Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

माजी मंत्री थोरात आणि डॉ. तांबे यांनी घेतली पद्मभूषण अण्णा हजारे यांची भेट; प्रकृतीची केली चौकशी

13/09/2026

गणेश मूर्ती आगमन मिरवणुकीत कर्णकर्कश साऊंड सिस्टीम वाजवल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल; सिस्टीम जप्त करून १५ हजारांचा दंड

13/09/2026

रविवार विशेष लेख — अमृता वहिनींची मात्रा कारणी लागो!

13/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » अहिल्यानगर जिल्ह्यातील या आमदाराच्या अडचणीत वाढ! वीस लाखाचा धनादेश अनादरीत प्रकरणी न्यायालयाचे पकड वॉरंट
गुन्हेगारी

अहिल्यानगर जिल्ह्यातील या आमदाराच्या अडचणीत वाढ! वीस लाखाचा धनादेश अनादरीत प्रकरणी न्यायालयाचे पकड वॉरंट

आता पोलीस आमदार पाचपुते यांना न्यायालयात कधी हजर करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar08/05/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज – श्रीरामपूर
श्रीरामपूर येथील अशोक सहकारी साखर कारखान्याला साईकृपा शुगर अँड अलाइड लिमिटेडने दिलेला २० लाख रुपयांचा धनादेश अनादरित झाल्याप्रकरणी श्रीगोंदा मतदारसंघाचे विद्यमान आमदार विक्रम बबनराव पाचपुते यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. श्रीरामपूर न्यायालयाने या प्रकरणी आमदार पाचपुते यांच्यासह साईकृपा शुगर अँड अलाइड लिमिटेडच्या व्यवस्थापकांनाही पकड वॉरंट बजावले आहे. न्यायालयाच्या या कठोर कारवाईमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
हिरडगाव येथील साईकृपा शुगर अँड अलाइड लिमिटेडचे माजी अध्यक्ष आणि विद्यमान आमदार विक्रम बबनराव पाचपुते आणि कारखान्याचे व्यवस्थापक यांच्याविरुद्ध श्रीरामपूर येथील अशोक सहकारी साखर कारखान्याने २० लाख रुपयांचा धनादेश अनादरित केल्याची तक्रार दाखल केली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने श्रीरामपूर येथील न्यायदंडाधिकारी (क्रमांक २) यांच्या न्यायालयात सुनावणी सुरू आहे.
न्यायालयाने यापूर्वी श्रीगोंदा पोलिसांना आमदार पाचपुते आणि व्यवस्थापक यांना ताब्यात घेऊन न्यायालयात हजर करण्याचे आदेश दिले होते. मात्र, श्रीगोंदा पोलिसांनी या वॉरंटची अंमलबजावणी न केल्याने आमदार पाचपुते आणि व्यवस्थापक न्यायालयात हजर झाले नाहीत. या दिरंगाईमुळे न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
दरम्यान, न्यायालयाने आता श्रीगोंदा पोलीस निरीक्षकांना स्पष्ट आणि कठोर आदेश दिले आहेत की, दोन्ही आरोपींना तातडीने ताब्यात घेऊन न्यायालयात हजर करावे. पकड वॉरंटच्या अंमलबजावणीत कोणतीही चूक किंवा हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही, असे स्पष्ट निर्देश न्यायालयाने दिले आहेत.
धनादेश अनादरसारख्या गंभीर प्रकरणामुळे साईकृपा शुगर अँड अलाइड लिमिटेडच्या आर्थिक विश्वासार्हतेवर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. अशोक सहकारी साखर कारखान्यासारख्या प्रतिष्ठित संस्थेला दिलेला धनादेश न वटल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
आमदार विक्रम पाचपुते यांच्या कायदेशीर अडचणीत यामुळे आणखी वाढ झाली आहे. हिरडगाव येथील साईकृपा शुगर अँड अलाइड लिमिटेड हा साखर कारखाना पूर्वी माजी आमदार बबनराव पाचपुते यांच्या कुटुंबाच्या मालकीचा होता. सध्या या कारखान्याचे नियंत्रण गौरी शुगरचे अध्यक्ष बाबुराव बोत्रे पाटील यांच्याकडे असले तरी, मागील आर्थिक व्यवहारांमुळे पाचपुते कुटुंबाला सातत्याने कायदेशीर समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. या नवीन घडामोडीमुळे त्यांच्या अडचणींमध्ये आणखी भर पडली आहे. आता पोलीस आमदार पाचपुते यांना कधी ताब्यात घेतात आणि न्यायालयात कधी हजर करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,522
अशोक साखर कारखाना धनादेश अनादर न्यायालय विक्रम पाचपुते श्रीरामपूर न्यायालय
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

समृद्धी महामार्गावर चाकूचा धाक दाखवून दरोडा टाकणाऱ्या सराईत टोळीचा पर्दाफाश; स्थानिक गुन्हे शाखेकडून चार आरोपींना अटक, एक लाख दोन हजारांचा मुद्देमाल जप्त

12/09/2026

चार अवैध कत्तलखान्यांवर एलसीबीचे छापे, १०५० किलो गोमांसासह ९ जनावरांची सुटका

12/09/2026

बेकायदेशीर भंगार दुकानांवर पोलिसांचा छापा; विनापरवाना वाहने तोडणाऱ्या दोघांना अटक, लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त

12/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
महाराष्ट्र संवाद विशेष

माजी मंत्री थोरात आणि डॉ. तांबे यांनी घेतली पद्मभूषण अण्णा हजारे यांची भेट; प्रकृतीची केली चौकशी

By Annant Ppangarkar13/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत पद्मभूषण अण्णा हजारे यांची काँग्रेस पक्षाचे…

गणेश मूर्ती आगमन मिरवणुकीत कर्णकर्कश साऊंड सिस्टीम वाजवल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल; सिस्टीम जप्त करून १५ हजारांचा दंड

13/09/2026

रविवार विशेष लेख — अमृता वहिनींची मात्रा कारणी लागो!

13/09/2026

आज रविवार, १३ सप्टेंबर— जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल

13/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.