Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आंदोलनाची हवा काढण्यासाठीच मुख्यमंत्र्यांची भेट? : अमोल शेलकर यांचा घणाघात, पालकमंत्री व लोकप्रतिनिधींवर संगमनेरच्या हक्काची रेल्वे हिरावल्याचा थेट आरोप; कागदपत्रे सार्वजनिक करण्याचे आव्हान

09/09/2026

गणेश विसर्जनासाठी प्रवरा नदीपात्रात तातडीने पाणी सोडण्यासंदर्भात नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

09/09/2026

संगमनेर शहरात गणेशोत्सवाची जोरदार तयारी: खड्डेमुक्त रस्ते आणि मंडळांच्या समस्या सोडवण्यावर नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांचा भर

09/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » ॲट्रॉसिटी, बालमजूर आणि वेठबिगार कायद्यांतर्गतच्या गुन्ह्यात मुख्य आरोपींना जामीन मंजूर, संगमनेर सत्र न्यायालयाचा निर्णय
न्यायालय

ॲट्रॉसिटी, बालमजूर आणि वेठबिगार कायद्यांतर्गतच्या गुन्ह्यात मुख्य आरोपींना जामीन मंजूर, संगमनेर सत्र न्यायालयाचा निर्णय

दगडखाणींवर अत्यंत हालाखीच्या परिस्थितीत काम करत असलेल्या ३८ वेठबिगार आणि ३१ बालकामगारांची प्रशासनाने यशस्वीरित्या सुटका केली होती.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar24/05/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर – प्रतिनिधी
शेंडेवाडी, साकूर आणि पिंपळगाव देपा येथील कारवाईत अटक करण्यात आलेले ॲट्रॉसिटी, बालमजूर कायदा आणि वेठबिगार कामगार कायद्यांतर्गतच्या गुन्ह्यातील मुख्य आरोपी सुभाष राठोड आणि मधुकर दळवी यांना संगमनेर सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. प्रत्येकी २५,००० रुपयांच्या जामिनावर त्यांना मुक्त करण्याचे आदेश न्यायालयाने दिले.
आरोपींच्या वतीने युक्तिवाद करताना ॲड. हृषीकेश वाणी यांनी न्यायालयासमोर महत्त्वाचे मुद्दे मांडले. फिर्याद दाखल करण्यास तब्बल १० वर्षांचा उशीर झाला असून, फिर्यादीत नमूद केलेले गुन्हे आरोपींविरुद्ध लागू होत नाहीत, असा युक्तिवाद त्यांनी केला. तसेच, आरोपींनी कोणताही गुन्हा केलेला नसून, त्यांना या प्रकरणात फसवण्यात आल्याचेही त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणले.
ॲड. हृषीकेश वाणी यांच्यासोबत ॲड. प्रशांत गुंजाळ यांनीही आरोपींची बाजू मांडली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर, संगमनेरचे अतिरिक्त व सत्र न्यायाधीश शेख यांच्या न्यायालयाने आरोपींना जामीन मंजूर करण्याचा निर्णय दिला. या निर्णयामुळे राठोड आणि दळवी यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
संगमनेर तालुक्यातील शेंडेवाडी, साकूर, पिंपळगाव, कौठे मलकापूर आणि कर्जुले पठार भागातील दगडखाणींवर अत्यंत हालाखीच्या परिस्थितीत काम करत असलेल्या ३८ वेठबिगार आणि ३१ बालकामगारांची प्रशासनाने यशस्वीरित्या सुटका केली होती.
जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांना मिळालेल्या तक्रारीनंतर प्रशासनाने तातडीने आणि प्रभावीपणे ही कारवाई केली होती. मुक्त करण्यात आलेल्या ३८ वेठबिगार कामगारांमध्ये २२ पुरुष आणि १६ महिलांचा समावेश असून या गंभीर प्रकरणी संबंधित ठेकेदारांवर घारगाव पोलीस ठाण्यात वेठबिगार प्रतिबंधक कायद्यासह कठोर कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,054
अतिरिक्त व जिल्हा सत्र न्यायालय ऋषिकेश वाणी जामीन
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

फायनान्सचा चेक बाऊन्स: अकोले तालुक्यातील कर्जदाराला ६ महिने कारावास आणि दुप्पट दंडाची शिक्षा

04/09/2026

संगमनेर सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल: प्राणघातक हल्ल्याप्रकरणी तिघा आरोपींची २ वर्षांची सक्तमजुरी कायम

02/09/2026

दारूच्या नशेत झालेल्या वादातून मारहाण करून हत्या करणाऱ्या आरोपीस जन्मठेप; संगमनेर न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

01/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

आंदोलनाची हवा काढण्यासाठीच मुख्यमंत्र्यांची भेट? : अमोल शेलकर यांचा घणाघात, पालकमंत्री व लोकप्रतिनिधींवर संगमनेरच्या हक्काची रेल्वे हिरावल्याचा थेट आरोप; कागदपत्रे सार्वजनिक करण्याचे आव्हान

By Annant Ppangarkar09/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – संगमनेर मार्गे जाणारा पुणे–नाशिक सेमीस्पीड रेल्वे प्रकल्प GMRT…

गणेश विसर्जनासाठी प्रवरा नदीपात्रात तातडीने पाणी सोडण्यासंदर्भात नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

09/09/2026

संगमनेर शहरात गणेशोत्सवाची जोरदार तयारी: खड्डेमुक्त रस्ते आणि मंडळांच्या समस्या सोडवण्यावर नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांचा भर

09/09/2026

सोशल मीडिया रिल्सच्या प्रभावापासून दूर राहून तरुणांनी ‘गुंतवणूक भान’ जपावे : सुनील कडलग

09/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.