Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

निष्क्रिय लोकांनी विकासावर बोलू नये; मुरूम-वाळूच्या पुढे न जाणाऱ्या लोकप्रतिनिधींवर बाळासाहेब थोरातांचा घणाघात

18/09/2026

गाजलेल्या गीतांचा नजराणा संगमनेरकरांना ‘दिल से’ आवडला! ‘संगमनेर फेस्टिव्हल’चा दुसरा दिवस; रहेमान म्युझिकने गाजवला

18/09/2026

कोकणातील गणेशोत्सवासाठी एसटी बसफेऱ्या वळवल्याने संगमनेरच्या ग्रामीण भागात प्रवाशांचे हाल; प्रशासनाविरोधात आंदोलनाचा इशारा

18/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » लाचखोरीचा पर्दाफाश: उपजिल्हाधिकारी ६७ लाखांच्या घबाडासह एसीबीच्या जाळ्यात
गुन्हेगारी

लाचखोरीचा पर्दाफाश: उपजिल्हाधिकारी ६७ लाखांच्या घबाडासह एसीबीच्या जाळ्यात

घरातून रोख १३ लाख ६ हजार ३८० रुपये, ५८.९ तोळे सोन्याचे दागिने आणि ३ किलो ५५३ ग्रॅम चांदीचे दागिने असे एकूण ६७ लाख ४५ हजार रुपयांचे मौल्यवान साहित्य आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar28/05/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

छत्रपती संभाजीनगर- 

वर्ग-२ मधील जमीन वर्ग-१ मध्ये रूपांतरित करण्यासाठी ४१ लाखांची लाच घेताना छत्रपती संभाजीनगरचे निवासी उपजिल्हाधिकारी विनोद गोंडुराव खिरोळकर आणि त्यांचा महसूल सहाय्यक दिलीप त्रिभुवन यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहाथ पकडले. या कारवाईनंतर खिरोळकर यांच्या घरावर टाकलेल्या धाडीत तब्बल ६७ लाख ४५ हजार रुपयांचे घबाड सापडले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संभाजीनगर तालुक्यातील तिसगाव येथील ६ हजार १८ गुंठे वर्ग-२ जमीन एका व्यक्तीने नियमानुसार खरेदी केली होती. ही जमीन वर्ग-१ मध्ये करण्यासाठी खिरोळकर आणि त्रिभुवन यांनी आधीच २३ लाख रुपये घेतले होते. उर्वरित प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आणि चलन देण्यासाठी त्यांनी आणखी १८ लाख रुपयांची मागणी केली. यातील ५ लाख रुपये मंगळवारी देण्याचे ठरले, तर उर्वरित १३ लाख रुपये काम पूर्ण झाल्यावर देण्याचे निश्चित झाले होते.

या लाचखोरीला कंटाळून तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. एसीबीच्या अधिकाऱ्यांनी २६ मे रोजी तक्रारीची शहानिशा केली. मंगळवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दिलीप त्रिभुवन याला ५ लाख रुपये घेताना एसीबीने रंगेहाथ पकडले. त्यानंतर लगेचच विनोद खिरोळकर यांनाही ताब्यात घेण्यात आले. त्रिभुवनकडून लाचेची रक्कम, मोबाईल आणि तीन हजार रुपये जप्त करण्यात आले. तर खिरोळकर यांच्याकडून मोबाईल आणि त्यांच्या केबिनमधून ७५ हजार रुपये जप्त करण्यात आले. याप्रकरणी सिटी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

खिरोळकर यांना अटक करताच एसीबीच्या दुसऱ्या पथकाने त्यांच्या घरावर धाड टाकली. या झडतीमध्ये मोठे घबाड समोर आले. घरातून रोख १३ लाख ६ हजार ३८० रुपये, ५८.९ तोळे सोन्याचे दागिने आणि ३ किलो ५५३ ग्रॅम चांदीचे दागिने असे एकूण ६७ लाख ४५ हजार रुपयांचे मौल्यवान साहित्य आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली. दिलीप त्रिभुवनच्या घराची झडती रात्री उशिरापर्यंत सुरू होती. या कारवाईमुळे प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 724
लाचखोरी लाचलुचपत
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

अवैध वाळू तस्करांवर एलसीबीचा दणका; ३० लाख ४० हजारांचा मुद्देमाल जप्त, ३ आरोपींना बेड्या

18/09/2026

ओम ज्वेलर्स चोरी प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेकडून पर्दाफाश; तिघांना अटक, मिरजगाव येथील गुन्ह्याचीही उकल

16/09/2026

पोलीस प्रशासनाचा मोठा निर्णय, गणेशोत्सवादरम्यान ‘यांना’ संगमनेर व अकोले तालुक्यात प्रवेश बंदीचे आदेश जारी___वाचा यादी

15/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
शेती व सहकार

निष्क्रिय लोकांनी विकासावर बोलू नये; मुरूम-वाळूच्या पुढे न जाणाऱ्या लोकप्रतिनिधींवर बाळासाहेब थोरातांचा घणाघात

By Annant Ppangarkar18/09/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – तालुक्याचा विकास हा कष्टातून उभा राहिला असून केवळ मोबाईलवर अफवा…

गाजलेल्या गीतांचा नजराणा संगमनेरकरांना ‘दिल से’ आवडला! ‘संगमनेर फेस्टिव्हल’चा दुसरा दिवस; रहेमान म्युझिकने गाजवला

18/09/2026

कोकणातील गणेशोत्सवासाठी एसटी बसफेऱ्या वळवल्याने संगमनेरच्या ग्रामीण भागात प्रवाशांचे हाल; प्रशासनाविरोधात आंदोलनाचा इशारा

18/09/2026

वैद्यकीय क्षेत्र समाजसेवेचे प्रभावी माध्यम; डॉक्टरांनी सेवा भाव जपावा : डॉ. सतिष महाजन

18/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.