Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

रविवार विशेष — पुणे–नाशिक रेल्वे : २५ दिवस संपले, आता प्रश्न फक्त कमिटीचा नाही… सरकारच्या इच्छाशक्तीचा आहे! एक संगमनेरकर म्हणून काही थेट प्रश्न…

30/08/2026

रविवार विशेष लेख: बेसुमार कर्जमाफीची बेशर्मी

30/08/2026

आज रविवार, ३० ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

30/08/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » सावधान! अहिल्यानगर जिल्ह्याच्या काही भागात तीन दिवस पावसाचा ‘यलो अलर्ट’; प्रशासनाचे नागरिकांना सतर्कतेचे आवाहन!
प्रशासन

सावधान! अहिल्यानगर जिल्ह्याच्या काही भागात तीन दिवस पावसाचा ‘यलो अलर्ट’; प्रशासनाचे नागरिकांना सतर्कतेचे आवाहन!

आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी जवळच्या तहसील कार्यालयाशी, पोलीस स्टेशनशी किंवा जिल्हा नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, अहमदनगर येथे १०७७ (टोल फ्री) किंवा ०२४१- २३२३८४४ / २३५६९४० या क्रमांकावर संपर्क साधावा
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar03/05/2025Updated:03/05/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज – अहिल्यानगर

अहिल्यानगर जिल्ह्यातील नागरिकांसाठी हवामान खात्याने एक महत्त्वपूर्ण अलर्ट दिला आहे. येत्या ३ ते ६ मे २०२५ या कालावधीत जिल्ह्याच्या काही भागात वीजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने ‘यलो अलर्ट’ जारी करत नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार, येत्या ३ ते ६ मे २०२५ हे तीन दिवस जिल्ह्यात मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.

प्रशासनाचे महत्वाचे सूचना आणि मार्गदर्शन:

 * मेघगर्जना होत असताना, विजा चमकत असताना किंवा जोरदार वारे वाहत असताना झाडाखाली किंवा झाडांजवळ उभे राहू नका. सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्या.

 * गडगडाटी वादळात आणि वीज चमकत असताना कोणत्याही विद्युत उपकरणांचा वापर टाळा.

 * वीजेच्या सुवाहक भागांपासून दूर राहा. ट्रॅक्टर, शेती अवजारे, मोटारसायकल किंवा सायकल यांपासून दूर राहा.

 * मोकळी मैदाने, झाडांखाली, टॉवर्स, ध्वजांचे खांब, विजेचे खांब, धातूचे कुंपण, विद्युतवाहिन्या किंवा ट्रान्सफॉर्मरजवळ थांबू नका.

 * अधोरेखित किंवा लोंबकळणाऱ्या केबल्सपासून दूर राहा.

 * जाहिरात फलक कोसळून अपघात होण्याची शक्यता असल्याने त्यांच्या आसपास थांबू नका आणि योग्य ती दक्षता घ्या.

 * वीज चमकत असताना मोकळ्या जागेत असल्यास, जमिनीशी कमीतकमी संपर्क साधण्यासाठी गुडघ्यांवर बसा आणि दोन्ही हातांनी कान झाकून डोके गुडघ्यांमध्ये झाका.

 * धरण आणि नदी क्षेत्रात पर्यटनासाठी जाणाऱ्या नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी. पाण्याच्या प्रवाहात उतरू नये आणि धोकादायक ठिकाणी सेल्फी काढू नये.

 * वादळी वारा, पाऊस आणि गारपीट यामुळे शेतीमालाचे नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी वेळीच नियोजन करावे.

 * शेतकऱ्यांनी आपला शेतमाल सुरक्षित ठिकाणी साठवावा. बाजार समितीमध्ये विक्रीसाठी आणलेला माल सुरक्षित ठेवावा.

 * जनावरांना सुरक्षित ठिकाणी हलवावे आणि त्यांचे संरक्षण करावे.

आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी जवळच्या तहसील कार्यालयाशी, पोलीस स्टेशनशी किंवा जिल्हा नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, अहमदनगर येथे १०७७ (टोल फ्री) किंवा ०२४१- २३२३८४४ / २३५६९४० या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. नागरिकांनी सतर्क राहून प्रशासनाला सहकार्य करावे, असेही सांगण्यात आले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,329
इशारा पाऊस हवामान खाते
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

उसनवारीवरील कर्मचाऱ्यांना १० सप्टेंबरपर्यंत मूळ विभागात पाठवा; मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर मुख्य सचिवांचे कडक आदेश

25/08/2026

राज्यात खळबळ..! तहसीलदार निलंबित; ‘ते’ प्रकरण भोवलं

14/08/2026

स्वातंत्र्यदिनी भंडारदरा, कळसूबाई फिरण्याचा प्लॅन आहे? आधी पोलिसांचे ‘हे’ नवीन वाहतूक नियम नक्की वाचा!

12/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
महाराष्ट्र संवाद विशेष

रविवार विशेष — पुणे–नाशिक रेल्वे : २५ दिवस संपले, आता प्रश्न फक्त कमिटीचा नाही… सरकारच्या इच्छाशक्तीचा आहे! एक संगमनेरकर म्हणून काही थेट प्रश्न…

By Annant Ppangarkar30/08/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन अमोल शेलकर- पुणे–नाशिक रेल्वे हा संगमनेरच्या विकासासाठी केवळ रेल्वेचा…

रविवार विशेष लेख: बेसुमार कर्जमाफीची बेशर्मी

30/08/2026

आज रविवार, ३० ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

30/08/2026

बिबट्याच्या भीतीने शेततळ्यात पडून ११ वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू; जवळे कडलगमध्ये तीव्र संताप, माजी मंत्री बाळासाहेब थोरातांनी दुःख व्यक्त करत आर्थिक मदतीची केली मागणी

29/08/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.