Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

पोलिसांच्या ताब्यात असलेल्या तरुणाला आमदार खताळ यांच्या कार्यकर्त्याकडून मारहाण; संदेश देशमुख यांच्यावर एनसी दाखल

01/09/2026

दारूच्या नशेत झालेल्या वादातून मारहाण करून हत्या करणाऱ्या आरोपीस जन्मठेप; संगमनेर न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

01/09/2026

महायुती सरकारचा मोठा निर्णय: भोजापूर पूरचारीचा नदीजोड प्रकल्पात समावेश; संगमनेर, सिन्नर तालुक्यातील दुष्काळी ३५ गावांना दिलासा!

01/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » राजशिष्टाचार मोडल्याने प्रशासनाचे कडक पाऊल; दोन तलाठी निलंबित, अप्पर जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि उपविभागीय अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस
प्रशासन

राजशिष्टाचार मोडल्याने प्रशासनाचे कडक पाऊल; दोन तलाठी निलंबित, अप्पर जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि उपविभागीय अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस

ठाकरे गटाचे माजी आमदार वैभव नाईक यांनी या घटनेवर नाराजी व्यक्त करत लाचलुचपत प्रतिबंधक विभागात कारवाई झालेल्या अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांचा सत्कार केल्याचा आरोप केला होता आणि तक्रार दाखल केली होती.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar14/05/2025No Comments1 Min Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज –

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्यात राजशिष्टाचार आणि सुरक्षा नियमांचे उल्लंघन झाल्यामुळे प्रशासनाने कठोर पाऊले उचलली आहेत. या प्रकरणी दोन तलाठ्यांना निलंबित करण्यात आले आहे, तर अप्पर जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि उपविभागीय अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.

सहाय्यक महसूल अधिकारी एस. पी. हांगे आणि ग्राम महसूल अधिकारी व्ही. व्ही. कंठाळे या दोन तलाठ्यांनी मुख्यालयात थांबण्याचे आदेश असूनही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या पूजन कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांचा सत्कार केला, ज्यामुळे राजशिष्टाचाराचे उल्लंघन झाले.

ठाकरे गटाचे माजी आमदार वैभव नाईक यांनी या घटनेवर नाराजी व्यक्त करत लाचलुचपत प्रतिबंधक विभागात कारवाई झालेल्या अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांचा सत्कार केल्याचा आरोप केला होता आणि तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनंतर जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी तातडीने दोन्ही तलाठ्यांचे निलंबनाचे आदेश जारी केले.

या दौऱ्यात मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेतही त्रुटी आढळल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी पोलीस अधीक्षकांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. तसेच, कार्यक्रमांवर योग्य नियंत्रण न ठेवल्याबद्दल संपर्क अधिकारी अप्पर जिल्हाधिकारी रवी पाटील आणि उपविभागीय महसूल अधिकारी जगदीश काकतकर यांनाही नोटीस जारी करून खुलासा मागितला आहे. ‘झेड प्लस’ सुरक्षा असताना तलाठ्यांनी कार्यक्रमाच्या ठिकाणी प्रवेश कसा मिळवला, याबद्दल प्रश्न उपस्थित झाले आहेत.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,354
कारवाई
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

पत्रकारावर हल्ला करणाऱ्या कुख्यात गुन्हेगार टोळीचे तोफखाना पोलिसांनी मोडले कंबरडे; केली ही मोठी कारवाई

26/08/2026

उसनवारीवरील कर्मचाऱ्यांना १० सप्टेंबरपर्यंत मूळ विभागात पाठवा; मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर मुख्य सचिवांचे कडक आदेश

25/08/2026

घारगाव पोलिसांची जुगार अड्ड्यावर धाड: २ लाख ५ हजार रुपयांच्या मुद्देमालासह ५ आरोपी ताब्यात

22/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

पोलिसांच्या ताब्यात असलेल्या तरुणाला आमदार खताळ यांच्या कार्यकर्त्याकडून मारहाण; संदेश देशमुख यांच्यावर एनसी दाखल

By Annant Ppangarkar01/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन  (विशेष प्रतिनिधी): संगमनेर शहरातील खांडेश्वर मंदिरात दर्शनासाठी आलेल्या एका…

दारूच्या नशेत झालेल्या वादातून मारहाण करून हत्या करणाऱ्या आरोपीस जन्मठेप; संगमनेर न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

01/09/2026

महायुती सरकारचा मोठा निर्णय: भोजापूर पूरचारीचा नदीजोड प्रकल्पात समावेश; संगमनेर, सिन्नर तालुक्यातील दुष्काळी ३५ गावांना दिलासा!

01/09/2026

आज मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

01/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.