Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

पोलिसांच्या ताब्यात असलेल्या तरुणाला आमदार खताळ यांच्या कार्यकर्त्याकडून मारहाण; संदेश देशमुख यांच्यावर एनसी दाखल

01/09/2026

दारूच्या नशेत झालेल्या वादातून मारहाण करून हत्या करणाऱ्या आरोपीस जन्मठेप; संगमनेर न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

01/09/2026

महायुती सरकारचा मोठा निर्णय: भोजापूर पूरचारीचा नदीजोड प्रकल्पात समावेश; संगमनेर, सिन्नर तालुक्यातील दुष्काळी ३५ गावांना दिलासा!

01/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » राज्यातील पालिकांमध्ये आता ‘आपले सरकार’ सेवा केंद्र!
प्रशासन

राज्यातील पालिकांमध्ये आता ‘आपले सरकार’ सेवा केंद्र!

'महाआयटी' महामंडळाने या केंद्रांना ऑनलाइन अर्जाचे शुल्क स्वीकारण्यासाठी त्वरित 'वॉलेट' सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar11/05/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

अहिल्यानगर – 

आता राज्यातील महापालिका, नगरपरिषदा आणि नगरपंचायतींमध्ये नागरिकांसाठी ‘आपले सरकार सेवा केंद्र’ सुरू होणार आहेत. राज्य सरकारच्या नगर विकास विभागाने याबाबत अधिकृत आदेश जारी केले आहेत. या केंद्रांच्या माध्यमातून राज्य शासनाच्या विविध विभागांच्या ऑनलाइन सेवांसाठी अर्ज स्वीकारले जातील आणि नागरिकांना आवश्यक सेवा पुरवल्या जातील.

यापूर्वी ‘आपले सरकार’ सेवा केंद्र ग्रामपंचायती आणि खाजगी व्यक्तींमार्फत चालवली जात होती. अहिल्यानगर जिल्ह्यात सध्या १२४२ ग्रामपंचायती आणि ८४१ खाजगी केंद्रांच्या माध्यमातून एकूण २०८३ केंद्रे कार्यरत आहेत. या केंद्रांद्वारे राज्य सरकारच्या विविध विभागांच्या एकूण ७० अधिसूचित सेवा ऑनलाइन पद्धतीने पुरवल्या जातात. आता याच सेवा शहर भागातील नागरिकांसाठी त्यांच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहेत.

राज्यातील सर्व महापालिका आयुक्त तसेच प्रशासक आणि नगरपरिषद व नगरपंचायतींच्या मुख्याधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात सुरू करावयाच्या ‘आपले सरकार सेवा केंद्रां’ची यादी जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करावी लागणार आहे. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयातील ‘एनआयसी’ केंद्राकडून या पालिकांसाठी स्वतंत्र ‘युजर आयडी’ प्राप्त करायचे आहेत. त्याचप्रमाणे, ‘आपले सरकार’ पोर्टलवरून पुरवल्या जाणाऱ्या सर्व सेवांसाठी ‘महाआयटी’ महामंडळाकडून ‘युजर आयडी’ मिळवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत प्रस्ताव पाठवावे लागणार आहेत.

‘महाआयटी’ महामंडळाने या केंद्रांना ऑनलाइन अर्जाचे शुल्क स्वीकारण्यासाठी त्वरित ‘वॉलेट’ सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या केंद्रांच्या माध्यमातून आता राज्य सरकारच्या सर्व विभागांच्या ऑनलाइन सेवांचे अर्ज स्वीकारले जातील आणि आवश्यक कागदपत्रांची संगणकीय प्रत (प्रिंटआउट) देण्याची प्रक्रिया पालिका स्तरावर पूर्ण केली जाईल.

शहरातील नागरिकांना सर्वसमावेशक सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सेवा हक्क आयोगाच्या मुख्य आयुक्तांनी आणि उपमुख्यमंत्री महोदयांनीही यापूर्वी मनपा, नगरपरिषद आणि नगरपंचायतींमार्फत केंद्रे सुरू करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार आता हा महत्त्वपूर्ण आदेश जारी करण्यात आला आहे. यामुळे आता शहरातील नागरिकांना शासकीय सेवा मिळवणे अधिक सुलभ आणि सोपे होणार आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 781
नगरपालिका
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

उसनवारीवरील कर्मचाऱ्यांना १० सप्टेंबरपर्यंत मूळ विभागात पाठवा; मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर मुख्य सचिवांचे कडक आदेश

25/08/2026

राज्यात खळबळ..! तहसीलदार निलंबित; ‘ते’ प्रकरण भोवलं

14/08/2026

स्वातंत्र्यदिनी भंडारदरा, कळसूबाई फिरण्याचा प्लॅन आहे? आधी पोलिसांचे ‘हे’ नवीन वाहतूक नियम नक्की वाचा!

12/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

पोलिसांच्या ताब्यात असलेल्या तरुणाला आमदार खताळ यांच्या कार्यकर्त्याकडून मारहाण; संदेश देशमुख यांच्यावर एनसी दाखल

By Annant Ppangarkar01/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन  (विशेष प्रतिनिधी): संगमनेर शहरातील खांडेश्वर मंदिरात दर्शनासाठी आलेल्या एका…

दारूच्या नशेत झालेल्या वादातून मारहाण करून हत्या करणाऱ्या आरोपीस जन्मठेप; संगमनेर न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

01/09/2026

महायुती सरकारचा मोठा निर्णय: भोजापूर पूरचारीचा नदीजोड प्रकल्पात समावेश; संगमनेर, सिन्नर तालुक्यातील दुष्काळी ३५ गावांना दिलासा!

01/09/2026

आज मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

01/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.