Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे संगमनेर शहरात अद्यावत स्मारक उभारणार : माजी आमदार डॉ. सुधीर तांबे

August 1, 2026

‘कडलग इन्व्हेस्टमेंट’च्या आर्थिक साक्षरता कार्यशाळेला गुंतवणूकदारांचा प्रतिसाद

August 1, 2026

शनिवार, १ ऑगस्ट २०२६ — आजचा तुमचा दिवस कसा असेल

August 1, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » ऑनलाइन पेमेंट पडले महागात! रिक्षाचालकाकडून तरुणीचा विनयभंग, अश्लील व्हिडिओ आणि मेसेजचा वर्षाव
गुन्हेगारी

ऑनलाइन पेमेंट पडले महागात! रिक्षाचालकाकडून तरुणीचा विनयभंग, अश्लील व्हिडिओ आणि मेसेजचा वर्षाव

पीडित तरुणी वाघोलीहून विमाननगरला रिक्षाने जात होती. तिने रिक्षाचे भाडे ऑनलाइन पद्धतीने चुकते केले. त्यामुळे तिचा मोबाईल नंबर रिक्षाचालकाकडे गेला.
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरMay 4, 2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज – 

सध्या डिजिटल पेमेंटच्या जमान्यात गुगल पे आणि फोन पे चा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. मात्र, याच ऑनलाइन पेमेंटमुळे एका तरुणीला मनस्ताप सहन करावा लागला आहे.

वाघोली ते विमाननगर असा प्रवास करणाऱ्या एका २६ वर्षीय तरुणीने रिक्षाभाडे म्हणून केवळ २० रुपये गुगल पे द्वारे भरले आणि याच कारणामुळे एका रिक्षाचालकाने तिला अश्लील व्हिडिओ आणि मेसेज पाठवून तिचा विनयभंग केला. या घृणास्पद कृत्याबद्दल पुण्याच्या हडपसर पोलीस ठाण्यात आरोपी रिक्षाचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी वाघोलीहून विमाननगरला रिक्षाने जात होती. तिने रिक्षाचे भाडे ऑनलाइन पद्धतीने चुकते केले. त्यामुळे तिचा मोबाईल नंबर रिक्षाचालकाकडे गेला. याच संधीचा गैरफायदा घेत आरोपीने तिच्या मोबाईलवर वारंवार अश्लील व्हिडिओ आणि संदेश पाठवण्यास सुरुवात केली. इतकेच नव्हे, तर त्याने व्हिडिओ कॉल करून तिच्याशी अश्लील बोलण्याचा प्रयत्न देखील केला.

पीडित तरुणीने सुरुवातीला त्याचा मोबाईल नंबर ब्लॉक केला. मात्र, आरोपी इतका निर्लज्ज होता की त्याने दुसऱ्या मोबाईल नंबरवरून तिला त्रास देण्यास सुरुवात केली. त्याच्या सततच्या या कृत्यांमुळे त्रस्त झालेल्या तरुणीने अखेर हडपसर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली.

या गंभीर प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. ऑनलाइन पेमेंट करताना आपली संपर्क माहिती अनोळखी व्यक्तीच्या हाती लागू शकते, त्यामुळे नागरिकांनी अधिक सतर्क राहण्याची गरज आहे, हे या घटनेवरून स्पष्ट होते.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 1,486
ऑनलाइन पेमेंट विनयभंग
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

संगमनेर तालुक्यात लपून-छपून उरकला बालविवाह; ५ जणांवर घारगाव पोलिसांत गुन्हा

July 30, 2026

कचरा वेचण्याच्या बहाण्याने ‘रेकी’; बंद घरे गाठून घरफोडी करणाऱ्या दोन महिला जेरबंद

July 25, 2026

संघटित गुन्हेगारीविरोधात मोठे पाऊल; गोवंश तस्करीप्रकरणी ‘बीएनएस’ कलम १११ अन्वये दोघांवर पहिली मोठी कारवाई संगमनेरात

July 24, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
सामाजिक

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे संगमनेर शहरात अद्यावत स्मारक उभारणार : माजी आमदार डॉ. सुधीर तांबे

By अनंत पांगारकरAugust 1, 20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन  संगमनेर: दलित, शोषितांचा आपल्या साहित्यातून आवाज बुलंद करणारे आणि हक्कांसाठी लढा…

‘कडलग इन्व्हेस्टमेंट’च्या आर्थिक साक्षरता कार्यशाळेला गुंतवणूकदारांचा प्रतिसाद

August 1, 2026

शनिवार, १ ऑगस्ट २०२६ — आजचा तुमचा दिवस कसा असेल

August 1, 2026

नाशिक-पुणे रेल्वेसाठी ९ ऑगस्टला महामार्गावर चक्काजाम; आमदार सत्यजीत तांबे यांच्याकडून जनआंदोलनाची हाक

July 31, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.