Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

काळाची गरज ओळखून धाडसी दूरदृष्टीचे आणि शेतकरी हिताचे निर्णय घेणे आपली सामूहिक जबाबदारी; बाळासाहेब थोरात यांचे प्रतिपादन

17/09/2026

गणित-विज्ञानाची भीती पळाली दूर; ‘श्री मनोहर व्याख्यानमाले’त डॉ. निवास पाटील यांनी फुंकले विद्यार्थ्यांमध्ये चिकित्सक विचारांचे बळ

17/09/2026

नियमांचे उल्लंघन; राजापूर जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकांवर कारवाई होणार का? पालकांचा सवाल

17/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » दरोड्याचा कट उधळला; संगमनेर शहरात ५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल, २ अटकेत
गुन्हेगारी

दरोड्याचा कट उधळला; संगमनेर शहरात ५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल, २ अटकेत

रात्रपाळीच्या गस्तीवर असलेल्या पथकामध्ये पोलीस उपनिरीक्षक समीर अभंग, पोलीस उपअधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे यांच्या पथकातील पोलीस कॉन्स्टेबल राहुल सारबंदे, पोलीस नाईक राहुल डोके, पोलीस कॉन्स्टेबल विजय आगलावे, पोलीस कॉन्स्टेबल शशी दाभाडे, पोलीस कॉन्स्टेबल सुरेश मोरे आदींचा समावेश होता.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar21/05/2025Updated:21/05/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर, दि. २१ मे २०२५

संगमनेरचे पोलीस उपअधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे यांना मिळालेल्या माहितीनंतर गस्तीवर असलेल्या पोलिसांनी संगमनेर शहरात दरोड्याचा कट उधळून लावला आहे. २१ मे २०२५ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास सावजी हॉटेलसमोरील पुणे-नाशिक हायवे ब्रीजखाली दरोड्याच्या तयारीत असलेल्या ५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यापैकी दोघांना अटक करण्यात आली असून त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी न्यायालयाने सुनावली.

मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस शिपाई सुरेश बाळू मोरे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, संगमनेर शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर नंबर ४६/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम ३१० (४), ३१० (५) सह शस्त्र अधिनियम ४/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी रोहन अनिल अभंग (वय २७, रा. तांबे हॉस्पिटलसमोर, देवाचा मळा, संगमनेर, जि. अहिल्यानगर) आणि सोनू ऊर्फ अथर्व संतोष दुधाने (वय १९, रा. हॉस्पिटलसमोर, देवाचा मळा, संगमनेर, जि. अहिल्यानगर) या दोघांना पहाटे अटक करण्यात आली आहे. त्यांचे इतर साथीदार प्रेम विजय वाल्हेकर, निखिल उर्फ अजय विजय वाल्हेकर, जब्या वाल्हेकर (सर्व रा. अठरा पगड, गुंजाळवाडी, संगमनेर) आणि अशफाक शेख (रा. अकोले नाका, संगमनेर) फरार झाले आहेत.

पोलिसांनी घटनास्थळावरून दरोड्यासाठी वापरण्यात येणारी हत्यारे आणि साहित्य जप्त केले आहे. यामध्ये ६० सेमी लांबीची आणि ३.५ सेमी रुंदीची लोखंडी तलवार, ४१ सेमी लांबीचे आणि ४.५ सेमी रुंदीचे दोन कोयते, एक छोटा मनी पान्हा, एक स्टीलचे फायटर, एक लोखंडी पक्कड, दोन मोबाईल (एक विवो Y58, किंमत १५,००० रुपये आणि एक विवो १९३८, किंमत १५,००० रुपये), आणि लाल-काळ्या रंगाची हिरो स्प्लेंडर मोटारसायकल (क्रमांक एम. एच. १७ सीपी ६१८०, किंमत ७०,००० रुपये) असा एकूण सुमारे १,००,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

रात्रपाळीच्या गस्तीवर असलेल्या पथकामध्ये पोलीस उपनिरीक्षक समीर अभंग, पोलीस उपअधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे यांच्या पथकातील पोलीस कॉन्स्टेबल राहुल सारबंदे, पोलीस नाईक राहुल डोके, पोलीस कॉन्स्टेबल विजय आगलावे, पोलीस कॉन्स्टेबल शशी दाभाडे, पोलीस कॉन्स्टेबल सुरेश मोरे आदींचा समावेश होता. पेट्रोलिंग दरम्यान पथकाला घटनास्थळी संशयास्पद हालचाली आढळल्याने पथकाच्या चौकशीत हा प्रकार समोर आला. दोघांना पकडण्यात पोलिसांना यश आले तर अंधाराचा फायदा घेऊन चौघे पळून गेले. घटनेचा पुढील तपास स्वतः उपनिरीक्षक अभंग करत आहेत.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 3,061
गुन्हेगारी
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

ओम ज्वेलर्स चोरी प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेकडून पर्दाफाश; तिघांना अटक, मिरजगाव येथील गुन्ह्याचीही उकल

16/09/2026

पोलीस प्रशासनाचा मोठा निर्णय, गणेशोत्सवादरम्यान ‘यांना’ संगमनेर व अकोले तालुक्यात प्रवेश बंदीचे आदेश जारी___वाचा यादी

15/09/2026

सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर संगमनेर उपविभागात पोलीस प्रशासनाची मोठी कारवाई; गुन्हेगारी पार्श्वभूमीचे सात जण जिल्ह्यातून हद्दपार

15/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
शेती व सहकार

काळाची गरज ओळखून धाडसी दूरदृष्टीचे आणि शेतकरी हिताचे निर्णय घेणे आपली सामूहिक जबाबदारी; बाळासाहेब थोरात यांचे प्रतिपादन

By Annant Ppangarkar17/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – शेतकी सहकारी संघ ही शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची…

गणित-विज्ञानाची भीती पळाली दूर; ‘श्री मनोहर व्याख्यानमाले’त डॉ. निवास पाटील यांनी फुंकले विद्यार्थ्यांमध्ये चिकित्सक विचारांचे बळ

17/09/2026

नियमांचे उल्लंघन; राजापूर जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकांवर कारवाई होणार का? पालकांचा सवाल

17/09/2026

संगमनेर ग्रामीण भागात सायंकाळी वीज खंडित; गणेशोत्सवात नागरिक अंधारात, सरकारने घोषणांचा उत्सव थांबवून आधी ग्रामीण भागाला वीज द्यावी, काँग्रेसचे कार्याध्यक्ष शेलकर यांची मागणी

17/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.