Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

‘कर्माकडून कृतार्थतेकडे’ जाण्यासाठी प्रत्येक कृतीत ईश्वरभाव जागवा: डॉ. संजय मालपाणी

25/08/2026

पोलिसांची गुटख्याविरोधात मोठी कारवाई; सिनेस्टाईल पाठलाग करून ५१ लाखांचा मुद्देमाल जप्त

25/08/2026

संगमनेरमध्ये सह्याद्री कॉलेज शेजारील ‘बर्गेज कॅफे’वर पोलिसांची धाड; अश्लील चाळ्यांसाठी जागा पुरवणाऱ्या चालकावर गुन्हा दाखल

25/08/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » शिक्षिकेच्या कार्याचा गौरव करत प्रेमापोटी पालकांनी दिली नवी कोरी स्कुटी भेट!
सामाजिक

शिक्षिकेच्या कार्याचा गौरव करत प्रेमापोटी पालकांनी दिली नवी कोरी स्कुटी भेट!

कौतुक सोहळ्याबद्दल बोलताना आमदार डॉ. किरण लहामटे म्हणाले, "श्रीमती खतोडे या विद्यार्थीप्रिय शिक्षिकेचे कार्य खरोखरच कौतुकास्पद आहे. त्यांनी केलेल्या चांगल्या कामाची पावती म्हणून पालकांनी त्यांचा गौरव करणे हे एक दुर्मिळ आणि प्रेरणादायी उदाहरण आहे."
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar13/05/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

अकोले – प्रतिनिधी

नवलेवाडी (ता. अकोले) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षिका श्रीमती सुमन गणपत खतोडे यांच्या शिकवण्याच्या अनोख्या पद्धतीमुळे आणि विद्यार्थ्यांप्रति असलेल्या समर्पण भावनेमुळे पालक अक्षरशः भारावून गेले आहेत. त्यांच्या या कार्याचा गौरव म्हणून नवलेवाडीतील विद्यार्थी आणि पालकांनी एकत्र येत त्यांना चक्क एक नवीन स्कुटीची खास भेट दिली आहे.

अकोले येथे आयोजित एका विशेष कार्यक्रमात हा कौतुक सोहळा पार पडला. या कार्यक्रमाला आमदार डॉ. किरण लहामटे यांच्यासह राजूर महाविद्यालयाचे माजी प्राचार्य विलास नवले यांनी अध्यक्षस्थान भूषविले. माजी नगराध्यक्ष के. डी. धुमाळ, गटशिक्षणाधिकारी अरविंद कुमावत, शिक्षण विस्तार अधिकारी (अकोले) माधवराव हासे, शिक्षण विस्तार अधिकारी (मवेशी बीट) बाळासाहेब दोरगे आणि केंद्रप्रमुख (नवलेवाडी) सुनील नरसाळे यांच्यासह शिक्षक विक्रम गायकर आदी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

नवलेवाडी शाळेतील इयत्ता चौथीचे सर्व विद्यार्थी, पालक आणि शिक्षकवृंद यांनी मिळून या आगळ्यावेगळ्या गौरव सोहळ्याचे आयोजन केले होते. श्रीमती खतोडे यांनी इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांना अत्यंत आपुलकीने शिकवले.

त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे आणि प्रभावी अध्यापन शैलीमुळे या वर्गातील अनेक विद्यार्थ्यांनी जिल्हा आणि राज्य स्तरावरील विविध स्पर्धा परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश संपादन केले आहे. विद्यार्थ्यांच्या या नेत्रदीपक कामगिरीमुळे प्रभावित होऊन सर्व पालकांनी एकत्र येत श्रीमती खतोडे यांना ज्युपिटर स्कुटी भेट देऊन त्यांच्या कार्याचा सन्मान केला.

या अनोख्या कौतुक सोहळ्याबद्दल बोलताना आमदार डॉ. किरण लहामटे म्हणाले, “श्रीमती खतोडे या विद्यार्थीप्रिय शिक्षिकेचे कार्य खरोखरच कौतुकास्पद आहे. त्यांनी केलेल्या चांगल्या कामाची पावती म्हणून पालकांनी त्यांचा गौरव करणे हे एक दुर्मिळ आणि प्रेरणादायी उदाहरण आहे.”

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुजाता सहाणे यांनी केले, तर कवयित्री कविता आरोटे यांनी सत्कारमूर्ती श्रीमती खतोडे यांचा परिचय करून दिला. डॉ. निलेश सहाणे यांनी आलेल्या पाहुण्यांचे स्वागत केले. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी आपले मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री महेश शेटे सर यांनी आभार मानले. सचिन वाकचौरे, सचिन पापळ, अमोल वाकचौरे आणि संतोष कडलग या पालकांनी कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य केले.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,271
अकोले स्कुटी भेट
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

यशोधन कार्यालयाच्या पाठपुराव्यामुळे तालुक्यातील ८,६०० बांधकाम व असंघटित कामगारांच्या खात्यावर १० कोटी १६ लाख रुपये जमा

24/08/2026

साथी भास्करराव दुर्वे नाना यांच्या स्मृतीला अभिवादन: संगमनेरमध्ये तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

21/08/2026

संगमनेर तालुक्यात मुलींच्या स्वसंरक्षणासाठी ‘मुक्कामार’ अभियान सुरू; अभिनेत्री इशिता शर्मा व डॉ. जयश्रीताई थोरात यांचा स्तुत्य पुढाकार

18/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
व्याख्यान

‘कर्माकडून कृतार्थतेकडे’ जाण्यासाठी प्रत्येक कृतीत ईश्वरभाव जागवा: डॉ. संजय मालपाणी

By Annant Ppangarkar25/08/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: कर्म म्हणजे केवळ जगण्याची धावपळ किंवा जबाबदारीची पूर्तता…

पोलिसांची गुटख्याविरोधात मोठी कारवाई; सिनेस्टाईल पाठलाग करून ५१ लाखांचा मुद्देमाल जप्त

25/08/2026

संगमनेरमध्ये सह्याद्री कॉलेज शेजारील ‘बर्गेज कॅफे’वर पोलिसांची धाड; अश्लील चाळ्यांसाठी जागा पुरवणाऱ्या चालकावर गुन्हा दाखल

25/08/2026

निमोण-सोनेवाडीतील तरुणांचा शिवसेनेत प्रवेश, आमदार खताळ यांच्या कामाच्या पद्धतीवर विश्वास

25/08/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.