Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

दुःखावर दुःखाचा डोंगर! नातेवाईकाच्या दशक्रिया विधीसाठी आलेल्या महिलेचा विजेच्या धक्क्याने दुर्दैवी मृत्यू

21/08/2026

५२ हजार रुपयांच्या अवैध अग्निशस्त्रासह युवक जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

21/08/2026

संगमनेरच्या डॉक्टरवर राहता पोलिसात गुन्हा दाखल! एकाचा मृत्यू, एक गंभीर

21/08/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » ‘प्रकाशवाट’ कठीण परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी प्रेरणादायी – माजी मंत्री बाळासाहेब थोरात
सामाजिक

‘प्रकाशवाट’ कठीण परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी प्रेरणादायी – माजी मंत्री बाळासाहेब थोरात

आमदार सत्यजित तांबे यांनी सुधाकर जोशी यांच्या मनुष्य जोडण्याच्या वृत्तीचे कौतुक केले.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar18/05/2025Updated:18/05/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

रविवार, दि. १८ मे – संगमनेर 

प्रत्येकाच्या आयुष्यात एक अनमोल कथा दडलेली असते आणि जीवनात मागे वळून सिंहावलोकन करणे महत्त्वाचे आहे. प्रकाशवाट हे पुस्तक कठीण परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी निश्चितच प्रेरणादायी ठरेल. या पुस्तकाचे लेखक संतोष खेडलेकर संगमनेरच्या सांस्कृतिक आणि साहित्यिक क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देत असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.

अमृतवाहिनी बँकेचे अध्यक्ष सुधाकर जोशी यांच्या जीवनप्रवासावर आधारित डॉ. संतोष खेडलेकर लिखित ‘प्रकाशवाट’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. मालपाणी लॉन्स येथे झालेल्या या कार्यक्रमात आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, कांचनताई थोरात, संजीवनी जोशी, श्रीमती प्रभावती जोशी, डॉ. जयश्री थोरात आणि माऊली सेवा प्रतिष्ठानचे डॉ. राजेंद्र धामणे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना थोरात म्हणाले, संघर्षातून मिळणारे यश अधिक समाधानाचे असते. जोशी यांनी आपल्या संस्कारांच्या बळावर बँकिंग क्षेत्रात एक कर्तव्यदक्ष आणि प्रामाणिक अधिकारी म्हणून उत्कृष्ट काम केले आहे. जीवनात चढ-उतार असले तरी, संघर्षातून पुढे गेल्यावर जीवनाचा खरा आनंद मिळतो, असेही ते म्हणाले.

डॉ. सुधीर तांबे यांनी खेडलेकर यांच्या साहित्यिक योगदानाचा गौरव केला, तर आमदार सत्यजित तांबे यांनी सुधाकर जोशी यांच्या मनुष्य जोडण्याच्या वृत्तीचे कौतुक केले. ‘प्रत्येकाने आपल्या जीवनाचा इतिहास लिहावा,’ अशी प्रेरणा या पुस्तकातून मिळेल, असे मत त्यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमात डॉ. जयश्री थोरात आणि डॉ. संतोष खेडलेकर यांनीही आपले विचार व्यक्त केले, तर सुधाकर जोशी यांनी उपस्थितांचे आभार मानले. या कार्यक्रमादरम्यान संगमनेर डाक विभागातर्फे विशेष पोस्ट तिकीटाचे अनावरण करण्यात आले.

या सोहळ्याला साहित्य, शिक्षण, समाजकारण आणि सहकार क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे स्वागत विष्णुपंत रहाटळ यांनी केले, प्रास्ताविक डॉ. संतोष खेडलेकर यांनी केले आणि आभार अमेय जोशी यांनी मानले.

डॉ. राजेंद्र धामणे यांचे मानवतेचे कार्य: बाळासाहेब थोरात यांनी डॉ. राजेंद्र धामणे आणि त्यांच्या पत्नी सुचिता यांच्या मानसिकदृष्ट्या खचलेल्या महिलांच्या सेवेसाठी केलेल्या कार्याचे कौतुक केले. हे कार्य अत्यंत सेवाभावी आणि परमेश्वरी सेवेसारखे असल्याचे त्यांनी म्हटले.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,047
पुस्तक प्रकाशन प्रकाशवाट बाळासाहेब थोरात संतोष खेडलेकर सत्यजित तांबे सुधीर तांबे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेर तालुक्यात मुलींच्या स्वसंरक्षणासाठी ‘मुक्कामार’ अभियान सुरू; अभिनेत्री इशिता शर्मा व डॉ. जयश्रीताई थोरात यांचा स्तुत्य पुढाकार

18/08/2026

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ द्या; संगमनेर येथील सोहळ्यात पानिपतकार विश्वास पाटील यांची मागणी

17/08/2026

मातोश्री प्रतिष्ठानतर्फे वृक्षारोपण, वृक्षसंवर्धनातूनच हरित भविष्याची पायाभरणी: आमदार अमोल खताळ

16/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
अपघात

दुःखावर दुःखाचा डोंगर! नातेवाईकाच्या दशक्रिया विधीसाठी आलेल्या महिलेचा विजेच्या धक्क्याने दुर्दैवी मृत्यू

By Annant Ppangarkar21/08/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: एका दुःखद प्रसंगासाठी एकत्र आलेल्या नातेवाईकांवर नियतीने आणखी एक भीषण…

५२ हजार रुपयांच्या अवैध अग्निशस्त्रासह युवक जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

21/08/2026

संगमनेरच्या डॉक्टरवर राहता पोलिसात गुन्हा दाखल! एकाचा मृत्यू, एक गंभीर

21/08/2026

अवैध गुटखा माफियांचे कंबरडे मोडले; स्थानिक गुन्हे शाखेची तब्बल ९४ लाख ६८ हजारांच्या मुद्देमालासह ५८ आरोपींवर धडक कारवाई

21/08/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.