Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

अवैध गांजा विक्रीचा प्रयत्न संगमनेर शहर पोलिसांकडून उधळला; २.३४ लाखांच्या मुद्देमालासह तिघे अटकेत

August 2, 2026

रविवार विशेष लेख – भगव्या देशा.. अनपढ देशा.. मोदींच्या देशा…

August 2, 2026

रविवार, ०२ ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

August 2, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » सामाजिक न्यायाच्या दिशेने मोठे पाऊल: केंद्र सरकारच्या जातिनिहाय जनगणनेचे आ. खताळ यांनी केले स्वागत
राजकारण

सामाजिक न्यायाच्या दिशेने मोठे पाऊल: केंद्र सरकारच्या जातिनिहाय जनगणनेचे आ. खताळ यांनी केले स्वागत

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारचा हा निर्णय केवळ राजकीय नसून, सामाजिक परिवर्तनाच्या दिशेने उचललेले एक ऐतिहासिक पाऊल आहे.
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरMay 2, 2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर – प्रतिनिधी 

केंद्र सरकारने घेतलेल्या जातिनिहाय जनगणनेच्या ऐतिहासिक निर्णयाचे आमदार अमोल खताळ यांनी स्वागत केले आहे.

या संदर्भात बोलताना आमदार खताळ म्हणाले, “जातनिहाय जनगणना हा मुद्दा काँग्रेसच्या जाहीरनाम्यात अनेक वर्षांपासून होता. मात्र, त्यांचे सरकार सत्तेवर असताना गेल्या ६५ वर्षांत त्यांनी या महत्त्वपूर्ण विषयाकडे दुर्लक्ष केले. त्यांच्या या भूमिकेमुळे समाजात अनेक जाती-जमातींमध्ये गैरसमज आणि संघर्ष निर्माण झाले. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने हा ऐतिहासिक निर्णय घेतला असून, यामुळे समाजातील प्रत्येक घटकाला न्याय मिळेल.”

काँग्रेसच्या धोरणांमुळे अनेक जातींमध्ये भेदभाव वाढला आणि अनेक प्रश्न प्रलंबित राहिले. आता या जनगणनेमुळे आरक्षणासारख्या अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर योग्य तोडगा निघेल. या जनगणनेमुळे सामाजिक परिस्थितीची अचूक नोंद होईल. कोणत्या जातीची लोकसंख्या किती आहे, त्यांची शैक्षणिक आणि आर्थिक स्थिती काय आहे आणि प्रशासनात त्यांचा सहभाग किती आहे, याची माहिती सहज उपलब्ध होईल. त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारला विविध सामाजिक गटांच्या गरजा ओळखून अधिक प्रभावी आणि पारदर्शक योजना राबविणे शक्य होईल.

“संविधानाने दिलेल्या समान संधीच्या अधिकारांना प्रत्यक्षात आणण्यासाठी ही जनगणना एक महत्त्वाचा आधारस्तंभ ठरेल,” जातिनिहाय जनगणनेमुळे लोकसंख्येच्या प्रमाणात योग्य राजकीय आणि सामाजिक प्रतिनिधित्व सुनिश्चित करता येईल. तसेच, विविध जातींच्या न्याय्य मागण्यांना बळ मिळेल.

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारचा हा निर्णय केवळ राजकीय नसून, सामाजिक परिवर्तनाच्या दिशेने उचललेले एक ऐतिहासिक पाऊल आहे. ‘सबका साथ, सबका विकास’ या संकल्पनेला मूर्त रूप देणारा हा निर्णय निश्चितच देशाच्या सामाजिक विकासाचा चेहरा बदलणारा ठरेल, असे खताळ यांनी म्हटलं आहे.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 702
अमोल खताळ जातीनिहाय जनगणना
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांना सर्वोच्च न्यायालयाचा मोठा धक्का; आमदारकी टांगणीला

July 30, 2026

धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याने केंद्रातील गर्विष्ठ सरकारला तरुणाईने नमवले; डॉ. जयश्रीताई थोरात यांचा घणाघात, संगमनेर बस स्थानकावर काँग्रेस आणि पुरोगामी संघटनांचा फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष

July 25, 2026

महाविकास आघाडी आक्रमक; NEET पेपरफुटी प्रकरणी विद्यार्थ्यांना झालेल्या लाठीमाराविरोधात शुक्रवारी राज्यभर निदर्शने

July 22, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

अवैध गांजा विक्रीचा प्रयत्न संगमनेर शहर पोलिसांकडून उधळला; २.३४ लाखांच्या मुद्देमालासह तिघे अटकेत

By अनंत पांगारकरAugust 2, 20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन  संगमनेर: संगमनेर शहरात अवैध गांजाची विक्री करण्याच्या उद्देशाने तो जवळ बाळगणाऱ्या…

रविवार विशेष लेख – भगव्या देशा.. अनपढ देशा.. मोदींच्या देशा…

August 2, 2026

रविवार, ०२ ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

August 2, 2026

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे संगमनेर शहरात अद्यावत स्मारक उभारणार : माजी आमदार डॉ. सुधीर तांबे

August 1, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.