Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

MPSC आंदोलनाला डॉ. जयश्रीताई थोरात यांचा पाठिंबा; समाज आणि आयोगातील ब्लड कॅन्सर ठीक करायचाय!

10/10/2026

आमदार अमोल खताळ यांनी वेधले ऊर्जा राज्यमंत्र्यांचे लक्ष; मेंढवन उपकेंद्राचे काम तातडीने सुरू करण्याची मागणी

10/10/2026

शनिवार १० ऑक्टोंबर — जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा असेल

10/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शिर्डी आणि शनिशिंगणापूरच्या पायाभूत सुविधांसाठी तातडीने प्रस्ताव सादर करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
महाराष्ट्र संवाद विशेष

कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शिर्डी आणि शनिशिंगणापूरच्या पायाभूत सुविधांसाठी तातडीने प्रस्ताव सादर करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांच्या या निर्देशांमुळे सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शिर्डी आणि शनिशिंगणापूर येथील पायाभूत सुविधांच्या विकासाला गती मिळण्याची शक्यता आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar07/05/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

अहिल्यानगर, दि. ७ – 

नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर, जिल्ह्यातील शिर्डी आणि शनिशिंगणापूर येथे आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी संबंधित यंत्रणांनी त्वरित आवश्यक निधीसह प्रस्ताव सादर करावेत, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी दिले आहेत.

जिल्हाधिकारी कार्यालयात सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीसाठी आयोजित जिल्हा कार्यकारी समितीच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकीत अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर, जिल्हा नियोजन अधिकारी दीपक दातीर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉ. विरेंद्र बडदे प्रत्यक्ष उपस्थित होते, तर संबंधित विभागांचे अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.

जिल्हाधिकारी डॉ. आशिया म्हणाले की, उत्तर प्रदेशातील कुंभमेळ्याच्या आयोजनामुळे धार्मिक पर्यटनात मोठी वाढ झाली आहे. त्याच धर्तीवर, नाशिकसोबतच जिल्ह्यातील शिर्डी आणि शनिशिंगणापूर यांसारख्या धार्मिक स्थळांवरील पर्यटनाला चालना देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. यासाठी या धार्मिक स्थळांना जोडणारी वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करणे गरजेचे आहे. रेल्वेस्थानके, रस्ते आणि विमानतळ यांसारख्या सुविधांमध्ये सुधारणा करण्यावर भर देण्यात यावा आणि या कामांचे प्रस्ताव तातडीने सादर करावेत, असे त्यांनी सांगितले.

भाविकांच्या गर्दीचे योग्य नियोजन करण्यासाठी आवश्यक सुविधा निर्माण करण्यावर लक्ष केंद्रित करण्याची सूचनाही त्यांनी दिली. यात आरोग्य सुविधा, सुरक्षा व्यवस्था, स्वच्छतागृहे, प्रमुख रस्ते, परिसराचे सुशोभीकरण आणि पोलीस मदत केंद्रांच्या स्थापनेचे नियोजन करावे, असे ते म्हणाले. शिर्डी येथे वाहनांची होणारी गर्दी टाळण्यासाठी पर्यायी रस्त्यांची निर्मिती आणि बाह्यवळण रस्त्यांची शक्यता तपासावी. तसेच, शहरातील सर्व रस्ते आणि उड्डाणपुलांचे सुरक्षा परीक्षण तातडीने पूर्ण करावे. शिर्डी शहरातील बायपास रस्ता आणि परिक्रमा मार्गाचा प्रस्ताव शिर्डी संस्थानने त्वरित सादर करावा, असे निर्देशही त्यांनी दिले. आपत्कालीन परिस्थितीचा विचार करून आवश्यक साहित्याचा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिल्या.

शनिशिंगणापूरकडे जाणाऱ्या रस्त्याच्या रुंदीकरणासाठी आवश्यक प्रक्रिया पूर्ण करावी आणि त्यासंबंधीचा प्रस्ताव सादर करावा. त्याचबरोबर, आवश्यक असलेल्या इतर रस्त्यांसाठीही प्रस्ताव सादर करावेत. शनिशिंगणापूर येथे येणाऱ्या भाविकांसाठी पुरेशी पार्किंग व्यवस्था, पाणीपुरवठा, विद्युत पुरवठा, वैद्यकीय सेवा, वाहतूक व्यवस्था आणि हेलिपॅडची व्यवस्था करावी. गावांतर्गत रस्ते आणि स्ट्रीट लाईट उभारणीसाठी आवश्यक निधीचा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

जिल्हाधिकाऱ्यांच्या या निर्देशांमुळे सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शिर्डी आणि शनिशिंगणापूर येथील पायाभूत सुविधांच्या विकासाला गती मिळण्याची शक्यता आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 634
पंकज आशिया सिंहस्थ बैठक
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

MPSC आंदोलनाला डॉ. जयश्रीताई थोरात यांचा पाठिंबा; समाज आणि आयोगातील ब्लड कॅन्सर ठीक करायचाय!

10/10/2026

महात्मा गांधी हे भारतीय तत्त्वज्ञानाचे प्रतिबिंब: संदीप वाकचौरे

07/10/2026

फक्त गतिरोधक नव्हे, अवजड वाहतूक आणि अतिक्रमणावरही ठोस कारवाई करा : इरफानभाई मन्सुरी

06/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
महाराष्ट्र संवाद विशेष

MPSC आंदोलनाला डॉ. जयश्रीताई थोरात यांचा पाठिंबा; समाज आणि आयोगातील ब्लड कॅन्सर ठीक करायचाय!

By Annant Ppangarkar10/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- पुण्यात विविध मागण्यांसाठी गेल्या नऊ दिवसांपासून सुरू असलेल्या MPSC परीक्षार्थींच्या आंदोलनाला…

आमदार अमोल खताळ यांनी वेधले ऊर्जा राज्यमंत्र्यांचे लक्ष; मेंढवन उपकेंद्राचे काम तातडीने सुरू करण्याची मागणी

10/10/2026

शनिवार १० ऑक्टोंबर — जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा असेल

10/10/2026

३९ ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त, तरी आरोपीला जामीन! संगमनेर न्यायालयाच्या आदेशात नेमके काय?

09/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.