Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

MPSC आंदोलनाला डॉ. जयश्रीताई थोरात यांचा पाठिंबा; समाज आणि आयोगातील ब्लड कॅन्सर ठीक करायचाय!

10/10/2026

आमदार अमोल खताळ यांनी वेधले ऊर्जा राज्यमंत्र्यांचे लक्ष; मेंढवन उपकेंद्राचे काम तातडीने सुरू करण्याची मागणी

10/10/2026

शनिवार १० ऑक्टोंबर — जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा असेल

10/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » आमदार सत्यजित तांबेंकडून साकूर ग्रामीण रुग्णालयाची पाहणी: आरोग्यसेवेची प्रशंसा, निधीसाठी पाठपुरावा करणार
आरोग्य

आमदार सत्यजित तांबेंकडून साकूर ग्रामीण रुग्णालयाची पाहणी: आरोग्यसेवेची प्रशंसा, निधीसाठी पाठपुरावा करणार

येथील डॉक्टरही आग्रही आहेत की या छोट्या-छोट्या अडचणी दूर झाल्या पाहिजेत. आज सर्वत्र निधीअभावी अडचणी निर्माण होत असल्या तरी साकूर ग्रामीण रुग्णालय हा माझा जिव्हाळ्याचा प्रकल्प आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar24/05/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर – प्रतिनिधी

नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांनी गुरुवारी (२२ मे) दुपारी साकूर येथील ग्रामीण रुग्णालयाला भेट देऊन तेथील आरोग्य सुविधांची पाहणी केली. सध्या काही अडचणींचा सामना करत असले तरी रुग्णालयातील डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांच्या सेवेची त्यांनी प्रशंसा केली. या रुग्णालयाची स्थापना आपल्या जिल्हा परिषद सदस्यपदाच्या कार्यकाळात झाली असल्याने ही वास्तू आपल्या जिव्हाळ्याचा विषय असल्याचेही तांबे यांनी सांगितले.

रुग्णालयाच्या सद्यस्थितीबद्दल माहिती मिळाल्यानंतर आमदार तांबे यांनी तातडीने रुग्णालयाला भेट दिली. यावेळी त्यांच्यासोबत कारखान्याचे संचालक इंद्रजीत खेमनर यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. त्यांनी रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रल्हाद बांबळे आणि कर्मचाऱ्यांशी संवाद साधून अडचणींचा आढावा घेतला. यानंतर संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

आमदार सत्यजित तांबे यांनी साकूर ग्रामीण रुग्णालयाशी असलेल्या आपल्या भावनिक बांधिलकीचा पुनरुच्चार केला. २०१२ साली जिल्हा परिषद सदस्य असताना या ग्रामीण रुग्णालयाचा प्रस्ताव त्यांनी मंजूर करून घेतला होता. २०१४ मध्ये भूमिपूजन झाले आणि २०१६ मध्ये बांधकाम पूर्ण झाले. साकूरमध्येच हे रुग्णालय व्हावे यासाठी स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या आग्रहाने विशेष प्रयत्न केले आणि आज या परिसरातील नागरिकांसाठी ही आरोग्य सेवा अत्यंत उपयुक्त ठरत असल्याचे त्यांनी सांगितले.

सध्या या रुग्णालयात दरमहा १० ते १५ प्रसूती होत असून, दररोज सुमारे १२५ रुग्णांची तपासणी केली जाते. सद्यस्थितीत १० ते १५ रुग्ण येथे दाखल (अ‍ॅडमिट) आहेत. या आकडेवारीवरून येथील सेवा किती उपयोगी पडते हे स्पष्ट होते, असेही तांबे यांनी नमूद केले. रुग्णालयाची इमारत चांगल्या प्रकारे कार्यरत असली तरी, काही अडचणी अजूनही असल्याचे आमदार तांबे यांनी मान्य केले. त्यांनी या अडचणी समजून घेतल्या असून, सार्वजनिक बांधकाम विभागाला प्रस्ताव तयार करून आरोग्य विभागाकडे पाठवण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानंतर आपण स्वतः पाठपुरावा करून आवश्यक निधी आणणार असल्याचे त्यांनी सांगितले, जेणेकरून उर्वरित सुविधाही पूर्ण करता येतील.

साकुर ग्रामीण रुग्णालयाची पाहणी करताना आमदार सत्यजित तांबे.

या छोट्या-छोट्या अडचणी दूर झाल्या पाहिजेत, यासाठी येथील डॉक्टरही आग्रही आहेत. आज सर्वत्र निधीअभावी अडचणी निर्माण होत असल्या तरी साकूर ग्रामीण रुग्णालय हा माझा जिव्हाळ्याचा प्रकल्प आहे. त्यामुळे यासाठी मी कटिबद्ध आहे. येत्या काळात निधी उपलब्ध करून देण्याचा पूर्ण प्रयत्न केला जाईल,” असे आश्वासन आमदार तांबे यांनी दिले. त्यांच्या या पाहणी दौऱ्यामुळे साकूर ग्रामीण रुग्णालयाच्या विकासाला गती मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 847
पाहणी दौरा सत्यजित तांबे साकुर रुग्णालय
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

दुष्काळाची पाहणी करण्यासाठी उद्या केंद्रीय पथक अहिल्यानगर जिल्ह्यात; शेती व पाणी परिस्थितीचा घेणार आढावा

08/10/2026

एक सशक्त आणि अष्टपैलू अभिनेता काळाच्या पडद्याआड गेला; संगमनेरमधून या नेत्यांनी वाहिली श्रद्धांजली

08/10/2026

नाशिक-पुणे रेल्वे सिन्नर-संगमनेर मार्गानेच झाली पाहिजे! आमदार सत्यजीत तांबे यांचा सरकारला थेट इशारा, अन्यथा आता मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे रोखणार

01/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
महाराष्ट्र संवाद विशेष

MPSC आंदोलनाला डॉ. जयश्रीताई थोरात यांचा पाठिंबा; समाज आणि आयोगातील ब्लड कॅन्सर ठीक करायचाय!

By Annant Ppangarkar10/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- पुण्यात विविध मागण्यांसाठी गेल्या नऊ दिवसांपासून सुरू असलेल्या MPSC परीक्षार्थींच्या आंदोलनाला…

आमदार अमोल खताळ यांनी वेधले ऊर्जा राज्यमंत्र्यांचे लक्ष; मेंढवन उपकेंद्राचे काम तातडीने सुरू करण्याची मागणी

10/10/2026

शनिवार १० ऑक्टोंबर — जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा असेल

10/10/2026

३९ ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त, तरी आरोपीला जामीन! संगमनेर न्यायालयाच्या आदेशात नेमके काय?

09/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.