Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

रविवार विशेष लेख — ज्ञानेशकुमारांचे समर्थक ढोंगी सत्यवान!

11/10/2026

दूध भेसळ प्रकरणी मुख्य आरोपीला सात दिवसांत अटकपूर्व जामीन मंजूर

11/10/2026

रविवार ११ ऑक्टोबर २०२६ — जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा असेल

11/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » डॉ. कर्पेंपाठोपाठ धन्वंतरीचा आणखी एक उपासक अडचणीत! गर्भवती महिलेचा वेदनादायक मृत्यूचा प्रवास
पत्रकारिता

डॉ. कर्पेंपाठोपाठ धन्वंतरीचा आणखी एक उपासक अडचणीत! गर्भवती महिलेचा वेदनादायक मृत्यूचा प्रवास

आधी गावातील छोट्या, नंतर शहरातील मोठ्या आणि शेवटी तातडीने या महिलेला शेजारच्या तालुक्यातील बड्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र दुर्दैवाने या रुग्णालयात काही वेळातच तिने अखेरचा श्वास घेतला.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar12/05/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर – प्रतिनिधी

संगमनेर तालुक्यात घडलेल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याच्या आरोपाने डॉ. अमोल कर्पे याने वैद्यकीय क्षेत्राची लाज चव्हाट्यावर आणली असतानाच आता आणखी एका हृदयद्रावक घटनेने वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडवून दिली आहे. एका गर्भवती महिलेला गर्भपात करायचा होता आणि या प्रयत्नात तिला आपला जीव गमवावा लागला. या घटनेने आरोग्य यंत्रणेतील त्रुटी आणि संगमनेरमधील काही डॉक्टरांच्या कथित निष्काळजीपणावर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, महिलेला देण्यात आलेल्या गर्भपाताच्या गोळ्यांमुळे झालेल्या त्रासातून गर्भपात करताना तालुक्यातील एका महिलेला आपला जीव गमवावा लागल्याचे समोर आले आहे. महिलेला दिलेल्या गर्भपाताच्या गोळ्यांमुळे महिलेची तब्येत बिघडली. त्यानंतर संगमनेर शहरातील एका प्रतिष्ठित ‘प्रवीण’ डॉक्टरने महिलेची शारीरिक स्थिती गंभीर असताना तिला रुग्णालयात दाखल करून अशा गंभीर स्थितीत तिचा बेकायदेशीर गर्भपात करण्याचा निर्णय घेतला, असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या गंभीर प्रकरणाची सखोल चौकशी करून सत्य समोर आणण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

पतीपासून विभक्त राहणाऱ्या आणि संगमनेर तालुक्यातील ग्रामीण भागात राहावयास असलेल्या वैशालीला (नाव बदललेले आहे) तिसऱ्यांदा गर्भधारणा झाली होती. पतीपासून विभक्त असताना गर्भधारणा झाल्याने ती महिला मानसिक तणावाखाली होती. यासंदर्भातील एका तक्रारीत नमूद केल्यानुसार, ३० मार्च २०२५ रोजी महिलेने स्वतःहून गर्भपाताच्या गोळ्या घेतल्या किंवा कुणीतरी तिला त्या गोळ्या दिल्या. या गोळ्यांच्या सेवनानंतर महिलेला असह्य त्रास सुरू झाला. रक्तस्राव आणि पोटदुखीने महिला हैराण झाली. परिस्थिती बिघडल्यामुळे या महिलेला तातडीने पूर्वेकडील एका गावातील दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

तेथे त्यांच्यावर सलग तीन दिवस उपचार सुरू होते. मात्र, तीन दिवसांच्या उपचारानंतरही महिलेच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा झाली नाही, उलट रक्तस्राव वाढतच गेला, ज्यामुळे तिची स्थिती अधिक गंभीर झाली. परिस्थिती हाताबाहेर जात आहे हे लक्षात आल्यावर, महिलेला पुढील उपचारासाठी संगमनेर शहरातील एका ‘धन्वंतरी’च्या उपासकाकडे दाखल करावे लागले. रुग्णालयात दाखल झाल्यानंतर रुग्णालयातील वैद्यकीय व्यवसायात ‘प्रवीण’ असलेला डॉक्टरने या महिलेवर उपचार सुरू केले.

उपचारादरम्यान महिलेच्या शरीरात अतिशय कमी प्रमाणात रक्त शिल्लक होते. वैद्यकीय दृष्ट्या ही अत्यंत गंभीर आणि धोकादायक स्थितीत होती. असे असूनही, या महिलेची शारीरिक क्षमता आणि धोके यांचा पुरेसा विचार न करता गर्भपात प्रक्रिया पूर्ण करत तिच्या गर्भाशयातील गर्भ काढला गेला. या गर्भपात प्रक्रियेदरम्यान महिलेच्या शरीरातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला, ज्यामुळे तिची प्रकृती आणखी खालावली.

गर्भपातादरम्यान महिलेचा जीव वाचवणे कठीण आहे, गर्भपात प्रक्रियेदरम्यान प्रकृती खालावली असल्याचे धन्वंतरीचा उपासक असलेल्या डॉक्टरच्या ही बाब लक्षात आल्याने या महिलेला तातडीने संगमनेर शहरापासून जवळच असलेल्या शेजारच्या तालुक्यातील एका बड्या रुग्णालयात हलविण्याचा सल्ला देण्यात आला.

आधी गावातील छोट्या, नंतर शहरातील मोठ्या आणि शेवटी तातडीने या महिलेला शेजारच्या तालुक्यातील बड्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र दुर्दैवाने या रुग्णालयात काही वेळातच तिने अखेरचा श्वास घेतला. (क्रमश:)

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 3,895
गर्भपात महिला मृत्यू
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

जिल्हाधिकारी साहेब एकदा रस्त्यावर पायी फिराच! संगमनेरातील अतिक्रमण हटाव मोहीम दिखावा की केवळ समाधान?

05/08/2026

संगमनेरमध्ये रेशनच्या धान्याचा काळा बाजार? पोलीस अन् पुरवठा विभागाच्या संशयास्पद भूमिकेने संभ्रम!

05/08/2026

अतिक्रमणाच्या नावाखाली संगमनेरात गरिबांवर बुलडोझर, धनदांडग्यांवर मेहेरनजर; ‘सिंघम’ बनलेल्या प्रशासनाविरोधात नागरिकांचा संतप्त सवाल

19/07/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
रविवार विशेष

रविवार विशेष लेख — ज्ञानेशकुमारांचे समर्थक ढोंगी सत्यवान!

By Annant Ppangarkar11/10/20260

प्रवीण पुरो – देश एका वेगळ्या वळणावर असताना, या देशाचं सार्वभौमत्व संकटात आणणाऱ्या सरकारला आणि…

दूध भेसळ प्रकरणी मुख्य आरोपीला सात दिवसांत अटकपूर्व जामीन मंजूर

11/10/2026

रविवार ११ ऑक्टोबर २०२६ — जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा असेल

11/10/2026

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुक्यातील विविध रस्ते मजबुतीकरणासाठी ३ कोटी रुपयांचा निधी मंजूर; आमदार सत्यजित तांबे यांच्या पाठपुराव्याला यश

10/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.