Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

रविवार विशेष लेख – भगव्या देशा.. अनपढ देशा.. मोदींच्या देशा…

August 2, 2026

रविवार, ०२ ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

August 2, 2026

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे संगमनेर शहरात अद्यावत स्मारक उभारणार : माजी आमदार डॉ. सुधीर तांबे

August 1, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » घुलेवाडी येथे दोन वाहने जाळली, लाखोंचे नुकसान; अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल
गुन्हेगारी

घुलेवाडी येथे दोन वाहने जाळली, लाखोंचे नुकसान; अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल

पुणे, मुंबई, नाशिकसारख्या मोठ्या शहरांमध्ये वाहने जाळण्याच्या घटना वारंवार घडत असतात, पण आता संगमनेरसारख्या ग्रामीण भागातही अशा घटनांचे लोण पसरल्याने नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे.
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरMay 22, 2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर- 

संगमनेर शहरालगतच्या घुलेवाडी येथील अनिल गंगाधर राऊत यांच्या घराजवळ लावलेली टेम्पो ट्रॅव्हलर आणि टाटा विंगर अशी सुमारे १० लाख रुपये किमतीची दोन चारचाकी वाहने अज्ञात व्यक्तींनी जाळल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (दि. २०) मध्यरात्री घडली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

शहर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अनिल गंगाधर राऊत (वय ४६, रा. घुलेवाडी) यांचा ट्रॅव्हलचा व्यवसाय आहे. त्यांच्या मालकीची टाटा विंगर (क्र. एमएच ०८ आर ८८०४, किंमत २ लाख ९८ हजार रुपये) आणि टेम्पो ट्रॅव्हलर (क्र. एमएच ०४ जीपी ३३३२, किंमत ६ लाख ९५ हजार रुपये) ही दोन वाहने त्यांनी नेहमीप्रमाणे रात्री घरासमोर पार्क केली होती. मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी ही दोन्ही वाहने पेटवून दिली.

रस्त्याने जाणाऱ्या वाहनधारकांनी आणि पहाटे फिरायला निघालेल्या नागरिकांनी ही घटना पाहिल्यानंतर तात्काळ हॉर्न वाजवून राऊत कुटुंबीयांना माहिती दिली. मात्र, घरातील सदस्य बाहेर येईपर्यंत दोन्ही वाहनांनी पूर्णपणे पेट घेतला होता, त्यामुळे आग विझवणे शक्य झाले नाही. या आगीत दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.

या घटनेप्रकरणी अनिल राऊत यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रावसाहेब लोखंडे करत आहेत.

ग्रामीण भागातही गुन्हेगारीचे लोण… पुणे, मुंबई, नाशिकसारख्या मोठ्या शहरांमध्ये वाहने जाळण्याच्या घटना वारंवार घडत असतात, पण आता संगमनेरसारख्या ग्रामीण भागातही अशा घटनांचे लोण पसरल्याने नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. अज्ञात व्यक्तींनी वाहने जाळल्याच्या या घटनेचा पोलिसांनी तातडीने तपास लावून आरोपींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 1,327
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

संगमनेर तालुक्यात लपून-छपून उरकला बालविवाह; ५ जणांवर घारगाव पोलिसांत गुन्हा

July 30, 2026

कचरा वेचण्याच्या बहाण्याने ‘रेकी’; बंद घरे गाठून घरफोडी करणाऱ्या दोन महिला जेरबंद

July 25, 2026

संघटित गुन्हेगारीविरोधात मोठे पाऊल; गोवंश तस्करीप्रकरणी ‘बीएनएस’ कलम १११ अन्वये दोघांवर पहिली मोठी कारवाई संगमनेरात

July 24, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
विश्लेषण

रविवार विशेष लेख – भगव्या देशा.. अनपढ देशा.. मोदींच्या देशा…

By अनंत पांगारकरAugust 2, 20260

प्रवीण पुरो  केंद्र सरकारच्या नव्या शिक्षण अभियानांतर्गत शैक्षणिक व्यवस्थेत करण्यात आलेल्या बदलाचे विपरीत आणि दीर्घकालीन…

रविवार, ०२ ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

August 2, 2026

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे संगमनेर शहरात अद्यावत स्मारक उभारणार : माजी आमदार डॉ. सुधीर तांबे

August 1, 2026

‘कडलग इन्व्हेस्टमेंट’च्या आर्थिक साक्षरता कार्यशाळेला गुंतवणूकदारांचा प्रतिसाद

August 1, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.