Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

काळाची गरज ओळखून धाडसी दूरदृष्टीचे आणि शेतकरी हिताचे निर्णय घेणे आपली सामूहिक जबाबदारी; बाळासाहेब थोरात यांचे प्रतिपादन

17/09/2026

गणित-विज्ञानाची भीती पळाली दूर; ‘श्री मनोहर व्याख्यानमाले’त डॉ. निवास पाटील यांनी फुंकले विद्यार्थ्यांमध्ये चिकित्सक विचारांचे बळ

17/09/2026

नियमांचे उल्लंघन; राजापूर जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकांवर कारवाई होणार का? पालकांचा सवाल

17/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेरमधील कृषी सेवा केंद्रातील चोरीचा उलगडा; लाखोंचा मुद्देमाल हस्तगत, ३ आरोपी अटकेत
गुन्हेगारी

संगमनेरमधील कृषी सेवा केंद्रातील चोरीचा उलगडा; लाखोंचा मुद्देमाल हस्तगत, ३ आरोपी अटकेत

ताब्यात घेतलेल्या आरोपींना जप्त मुद्देमालासह आश्वी पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले असून, पुढील तपास आश्वी पोलीस करत आहेत.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar22/05/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

अहिल्यानगर / संगमनेर – प्रतिनिधी 

संगमनेर तालुक्यातील पिंप्रीलौकी येथील एका कृषी सेवा केंद्रात झालेल्या धाडसी घरफोडीचा अखेर उलगडा झाला आहे. स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगरच्या पथकाने अत्यंत गुप्त माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे या घरफोडीतील तीन मुख्य आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. त्यांच्या ताब्यातून सुमारे ८.५७ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पिंप्रीलौकी येथील व्यापारी संदीप पोपट गिते यांच्या कृषी सेवा केंद्राचे पत्रे उचकटून चोरट्यांनी दुकानातील शेती उपयोगी साहित्य आणि रसायने चोरून नेली होती. याप्रकरणी आश्वी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आश्वी पोलीस या प्रकरणी तपास करत होते.

दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली संदीप पवार, गणेश धोत्रे, फुरकान शेख, प्रमोद जाधव, मयुर गायकवाड, प्रशांत राठोड आणि महादेव भांड या पोलीस अंमलदारांच्या पथकाने आरोपींचा शोध सुरू केला. पथकाला या संदर्भात गोपनीय माहिती मिळाली की, काही संशयित व्यक्ती एमएच २१ बीएच ५४४३ या पीकअप गाडीतून अहिल्यानगर ते छत्रपती संभाजीनगर रस्त्यालगत असलेल्या आशीर्वाद मंगल कार्यालयाजवळ शेतीची औषधे संशयास्पदरित्या विकत आहेत.

या माहितीच्या आधारे पथकाने तात्काळ कारवाई करत गणेश विठ्ठल आव्हाड (वय २३, रा. गजानन कॉलनी, वडगाव गुप्ता, अहिल्यानगर), राज संदीप गायकवाड (वय २४, रा. विळद, ता. अहिल्यानगर) आणि आदित्य संतोष इंगोले (वय २३, रा. गजानन कॉलनी, वडगाव गुप्ता, ता. अहिल्यानगर) या तिघांना ताब्यात घेतले.

८.५७ लाखांचा मुद्देमाल जप्त!… पीकअप गाडीची तपासणी केली असता, त्यात चोरी केलेली शेतीची औषधे आणि रसायने आढळून आली. पोलिसांनी आरोपींकडून महिंद्रा कंपनीचा पीकअप, विविध प्रकारची कीटकनाशके, औषधे आणि मोबाईल फोन असा एकूण ८ लाख ५७ हजार ३९२ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

पोलिसांनी केलेल्या चौकशीत आरोपींनी १६ मे रोजी पहाटे पिंप्रीलौकी फाटा, शिबलापूर, ता. संगमनेर येथील कृषी सेवा केंद्रात पत्रे उचकटून चोरी केल्याची कबुली दिली. ताब्यात घेतलेल्या आरोपींना जप्त मुद्देमालासह आश्वी पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले असून, पुढील तपास आश्वी पोलीस करत आहेत.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 2,360
एलसीबी
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

ओम ज्वेलर्स चोरी प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेकडून पर्दाफाश; तिघांना अटक, मिरजगाव येथील गुन्ह्याचीही उकल

16/09/2026

पोलीस प्रशासनाचा मोठा निर्णय, गणेशोत्सवादरम्यान ‘यांना’ संगमनेर व अकोले तालुक्यात प्रवेश बंदीचे आदेश जारी___वाचा यादी

15/09/2026

सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर संगमनेर उपविभागात पोलीस प्रशासनाची मोठी कारवाई; गुन्हेगारी पार्श्वभूमीचे सात जण जिल्ह्यातून हद्दपार

15/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
शेती व सहकार

काळाची गरज ओळखून धाडसी दूरदृष्टीचे आणि शेतकरी हिताचे निर्णय घेणे आपली सामूहिक जबाबदारी; बाळासाहेब थोरात यांचे प्रतिपादन

By Annant Ppangarkar17/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – शेतकी सहकारी संघ ही शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची…

गणित-विज्ञानाची भीती पळाली दूर; ‘श्री मनोहर व्याख्यानमाले’त डॉ. निवास पाटील यांनी फुंकले विद्यार्थ्यांमध्ये चिकित्सक विचारांचे बळ

17/09/2026

नियमांचे उल्लंघन; राजापूर जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकांवर कारवाई होणार का? पालकांचा सवाल

17/09/2026

संगमनेर ग्रामीण भागात सायंकाळी वीज खंडित; गणेशोत्सवात नागरिक अंधारात, सरकारने घोषणांचा उत्सव थांबवून आधी ग्रामीण भागाला वीज द्यावी, काँग्रेसचे कार्याध्यक्ष शेलकर यांची मागणी

17/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.