Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेरमध्ये बुधवारी रंगणार ७५० कलावंतांचे भव्य महावादन; ‘आय लव्ह संगमनेर’ चळवळीचा उपक्रम

15/09/2026

पोलीस प्रशासनाचा मोठा निर्णय, गणेशोत्सवादरम्यान ‘यांना’ संगमनेर व अकोले तालुक्यात प्रवेश बंदीचे आदेश जारी___वाचा यादी

15/09/2026

सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर संगमनेर उपविभागात पोलीस प्रशासनाची मोठी कारवाई; गुन्हेगारी पार्श्वभूमीचे सात जण जिल्ह्यातून हद्दपार

15/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » आदित्य कडलग यांची अमेरिकेतील जागतिक विमा परिषदेसाठी ऐतिहासिक निवड
यश / निवड / पुरस्कार

आदित्य कडलग यांची अमेरिकेतील जागतिक विमा परिषदेसाठी ऐतिहासिक निवड

आदित्य यांच्या या बहुमानामुळे कडलग इन्व्हेस्टमेंटची दुसरी पिढीही या क्षेत्रात प्रभावीपणे आणि सातत्यपूर्ण कार्यरत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar12/05/2025Updated:13/05/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर – प्रतिनिधी
टाटा एआयए लाईफ इन्शुरन्स कंपनीचे युवा अभिकर्ता आदित्य सुनील कडलग यांनी जागतिक विमा क्षेत्रात आपल्या उत्कृष्ट कार्याचा ठसा उमटवत मानाचा ‘एमडीआरटी’ (Million Dollar Round Table) सन्मान पटकावला आहे. या प्रतिष्ठित पुरस्कारामुळे त्यांना अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यातील अनाहिम येथे ७ ते १० जून २०२६ दरम्यान होणाऱ्या जागतिक विमा परिषदेत सहभागी होण्याचा बहुमान प्राप्त झाला आहे.
विशेष म्हणजे, आदित्य यांनी २०२३ मध्ये विमा क्षेत्रात पदार्पण करताच एमडीआरटीचा मान मिळवला. त्यानंतर त्यांनी आपल्या उत्कृष्ट कामगिरीची मालिका कायम ठेवत २०२४ मध्ये एकाच वर्षात तीन वेळा एमडीआरटी मानांकन प्राप्त केले. या अद्वितीय कामगिरीमुळे त्यांना जागतिक स्तरावरील अत्यंत प्रतिष्ठित ‘सीओटी’ (Court of the Table) पुरस्काराने गौरवण्यात आले. यावर्षीही त्यांनी केवळ चार महिन्यांच्या कालावधीत पहिले एमडीआरटी मानांकन प्राप्त करून आपल्या सातत्यपूर्ण यशाची पताका फडकवत ठेवली आहे.
आदित्य यांच्या या प्रेरणादायी प्रवासात त्यांचे वडील, सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते, प्रेरणादायी वक्ते आणि कडलग इन्व्हेस्टमेंटचे संस्थापक सुनील कडलग यांचा मोलाचा वाटा आहे. सुनील कडलग हे मागील २९ वर्षांपासून यशस्वी जीवन विमा सल्लागार, १६ वर्षांपासून म्युच्युअल फंड वितरक आणि आरोग्य विमा सल्लागार म्हणून कार्यरत आहेत. संगमनेर येथील त्यांच्या ‘कडलग इन्व्हेस्टमेंट’ या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी या क्षेत्रात अत्यंत पारदर्शक आणि प्रामाणिक सेवा पुरवून एक विश्वासार्हता निर्माण केली आहे.
कोविड-१९ च्या कठीण काळात सुनील कडलग यांनी अनेक कुटुंबांना विमा मृत्यू दावे मिळवून देत मोठा आधार दिला. तसेच, आरोग्य विम्याद्वारे अनेक कुटुंबांना कोविड उपचारांसाठी आर्थिक मदत मिळवून देण्यात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. समाजातील आर्थिक साक्षरता वाढावी यासाठी ते महाराष्ट्रभर व्याख्याने देतात आणि विविध वृत्तपत्रांमधून नियमित लेखनही करतात. यासोबतच, जवळे कडलग येथील स्वामी विवेकानंद सार्वजनिक वाचनालयाचे ते संस्थापक कार्यवाह आहेत, तर संगमनेर येथील रोटरी आय केअर ट्रस्टचे माजी विश्वस्त आणि रोटरी क्लब ऑफ संगमनेरचे संचालक म्हणूनही ते सक्रिय आहेत. अशा विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून सुनील कडलग यांनी समाजासाठी आपले महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.
आदित्य कडलग यांच्या या उल्लेखनीय यशात टाटा एआयए लाईफ इन्शुरन्स कंपनी, नाशिकचे शाखाधिकारी धनंजय पाटील, चीफ बिझनेस असोसिएट सुरज वानखेडे आणि त्यांच्या आई, एक उपक्रमशील शिक्षिका वृषाली कडलग यांचे महत्त्वपूर्ण मार्गदर्शन लाभले आहे.
आदित्य यांच्या या बहुमानामुळे कडलग इन्व्हेस्टमेंटची दुसरी पिढीही या क्षेत्रात प्रभावीपणे आणि सातत्यपूर्ण कार्यरत असल्याचे स्पष्ट झाले आहे. म्युच्युअल फंडांच्या माध्यमातून कडलग इन्व्हेस्टमेंटने अनेक ग्राहकांना त्यांच्या आर्थिक उद्दिष्टांपर्यंत पोहोचण्यास मदत केली आहे आणि आदित्य स्वतः देखील एक सक्रिय म्युच्युअल फंड वितरक आहेत.
संगमनेर शहरातून जागतिक विमा क्षेत्रातील पहिले ‘सीओटी’ आणि सातत्यपूर्ण ‘एमडीआरटी’ म्हणून आदित्य कडलग यांच्या या अभूतपूर्व यशाबद्दल सर्व स्तरांतून त्यांचे अभिनंदन होत आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 11,538
आदित्य कडलग कडलग इन्व्हेस्टमेंट निवड सुनील कडलग
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेर नगरपरिषदेच्या पथ विक्रेता तक्रार निवारण समितीवर श्रीनिवास पगडाल आणि कृष्णा वालझाडे यांची निवड

11/09/2026

सोशल मीडिया रिल्सच्या प्रभावापासून दूर राहून तरुणांनी ‘गुंतवणूक भान’ जपावे : सुनील कडलग

09/09/2026

संगमनेर तालुका फोटोग्राफर असोसिएशनच्या अध्यक्षपदी साई दिघे, तर उपाध्यक्षपदी निलेश शिंदे यांची एकमताने निवड

20/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
महाराष्ट्र संवाद विशेष

संगमनेरमध्ये बुधवारी रंगणार ७५० कलावंतांचे भव्य महावादन; ‘आय लव्ह संगमनेर’ चळवळीचा उपक्रम

By Annant Ppangarkar15/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – महाराष्ट्र राज्य हे सांस्कृतिकदृष्ट्या अत्यंत वैभवशाली असून पारंपारिक…

पोलीस प्रशासनाचा मोठा निर्णय, गणेशोत्सवादरम्यान ‘यांना’ संगमनेर व अकोले तालुक्यात प्रवेश बंदीचे आदेश जारी___वाचा यादी

15/09/2026

सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर संगमनेर उपविभागात पोलीस प्रशासनाची मोठी कारवाई; गुन्हेगारी पार्श्वभूमीचे सात जण जिल्ह्यातून हद्दपार

15/09/2026

दिल्ली नाक्यावर कंटेनरखाली चिरडून महिलेचा मृत्यू, संगमनेर शहरातील जड वाहतुकीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; नागरिकांचा संताप

15/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.