Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

MPSC आंदोलनाला डॉ. जयश्रीताई थोरात यांचा पाठिंबा; समाज आणि आयोगातील ब्लड कॅन्सर ठीक करायचाय!

10/10/2026

आमदार अमोल खताळ यांनी वेधले ऊर्जा राज्यमंत्र्यांचे लक्ष; मेंढवन उपकेंद्राचे काम तातडीने सुरू करण्याची मागणी

10/10/2026

शनिवार १० ऑक्टोंबर — जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा असेल

10/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » प्रतीक्षा संपली! बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; ‘या’ वेबसाईटवर पाहा निकाल
शिक्षण

प्रतीक्षा संपली! बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; ‘या’ वेबसाईटवर पाहा निकाल

विद्यार्थ्यांना मोबाईलवर SMS द्वारे देखील निकाल पाहता येणार आहे. यासाठी त्यांनी आपल्या मोबाईलच्या मेसेज बॉक्समध्ये MHSSC टाइप करून 57766 या क्रमांकावर पाठवावा
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar04/05/2025Updated:04/05/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज – 

उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (HSC) म्हणजेच इयत्ता बारावी परीक्षेचा निकाल उद्या, (सोमवार ५ मे) जाहीर होणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (MSBSHSE) फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या या परीक्षेचा निकाल दुपारी १ वाजल्यापासून विद्यार्थ्यांना ऑनलाईन पाहता येणार आहे.

मंडळाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, निकालाची घोषणा पत्रकार परिषदेत केली जाईल. त्यानंतर, विद्यार्थी मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन आपली गुणपत्रिका डाऊनलोड करू शकतील.

उत्तरपत्रिका पडताळणी आणि पुनर्मूल्यांकनासाठी संधी: ऑनलाईन निकालानंतर, विद्यार्थ्यांना त्यांच्या अनिवार्य विषयांपैकी कोणत्याही विषयात मिळालेल्या गुणांची पडताळणी, उत्तर पत्रिकांच्या छायाप्रती आणि पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करण्याची सोय मंडळाने उपलब्ध करून दिली आहे. विद्यार्थी यासाठी ६ मे ते २० मे २०२५ या कालावधीत मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून किंवा स्वतः कनिष्ठ महाविद्यालयामार्फत अर्ज करू शकतील.

दरम्यान, दरवर्षी निकालाच्या दिवशी वेबसाईटवर मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांची गर्दी होते, ज्यामुळे निकाल पाहण्यास विलंब होऊ शकतो. मात्र, यावर्षी माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांनी वेबसाईटची क्षमता वाढवण्याचे आणि सायबर सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना यंदा निकाल पाहताना कोणतीही अडचण येणार नाही, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

विद्यार्थी खालील अधिकृत वेबसाईटवर आपला निकाल पाहू शकतील:

http://hscresult.mkcl.org

www.mahahssboard.in

Results.targetpublications.org

Results.navneet.com

www.mahresult.nic.in

निकाल पाहण्याची सोपी प्रक्रिया:

* महाराष्ट्र बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या: www.mahresult.nic.in

* होमपेजवरील “HSC Examination Result 2025” या लिंकवर क्लिक करा.

* तुमचा सीट नंबर आणि तुमच्या आईचे पहिले नाव प्रविष्ट करा.

* “Submit” बटणावर क्लिक करा.

* निकाल तुमच्या स्क्रीनवर दिसेल. तुम्ही तो डाउनलोड करून प्रिंटही करू शकता.

SMS द्वारेही पाहता येणार निकाल: विद्यार्थ्यांना मोबाईलवर SMS द्वारे देखील निकाल पाहता येणार आहे. यासाठी त्यांनी आपल्या मोबाईलच्या मेसेज बॉक्समध्ये MHSSC टाइप करून 57766 या क्रमांकावर पाठवावे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 641
बारावी परीक्षा निकाल
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

नियमांचे उल्लंघन; राजापूर जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकांवर कारवाई होणार का? पालकांचा सवाल

17/09/2026

संगमनेर तालुक्यातील तीन जिल्हा परिषद शाळांसाठी ६२ लाखांचा निधी मंजूर; नवीन वर्गखोल्यांचे होणार बांधकाम

12/09/2026

मुलींचे शिक्षण ही समाजाची ताकद; पालिका शाळेच्या विकासासाठी शिवसेना कटिबद्ध – नगरसेविका साक्षी सूर्यवंशी

12/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
महाराष्ट्र संवाद विशेष

MPSC आंदोलनाला डॉ. जयश्रीताई थोरात यांचा पाठिंबा; समाज आणि आयोगातील ब्लड कॅन्सर ठीक करायचाय!

By Annant Ppangarkar10/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- पुण्यात विविध मागण्यांसाठी गेल्या नऊ दिवसांपासून सुरू असलेल्या MPSC परीक्षार्थींच्या आंदोलनाला…

आमदार अमोल खताळ यांनी वेधले ऊर्जा राज्यमंत्र्यांचे लक्ष; मेंढवन उपकेंद्राचे काम तातडीने सुरू करण्याची मागणी

10/10/2026

शनिवार १० ऑक्टोंबर — जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा असेल

10/10/2026

३९ ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त, तरी आरोपीला जामीन! संगमनेर न्यायालयाच्या आदेशात नेमके काय?

09/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.