Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

काळाची गरज ओळखून धाडसी दूरदृष्टीचे आणि शेतकरी हिताचे निर्णय घेणे आपली सामूहिक जबाबदारी; बाळासाहेब थोरात यांचे प्रतिपादन

17/09/2026

गणित-विज्ञानाची भीती पळाली दूर; ‘श्री मनोहर व्याख्यानमाले’त डॉ. निवास पाटील यांनी फुंकले विद्यार्थ्यांमध्ये चिकित्सक विचारांचे बळ

17/09/2026

नियमांचे उल्लंघन; राजापूर जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकांवर कारवाई होणार का? पालकांचा सवाल

17/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » ‘मकोका’चा दणका: अपहरण-खून करणाऱ्या सराईत टोळीवर कठोर कारवाई!
गुन्हेगारी

‘मकोका’चा दणका: अपहरण-खून करणाऱ्या सराईत टोळीवर कठोर कारवाई!

तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar22/05/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

अहिल्यानगर-
अहिल्यानगर जिल्ह्यात दहशत माजवणाऱ्या आणि अपहरण, खून, चोरी, घरफोडी यांसारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये गुंतलेल्या एका कुख्यात टोळीवर तोफखाना पोलिसांनी ‘महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम’ (मकोका) अंतर्गत मोठी कारवाई केली आहे. ११ जणांच्या या टोळीच्या अटकेमुळे अहिल्यानगरमध्ये पसरलेल्या भीतीला चाप बसला आहे.
गेल्या काही महिन्यांपासून नवनागापूर आणि आसपासच्या परिसरात या टोळीने गुन्हेगारीचा कळस गाठला होता. चोरी, खंडणी, मारामारी यांसारख्या कृत्यांसोबतच एका व्यक्तीचे अपहरण करून निर्घृण खून करण्यापर्यंत त्यांची मजल गेली होती. या वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिक दहशतीखाली होते.
या गंभीर परिस्थितीची दखल घेत तोफखाना पोलिसांनी एक विशेष पथक तयार केले. कसून तपास करत या टोळीच्या मुसक्या आवळण्यात आल्या असून, त्यांच्यावर ‘मकोका’ कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे संघटित गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिसांनी कठोर पाऊल उचलल्याचे स्पष्ट झाले आहे.
ही टोळी रात्रीच्या वेळी वाहनांमधून फिरून घरफोडी करत असे आणि त्यांचे गुन्हे पूर्वनियोजित पद्धतीने केले जात होते. आर्थिक फायदा मिळवणे आणि परिसरात दहशत निर्माण करणे हाच त्यांचा मुख्य उद्देश असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.
‘मकोका’ कायद्यान्वये कारवाई करण्यात आलेल्या आरोपींची नावे – अनिकेत विजय सोमवंशी (चेतना कॉलनी, नवनागापूर), सुमित बाळासाहेब थोरात (वय २४, गजानन कॉलनी, नवनागापूर), महेश मारुती पाटील (वय २६), नितीन अशोक ननवरे, करण सुंदर शिंदे (वय २६), विशाल दीपक कापरे (वय २२), रोहित बापूसाहेब गोसावी (वय २०) (सर्व रा. नवनागापूर), विकास अशोक गव्हाणे (वय २३, रा. वडगाव गुप्ता), स्वप्नील रमाकांत पाटील (वय २३), राहुल बंडू पाटोळे (वय १९), व हृतिक मनोज घोडके (वय १९, रा. नवनागापूर)
तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. विशेष पथकाने अत्यंत नियोजनबद्ध तपास करत सर्व आरोपींना ताब्यात घेतले. सध्या या टोळीच्या इतर साथीदारांवरही पोलिसांची करडी नजर आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,177
मकोका कारवाई संघटित गुन्हेगारी
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

ओम ज्वेलर्स चोरी प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेकडून पर्दाफाश; तिघांना अटक, मिरजगाव येथील गुन्ह्याचीही उकल

16/09/2026

पोलीस प्रशासनाचा मोठा निर्णय, गणेशोत्सवादरम्यान ‘यांना’ संगमनेर व अकोले तालुक्यात प्रवेश बंदीचे आदेश जारी___वाचा यादी

15/09/2026

सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर संगमनेर उपविभागात पोलीस प्रशासनाची मोठी कारवाई; गुन्हेगारी पार्श्वभूमीचे सात जण जिल्ह्यातून हद्दपार

15/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
शेती व सहकार

काळाची गरज ओळखून धाडसी दूरदृष्टीचे आणि शेतकरी हिताचे निर्णय घेणे आपली सामूहिक जबाबदारी; बाळासाहेब थोरात यांचे प्रतिपादन

By Annant Ppangarkar17/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – शेतकी सहकारी संघ ही शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची…

गणित-विज्ञानाची भीती पळाली दूर; ‘श्री मनोहर व्याख्यानमाले’त डॉ. निवास पाटील यांनी फुंकले विद्यार्थ्यांमध्ये चिकित्सक विचारांचे बळ

17/09/2026

नियमांचे उल्लंघन; राजापूर जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकांवर कारवाई होणार का? पालकांचा सवाल

17/09/2026

संगमनेर ग्रामीण भागात सायंकाळी वीज खंडित; गणेशोत्सवात नागरिक अंधारात, सरकारने घोषणांचा उत्सव थांबवून आधी ग्रामीण भागाला वीज द्यावी, काँग्रेसचे कार्याध्यक्ष शेलकर यांची मागणी

17/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.