Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई: साडेसहा लाखांचा गुटखा जप्त, संगमनेरातील दोघांसह चार जणांवर गुन्हा दाखल

17/10/2026

संगमनेरातील ‘या’ मुख्य रस्त्याचे नशीब बदलणार! आमदार अमोल खताळ यांच्या प्रयत्नांना यश; १० कोटींचा मोठा निधी मंजूर

17/10/2026

संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक येथे नवरात्रोत्सवातील दांडिया कार्यक्रमादरम्यान तुफान राडा; दोन्ही बाजूंच्या परस्परविरोधी गुन्ह्यांत लोखंडी रॉड, चाकू आणि फायटरने जीवघेणा हल्ला

17/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » निळवंडे पाणी वाद पोलीस ठाण्यात: इंद्रजीत थोरातांवर गुन्हा दाखल, आम्हालाही सह आरोपी करा म्हणत शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा
पाण्याचे राजकारण

निळवंडे पाणी वाद पोलीस ठाण्यात: इंद्रजीत थोरातांवर गुन्हा दाखल, आम्हालाही सह आरोपी करा म्हणत शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा

या संपूर्ण प्रकरणामुळे संगमनेर तालुक्यातील वातावरण अधिक तणावपूर्ण बनले आहे. शेतकऱ्यांचा वाढता रोष आणि आंदोलनाच्या भूमिकेमुळे परिस्थिती आणखी बिघडण्याची शक्यता आहे. आता प्रशासन आणि शेतकऱ्यांमधील हा तणाव कसा कमी होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar05/05/2025No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज – संगमनेर

निळवंडे धरणाच्या उजव्या कालव्यातील पाणीवाटपावरून संगमनेर तालुक्यात संघर्ष पेटला आहे. जलसंपदा विभागाच्या कामात अडथळा आणल्याच्या आरोपावरून सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याचे संचालक इंद्रजीत थोरात यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी आंदोलनाचा इशारा देत, “आम्हालाही सहआरोपी करा,” अशी मागणी केली आहे.

सध्या निळवंडे धरणाच्या उजव्या कालव्यातून पाणी सोडण्यात आले आहे. कालव्यातील अनधिकृत पाइपलाइन काढण्याची मोहीम जलसंपदा विभागाने हाती घेतली होती. मात्र, शेतकऱ्यांनी या कारवाईला कडाडून विरोध केला. शेतकऱ्यांचे नेतृत्व करत इंद्रजीत थोरात यांनी प्रशासनाच्या भूमिकेला आव्हान दिले. जलसंपदा विभागाचे सहाय्यक अभियंता प्रमोद माने यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, निमगाव पागा ते खळी पिंपरी दरम्यान अनधिकृत पाइप काढताना इंद्रजीत थोरात यांनी अधिकाऱ्यांना अडथळा निर्माण केला.

आमच्या कारखान्याने हे पाइप टाकले आहेत, ते काढू नका. शेतकऱ्यांच्या जमिनी कालव्यासाठी गेल्या आहेत, त्यामुळे त्यांना प्रथम पाणी मिळायला हवे.” असे थोरात यांनी म्हटले होते. या घटनेनंतर पोलिसांनी इंद्रजीत थोरात यांच्यावर भारतीय न्याय संहितेच्या कलम 221, 223 आणि महाराष्ट्र पाटबंधारे अधिनियम 1976 च्या कलम 93 (1)(ख), 93(4) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

या संपूर्ण प्रकरणामुळे संगमनेर तालुक्यातील वातावरण अधिक तणावपूर्ण बनले आहे. शेतकऱ्यांचा वाढता रोष आणि आंदोलनाच्या भूमिकेमुळे परिस्थिती आणखी बिघडण्याची शक्यता आहे. आता प्रशासन आणि शेतकऱ्यांमधील हा तणाव कसा कमी होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

गुन्हा दाखल झाल्यानंतर इंद्रजीत थोरात यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हटले की, “शेतकऱ्यांसाठी लढणे हा गुन्हा आहे का? जलसंपदा विभागाने यापूर्वीही शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. संगमनेर तालुक्याचे 48 किलोमीटर लाभक्षेत्र असूनही, आम्हाला पाण्याबाबत कोणतीही ठोस हमी दिली जात नाही. दिलेले आश्वासन पाळले जात नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हक्काच्या पाण्यासाठी संघर्ष करणे गुन्हा आहे का? आम्ही यापुढेही शेतकऱ्यांसाठी संघर्ष करत राहू.”

दरम्यान, इंद्रजीत थोरात यांच्यावरील कारवाईमुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. जाखुरी येथील शेतकरी रामेश्वर पानसरे यांनी संतप्त प्रतिक्रिया देताना म्हटले, “प्रशासन कोणतेही नियोजन देत नाही, आम्हाला आमच्या हक्काचे पाणी उपसू देत नाही आणि त्यात खोटे गुन्हे दाखल करत आहे. हा अन्याय आहे. इंद्रजीत थोरात यांच्यासोबत आम्हालाही सहआरोपी म्हणून सामील करा. प्रशासनाने यावर योग्य तोडगा काढला नाही, तर आमच्याकडे आंदोलनाशिवाय दुसरा कोणताही पर्याय उरणार नाही.”

पिंपरणे येथील शेतकरी अण्णा राहिंज आणि अरुण राहिंज यांनी आश्चर्य व्यक्त केले की, “काल सायंकाळी प्रशासन, इंद्रजीत थोरात आणि शेतकऱ्यांमध्ये सामोपचाराने तोडगा निघाला होता आणि तो प्रशासनाने मान्यही केला होता. मग आता गुन्हा कोणाच्या सांगण्यावरून दाखल झाला? हे संगमनेरला पाण्यापासून वंचित ठेवण्याचे षडयंत्र आहे. जर गुन्हे दाखल करायचे असतील, तर ते आमच्यावरही करा!”

या संपूर्ण प्रकरणामुळे संगमनेर तालुक्यातील वातावरण अधिक तणावपूर्ण बनले आहे. शेतकऱ्यांचा वाढता रोष आणि आंदोलनाच्या भूमिकेमुळे परिस्थिती आणखी बिघडण्याची शक्यता आहे. आता प्रशासन आणि शेतकऱ्यांमधील हा तणाव कसा कमी होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 2,001
इंद्रजीत थोरात गुन्हा निळवंडे पाणी
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

‘ये पब्लिक है, सब जानती है!’ — निळवंडेच्या पाण्याचे श्रेय लाटणाऱ्याना संगमनेरची जनता निवडणुकीत देणार सडेतोड उत्तर; अमोल शेलकर यांचा घणाघात

14/10/2026

माजी खासदारावर गुन्हा दाखल

01/10/2026

भंडारदरा धरणातून खरीप पिकांसाठी सोमवारपासून पाणी सुटणार; गणेशोत्सवात दिलासा : आमदार खताळ

13/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई: साडेसहा लाखांचा गुटखा जप्त, संगमनेरातील दोघांसह चार जणांवर गुन्हा दाखल

By Annant Ppangarkar17/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर शहरालगतच्या गुंजाळवाडी परिसरात अवैधरित्या गुटख्याची वाहतूक करणाऱ्या वाहनावर स्थानिक गुन्हे…

संगमनेरातील ‘या’ मुख्य रस्त्याचे नशीब बदलणार! आमदार अमोल खताळ यांच्या प्रयत्नांना यश; १० कोटींचा मोठा निधी मंजूर

17/10/2026

संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक येथे नवरात्रोत्सवातील दांडिया कार्यक्रमादरम्यान तुफान राडा; दोन्ही बाजूंच्या परस्परविरोधी गुन्ह्यांत लोखंडी रॉड, चाकू आणि फायटरने जीवघेणा हल्ला

17/10/2026

महावितरण कर्मचाऱ्यांवर हल्ला आणि शासकीय कामात अडथळा आणल्याचा गंभीर गुन्हा ठरला फोल; संगमनेर कोर्टाकडून सर्व ५ आरोपींची निर्दोष मुक्तता!

17/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.