Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

उसनवारीवरील कर्मचाऱ्यांना १० सप्टेंबरपर्यंत मूळ विभागात पाठवा; मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर मुख्य सचिवांचे कडक आदेश

25/08/2026

‘कर्माकडून कृतार्थतेकडे’ जाण्यासाठी प्रत्येक कृतीत ईश्वरभाव जागवा: डॉ. संजय मालपाणी

25/08/2026

पोलिसांची गुटख्याविरोधात मोठी कारवाई; सिनेस्टाईल पाठलाग करून ५१ लाखांचा मुद्देमाल जप्त

25/08/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » रविवार विशेष लेख… विजय शहाचं थोबाड कधी फोडणार ?
विश्लेषण

रविवार विशेष लेख… विजय शहाचं थोबाड कधी फोडणार ?

लेखक दैनिक आपलं महानगरचे माजी निवासी संपादक असून मुंबईतील जेष्ठ पत्रकार व राजकीय विश्लेषकआहेत.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar25/05/2025No Comments5 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

सत्ता असली म्हणजे आपण काहीही करायला मोकळं, अशी स्वत:ची समज करून घेणार्‍या भाजपच्या नेत्यांना मनाची तर नाहीच, पण आता जनाचीही काही वाटत नाही, असंच दिसू लागलंय. आपल्याच मुख्यमंत्र्याच्या पत्नीला कधी देवरच्याही सोबत चला, असं सांगणारा माणूस एका राज्याचा मंत्री बनू शकतो, इतकी तर्‍हेवाईक स्थिती देशात प्रथमच निर्माण झाली आहे. देवर बनू पाहणार्‍या या माणसाच्या लाथ हाणून त्याला शिवराजसिंह चौहाण यांनी आपल्या मंत्रिमंडळातून दूर केलं. पण चार महिन्यातच हा माणूस पुन्हा चौहाण यांच्या मंत्रिमंडळात दाखल झाला. यावरून त्याचे दिल्लीपर्यंत पोहोचलेले हात काय ते सांगून जातात. एकदा आदिवासी विद्यार्थीनींच्या वसतीगृहाला भेट देताना या माणसाने विद्यार्थीनीच्या टीशर्टवर फाजील वक्तव्यं केलं होतं. तेव्हाही मध्यप्रदेशात टीकेचे बाण सुटले होते. पण तरीही त्याचं काही बिघडलं नाही. असं वाह्यात बडबडणार्‍या नेत्याला काँग्रेसच्या सत्ताकाळात घरचा रस्ता दाखवला जायचा. भाजपच्या सत्तेत अशा उपटसुंभ्यांची चलती आहे. असं कोणी बडबडेल त्याचं प्रमोशन करण्याची अनोखी पध्दत या सत्तेने अवलंबली आहे. यामुळेच देवरचा हात मागणारा विकृत मंत्री विजय शहा सत्तेत मंत्री म्हणून मिरवत आहे. आपलं कोणी वाकडं करणार नाही, अशा खात्रीनेच ही माणसं पुढे कसंही वागतात. वायू दलातील कर्नल सोफिया कुरेशी यांच्यावर त्या मुस्लिम आहेत म्हणून दुगाण्या झाडणार्‍या या नालायक मंत्र्याच्या विरोधात मध्यप्रदेशच्या उच्च न्यायालयाने गुन्हा नोदवण्याचा आदेश दिला नसता तर नवलच. सारे आपल्या खिशात असल्याच्या अविर्भावात वर्तन करणार्‍या मंत्र्याला खरं तर घरातून उचलून तुरुंगात टाकायला हवं होतं. पण आजही आपल्याकडे कायद्याचं राज्य आहे, यामुळेच हा शहा बाहेर राहून स्वत:चा बचाव करत आहे. न्यायाचे दरवाजे कायद्याच्या राज्याप्रमाणे उघडत आहेत, असं मानून स्वत:चं समाधान करण्यावाचून आपल्याकडे पर्याय नाही. सार्‍या यंत्रणा सत्तेच्या बटिक झाल्यावर कायद्याच्या राज्यात न्याय मिळेल, अशा आशेवर राहणं इतकंच आपल्या हाती आहे. एकीकडे पाकिस्तानला शहाणपणाचे धडे गिरवण्याचा संदेश दिला म्हणून राज्यशास्त्राच्या विभागप्रमुख असलेल्या प्राध्यापकाला तो मुस्लिम असल्याने एका रात्रीत अटक होऊ शकते, पण आपल्याच संरक्षण दलातील जाँबाज महिला अधिकार्‍याविरोधात घृणास्पद वक्तव्यं करणारा नालायक मंत्री बाहेर मजा मारतो, हेच आपल्या लोकशाहीचं दुर्देवं होय.

न्यायालयात सचोटीचे न्यायाधीश आहेत, म्हणून शहाविरोधात एफआयआर नोंदवण्याचा आदेश निघू शकला. कोणी रंजन गोगईसारखा विकावू न्यायाधीश असता तर याकडे ढुंकूनही पाहिलं नसतं. यामुळेच दिल्लीपर्यंत हात पोहोचलेल्या शहाविरोधी गुन्हा नोंदवण्याचा आदेश देणारे मध्यप्रदेश उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अतुल श्रीधरन यांचं करावं तितकं कौतुक कमीच आहे. ज्या व्यवस्थेत न्यायमूर्तींचा न्याय देण्याचा अधिकार संकुचित केला जातो त्या व्यवस्थेला ठोकरून मंत्र्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचा आदेश देणं हे खरंच कौतुकास्पद म्हटलं पाहिजे. या मंत्र्याचा माज इतका वाढला की तो हायकोर्टाच्या न्यायमूर्तींनाही जुमानेसा राहिला नाही. त्याने थेट सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले. तिथेही मुस्कट फुटल्यावर ‘मला माझ्याच वक्तव्याची लाज वाटते’ असं सांगत स्वत:ची सुटका करून घेण्याचा प्रयत्न या नालायक माणसाने केला.

ज्या इंदूरच्या महू जिल्ह्यात रायकुंडा इथे हा मंत्री बडबडला त्या ठिकाणी उपस्थित असलेल्यांनी मंत्र्याच्या शेरेबाजीवर टाळ्या वाजवल्या, हे तर अगदीच भयानक म्हटलं पाहिजे. कोण्या एकाने जाब विचारण्याची हिंमत केली असती तर मंत्र्याला तिथेच माफी मागायला लागली असती. त्याऐवजी ताटाखालची मांजरं झालेल्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी मंत्र्याच्या असल्या वक्तव्याला दाद देत आपणही मंत्र्यासारखे नालायक आहोत, हे दाखवून दिलं. खरं तर मंत्री आणि त्याला ऐकणार्‍यांविरोधी राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल व्हायला हवा. जो मंत्री सोफिया कुरेशींविरोधात त्या मुस्लिम आहेत म्हणून दहशतवाद्याची बहीण ठरवण्याचा गुन्हा करतो त्या मंत्र्याविरोधी कारवाई करण्याची तयारी भाजप दाखवत नाही आणि एकही भाजपवाला त्या मंत्र्याविरोधात साधी प्रतिक्रियाही देत नाही, हे तर भयानक आहे. भाजपच्या या मंत्र्याऐवजी इतर कोण्या विरोधी पक्षाच्या नेत्याने असं वर्तन केलं असतं तर भाजपने त्याला सळो की पळो करून सोडलं असतं. त्याचे पुतळे रस्तोरस्ती पेटले असते. एकीकडे सारा देश सशस्त्र दलाच्या अधिकारी आणि सैनिकांचं कौतुक करत असताना मुस्लिम असलेल्या अधिकार्‍यावर शिंतोडे उडवतो म्हटल्यावर या मंत्र्याला पक्षाने लागलीच घरी बसवायला हवं होतं. त्याऐवजी अशा मंत्र्याला आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी फॉलो करतात तेव्हा मंत्र्याचा आब वाढतो आणि तो देवरचा हात पकडता पकडता संरक्षण दलातील महिला अधिकार्‍यांना दहशतवादी ठरवतो.

या मंत्र्याविरोधी कारवाई करण्यासाठी कायद्यात कलम नाही, असं मत नोंदवणार्‍या हायकोर्टाने या मंत्र्याची लायकीच दाखवून दिली आहे. न्यायालयाने स्वत:हून या घटनेची दखल घेतली नसती तर कोणालाही त्याचं कोणालाच गांभीर्य कळलं नसतं. गांभीर्य समजण्यासाठी यंत्रणा जागी असावी लागते आणि जनता सजग. सत्तेतील यंत्रणा मृत आणि जनता मुर्दाड बनल्याने मंत्र्याला जाब विचारला जाण्याची शक्यता नव्हतीच. हायकोर्टात श्रीधरन यांच्यासारखे न्यायमूर्ती नसते तर कितीकांनी याची दखल घेतली असती हाही संशोधनाचा विषय आहे. ज्या देशात ब्रिजगोपाळ लोया यांच्यासारख्या सचोटीच्या न्यायमूर्तीच्या मृत्यूला न्याय मिळू शकत नाही, त्या देशातील न्यायमूर्तींनी अशी हिंमत दाखवणं हे अनोखंच होय.

ज्या कुरेशींवर शहाने टीका केली त्या सोफिया यांच्या वा त्यांच्या कुटुंबियांविषयी या माणसाने जराही जाणलं असतं तर थोबाड उघडण्याची हिंमत केली नसती. कर्नल पदापर्यंत पोहोचलेल्या सोफिया यांचं सारं घराणंच देश सेवेसाठी वाहिलेलं आहे. त्यांचे आजोबा आणि वडील भारतीय सैन्यात आणि पती मॅकेनाईज्ड इन्फंट्रीमधील अधिकारी आहेत. संयुक्त राष्ट्रसंघाच्या शांती सेनेचे नेतृत्व करणार्‍या त्या भारतातील एकमेव महिला अधिकारी होत. त्या मुस्लिम आहेत हा त्यांचा दोष कसा असू शकतो?

देशातल्या सत्तेच्या मनात मुस्लिमांविषयी असलेली अडी लपून राहिलेली नाही. पहेलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात विनय नरवाल या नौदलातील लेफ्टनंटंना जिवे मारणार्‍या दहशतवाद्यांची शिक्षा कश्मीर आणि देशातील मुस्लिमांना नको, ते ही आपले बांधव आहेत, असं सांगणार्‍या नरवाल यांच्या पत्नी हिमांशी यांना सत्तेच्या बटीकांनी केलेलं ट्रोल पाहिलं की या मंडळींच्या मनात मुस्लिमांविषयी किती घृणा आहे ते लक्षात येतं. सारा देश आणि जगातील असंख्य नागरीक हिमांशी यांच्या वक्तव्याचं समर्थन करत असताना ही पिलावळ हिमांशी यांना देशद्रोही ठरवत होती.

हिमांशीचं दहशतवाद्याशी विवाह घडवून आणा इथपर्यंत पोहोचली होती. त्यांना गोळ्या घाला असं म्हणत होती, इतकी नीच पातळी सत्तेतील धर्मांधांनी घेतली आहे. मुस्लिम द्वेषाची सत्तेला लागलेली लूथ इतकी गंभीर आहे की ती नावाजलेल्या विचारवंतांना, प्राध्यापकांनाही सोडत नाही. हरियाणातील अशोका विद्यापीठातील प्रज्ञावान प्राध्यापक अली खान महेमुदाबाद यांच्यावरील कारवाईने तर सत्तेच्या अब्रूची लक्तरंच निघाली आहेत. भारतीय संरक्षण दलाने शिकवलेल्या धड्याची जाणीव पाकिस्तानला देणार्‍या दोन जाँबाज महिला अधिकार्‍यांच्या कौतुकाची फेकबूक पोस्ट टाकणार्‍या अली खान यांनी हाच एकोपा देशात बुलडोझर आणि मॉबलिंचिंग राज चालवणार्‍यांविरोधी दाखवला पाहिजे असं म्हणताच एका रात्रीत त्यांना अटक करण्याची हिंमत पोलीस दाखवू शकतात, हेच जात्यंध सत्तेचं सूत्र आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 529
अली खान प्रवीण पुरो विजय शहा सोफिया कुरेशी
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

रविवार विशेष लेख — अर्बन नक्षल ते दिमागी नक्षल

23/08/2026

रविवार विशेष लेख — शास्त्रज्ञांविरोधी कट हनीट्रॅपिंगचा

16/08/2026

रविवार विशेष लेख — रामाचं सोंग आणि धर्माचं ढोंग!

09/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
प्रशासन

उसनवारीवरील कर्मचाऱ्यांना १० सप्टेंबरपर्यंत मूळ विभागात पाठवा; मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर मुख्य सचिवांचे कडक आदेश

By Annant Ppangarkar25/08/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन  विशेष प्रतिनिधी / मुंबई: मंत्रालयातील प्रशासकीय कामकाजाची शिस्त आणि…

‘कर्माकडून कृतार्थतेकडे’ जाण्यासाठी प्रत्येक कृतीत ईश्वरभाव जागवा: डॉ. संजय मालपाणी

25/08/2026

पोलिसांची गुटख्याविरोधात मोठी कारवाई; सिनेस्टाईल पाठलाग करून ५१ लाखांचा मुद्देमाल जप्त

25/08/2026

संगमनेरमध्ये सह्याद्री कॉलेज शेजारील ‘बर्गेज कॅफे’वर पोलिसांची धाड; अश्लील चाळ्यांसाठी जागा पुरवणाऱ्या चालकावर गुन्हा दाखल

25/08/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.