भंडारदऱ्यात वनरक्षकाला मारहाण; मुंबईतील पोलीस पिता-पुत्रावर गुन्हा दाखल
राजूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर पवार पुढील तपास करीत आहेत.

पांजरे नाक्यावर वाहनांची तपासणी आणि शुल्क आकारणीचे काम सुरू असताना एमएच ०५ ईक्यू २६५१ क्रमांकाची पांढऱ्या रंगाची मारुती सुझुकी एक्सएल-६ कार तेथे आली. या कारच्या डॅशबोर्डवर ‘पोलीस’ अशी पाटी आणि लाल-निळ्या रंगाचा एलईडी लाईट लावलेला होता. नाक्यावर वाहनांची रांग असल्याने वनरक्षकांनी चालकाला गाडी रांगेत उभी करण्यास सांगितले.
काही वेळातच त्याचे वडील लक्ष्मण बांगर त्या ठिकाणी आले. वनरक्षक तळपाडे गणवेशात असतानाही त्यांनी काहीही ऐकून न घेता त्यांच्या गणवेशाची कॉलर धरली आणि तोंडात, डाव्या कानावर व पाठीवर मारहाण केली. ‘मी येथील स्थानिक असून माझ्या मुलाला का थांबवले’ असे म्हणत त्यांनी शिवीगाळ केली आणि ‘पुन्हा आमच्या नादी लागला तर जीवे मारून टाकीन’ अशी धमकी देऊन दोघेही तेथून निघून गेले.
