13/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
शेती व सहकार

“गंभीर दुष्काळाने साखर कारखानदारी अडचणीत; सरकारने तातडीने मदत करावी” – बाळासाहेब थोरात यांची जोरदार मागणी

By Annant Ppangarkar14/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- राज्यात यावर्षी दुष्काळाची परिस्थिती अत्यंत गंभीर बनली असून, ग्रामीण भागातील अर्थकारणाचा…

‘ये पब्लिक है, सब जानती है!’ — निळवंडेच्या पाण्याचे श्रेय लाटणाऱ्याना संगमनेरची जनता निवडणुकीत देणार सडेतोड उत्तर; अमोल शेलकर यांचा घणाघात

14/10/2026

सरकारी जमिनीवर अतिक्रमण! प्रशासनाचा डोळेझाक कारभार; अधिकाऱ्यांना सरकारी मालमत्ता सांभाळता येईना

14/10/2026

मतचोरी अन् ‘SIR’च्या घोटाळ्याविरोधात संगमनेरमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसह समविचारी पक्षांचा घणाघात; माजी खासदार खैरे, जिल्हाप्रमुख कोते पाटलांच्या नेतृत्वात रस्ता रोको करत निवडणूक आयोगाचा तीव्र निषेध

14/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.