Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

अहिल्यानगर व संगमनेरात एलसीबीची धडक कारवाई; अकरा लाखांचा मुद्देमाल जप्त, चाळीस गोवंशीय जनावरांची सुटका!

18/10/2026

रविवार विशेष लेख — निवडणूक आयोग: गेंडा आणि गेंड्याची कातडी!

18/10/2026

रविवार, १८ ऑक्टोबर —- वाचा तुमचे आजच्या दिवसाचे राशिभविष्य

18/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » निळवंडे पाणी प्रश्नावरून राजकारण करण्याचा प्रयत्न: आमदार खताळ यांची टीका
राजकारण

निळवंडे पाणी प्रश्नावरून राजकारण करण्याचा प्रयत्न: आमदार खताळ यांची टीका

संगमनेर तालुक्यातील दोन्ही कालव्यांच्या लाभक्षेत्रातील गावातील ओढे, नाले आणि छोटे-मोठे पाझर तलाव भरून देण्याची जबाबदारी माझी आहे, याबाबत जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar07/05/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज – संगमनेर

ज्यांच्या हातात आता राजकारणासाठी कोणतेही मुद्दे शिल्लक राहिलेले नाहीत, तेच लोक आपल्या बगलबच्च्यांना हाताशी धरून शेतकऱ्यांमध्ये हेतुपुरस्सर दिशाभूल करणारे वातावरण तयार करत आहेत आणि त्यांच्यात विष पेरण्याचा प्रयत्न करत आहेत. जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि माझी प्रतिमा मलिन करून, हे काही लोक निळवंडे पाण्याच्या आड लपून राजकारण करत आहेत, अशी जोरदार टीका आमदार अमोल खताळ यांनी केली.

संगमनेर तालुक्यात निळवंडेच्या पाण्यावरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर आमदार खताळ यांच्या कार्यालयाकडून प्रसिद्धी पत्रक माध्यमांना पाठविण्यात आले यात त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की, यापूर्वी जानेवारी महिन्यात देखील निळवंडे उजव्या आणि डाव्या कालव्यांना आवर्तन सोडण्यात आले होते. त्यावेळी कोणतीही अडचण न येता सर्वांना पाणी मिळाले होते. मात्र, या वेळी सुद्धा दोन्ही कालव्यांना व्यवस्थित पाणी सुरू होते. हेड ते टेलपर्यंत पाणी पोहोचवण्यासाठी जलसंपदा विभागाने योग्य नियोजन केले होते.

उजव्या कालव्याचे पाणी अजून राहुरी तालुक्यामध्ये पोहोचले नसले तरी, कालव्यामध्ये एक-दोन पाईप टाकून पुढे नाले बंधारे भरण्याचे काम सुरू होते. मात्र, काही लोकांनी शेतकऱ्यांना भडकावून देत त्या कालव्यांमध्ये जास्त पाईप टाकून पाण्याच्या मुद्द्यावरच राजकारण सुरू केले आहे, हे अत्यंत दुर्दैवी आहे.

निळवंडे उजवा आणि डावा कालवा लाभक्षेत्रातील प्रत्येक शेतकऱ्याला पाणी मिळालेच पाहिजे, ही माझी पहिल्यापासूनची भूमिका आहे. संगमनेर तालुक्यातील दोन्ही कालव्यांच्या लाभक्षेत्रातील गावातील ओढे, नाले आणि छोटे-मोठे पाझर तलाव भरून देण्याची जबाबदारी माझी आहे, याबाबत जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. गरज पडल्यास जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे पाठपुरावा करून ४ ते ५ दिवसांचे रोटेशन वाढवून प्रत्येकाला पाणी कसे मिळेल यासाठी मी प्रयत्नशील राहील. ज्या शेतकऱ्यांच्या मतांवर मी निवडून आलो आहे, त्यांना मी कधीही वाऱ्यावर सोडणार नाही आणि पाण्यापासून कोणीही वंचित राहणार नाही, असा विश्वास आमदार अमोल खताळ यांनी व्यक्त केला.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 623
अमोल खताळ निळवंडे पाणी
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेरातील ‘या’ मुख्य रस्त्याचे नशीब बदलणार! आमदार अमोल खताळ यांच्या प्रयत्नांना यश; १० कोटींचा मोठा निधी मंजूर

17/10/2026

संगमनेरात प्रशासनाविरोधात संतापाचा उद्रेक; यांचा ‘दिमाग और दफ्तर ठीक करो’ आंदोलनाचा इशारा

17/10/2026

आमदार सत्यजीत तांबे यांच्या प्रयत्नांना यश; संगमनेरच्या रस्ते विकासासाठी १० कोटींचा निधी मंजूर! बसस्थानक ते प्रवरापुलापर्यंतच्या रस्त्याचा होणार विकास; रुंदीकरणासह ड्रेनेज व्यवस्थेचाही समावेश

16/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

अहिल्यानगर व संगमनेरात एलसीबीची धडक कारवाई; अकरा लाखांचा मुद्देमाल जप्त, चाळीस गोवंशीय जनावरांची सुटका!

By Annant Ppangarkar18/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- स्थानिक गुन्हे शाखेने अहिल्यानगर (तोफखाना) आणि संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील…

रविवार विशेष लेख — निवडणूक आयोग: गेंडा आणि गेंड्याची कातडी!

18/10/2026

रविवार, १८ ऑक्टोबर —- वाचा तुमचे आजच्या दिवसाचे राशिभविष्य

18/10/2026

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई: साडेसहा लाखांचा गुटखा जप्त, संगमनेरातील दोघांसह चार जणांवर गुन्हा दाखल

17/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.