Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

MPSC आंदोलनाला डॉ. जयश्रीताई थोरात यांचा पाठिंबा; समाज आणि आयोगातील ब्लड कॅन्सर ठीक करायचाय!

10/10/2026

आमदार अमोल खताळ यांनी वेधले ऊर्जा राज्यमंत्र्यांचे लक्ष; मेंढवन उपकेंद्राचे काम तातडीने सुरू करण्याची मागणी

10/10/2026

शनिवार १० ऑक्टोंबर — जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा असेल

10/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » यशोधन कार्यालयातर्फे विद्यार्थ्यांच्या दाखल्यांसाठी विशेष सुविधा सुरु; पालक व विद्यार्थ्यांना दिलासा
शिक्षण

यशोधन कार्यालयातर्फे विद्यार्थ्यांच्या दाखल्यांसाठी विशेष सुविधा सुरु; पालक व विद्यार्थ्यांना दिलासा

युवक काँग्रेस अध्यक्ष डॉ. जयश्री थोरात यांनीही विद्यार्थी आणि पालकांनी या सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे. ही सुविधा विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक वर्षातील प्रवेश प्रक्रिया सुलभ करण्यास निश्चितच मदत करेल.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar28/05/2025Updated:28/05/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp
संगमनेर – प्रतिनिधी
दहावीच्या निकालानंतर विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक वर्षात प्रवेशासाठी लागणाऱ्या विविध दाखल्यांच्या अडचणी लक्षात घेता, संगमनेर येथील यशोधन जनसंपर्क कार्यालयाने यंदाही विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी एक महत्त्वाची सुविधा सुरू केली असल्याची माहिती यशोधनचे मुख्याधिकारी डॉ. नितीन भांड यांनी दिली आहे.
या दाखल्यांचा समावेश… राज्याचे माजी शिक्षणमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली आणि कॅन्सर तज्ञ डॉ. जयश्री थोरात यांच्या नेतृत्वाखाली ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून, विद्यार्थ्यांना आता एकाच ठिकाणी उत्पन्नाचा दाखला, नॉन-क्रिमिलेअर, डोमिसाईल, नॅशनॅलिटी, डोंगरी आणि जात प्रमाणपत्र यांसारखे आवश्यक दाखले तात्काळ मिळवता येणार आहेत.
ऐतिहासिक निर्णयाची आठवण आणि सद्यस्थिती… माजी शिक्षणमंत्री बाळासाहेब थोरात यांनी आपल्या कार्यकाळात राज्यभरात ‘शाळेतच दाखले’ देण्याची एक ऐतिहासिक योजना राबवली होती. या योजनेमुळे सुमारे ८० लाख विद्यार्थ्यांना शाळेतच दाखले मिळाले, ज्यामुळे त्यांचा वेळ आणि पैसा दोन्ही वाचले. मात्र, सरकार बदलल्यानंतर हा निर्णयही बदलला, ज्यामुळे विद्यार्थ्यांच्या दाखल्यांची समस्या पुन्हा उभी राहिली. या पार्श्वभूमीवर, संगमनेर तालुक्यात यशोधन कार्यालयाने दरवर्षीप्रमाणे यंदाही ही सुविधा सुरू ठेवून विद्यार्थी आणि पालकांना मोठा आधार दिला आहे.
ऑनलाईन प्रवेश आणि दाखल्यांची गर्दी… जूनमध्ये सुरू होणाऱ्या नवीन शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना नवीन वर्गात प्रवेश घेण्यासाठी अनेक दाखल्यांची गरज भासते. विशेषतः यंदा अकरावीची प्रवेश प्रक्रियाही ऑनलाईन झाल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम वाढला आहे. उत्पन्नाचा दाखला, नॉन क्रिमीलेअर, डोमिसाईल, नॅशनॅलिटी, डोंगरी, जात प्रमाणपत्र यांसारख्या दाखल्यांसाठी पालकांची आणि विद्यार्थ्यांची तहसील कार्यालयात मोठी गर्दी होत आहे. अनेकदा एकाच वेळी दाखले मिळत नसल्यामुळे नागरिकांना हेलपाटे मारावे लागतात आणि प्रचंड गैरसोयीचा सामना करावा लागतो. प्रशासनाच्या दिरंगाईमुळे विद्यार्थ्यांचा वेळ आणि पैसा दोन्ही वाया जातो.
यशोधन कार्यालयाचा मदतीचा हात… विद्यार्थी आणि पालकांची ही गैरसोय दूर करण्यासाठी, त्यांचा वेळ आणि खर्चाची बचत व्हावी यासाठी कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्री थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली यशोधन कार्यालयामध्ये एक स्वतंत्र विभाग सुरू करण्यात आला आहे. यामुळे विद्यार्थ्यांना आवश्यक ते सर्व दाखले तात्काळ मिळवणे शक्य होणार आहे. यशोधन कार्यालयाच्यावतीने तालुक्यातील सर्व विद्यार्थ्यांनी या सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
संपर्क साधा… अधिक माहितीसाठी किंवा दाखल्यांसंबंधी मदतीसाठी, विद्यार्थी आणि पालक 8605321167 आणि 02425 227303 या क्रमांकांवर संपर्क साधू शकतात. युवक काँग्रेस अध्यक्ष डॉ. जयश्री थोरात यांनीही विद्यार्थी आणि पालकांनी या सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे. ही सुविधा विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक वर्षातील प्रवेश प्रक्रिया सुलभ करण्यास निश्चितच मदत करेल.
anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 670
उपक्रम जयश्री थोरात दाखले बाळासाहेब थोरात यशोधन शाळांमधून दाखले योजना
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

MPSC आंदोलनाला डॉ. जयश्रीताई थोरात यांचा पाठिंबा; समाज आणि आयोगातील ब्लड कॅन्सर ठीक करायचाय!

10/10/2026

एक सशक्त आणि अष्टपैलू अभिनेता काळाच्या पडद्याआड गेला; संगमनेरमधून या नेत्यांनी वाहिली श्रद्धांजली

08/10/2026

तत्कालीन मंत्री बाळासाहेब थोरात यांचा एक फोन आणि सोयाबीनला ४ हजार रुपयांची मदत; दुष्काळात शेतकऱ्यांना जाणवू लागली अनुभवी नेतृत्वाची उणीव

07/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
महाराष्ट्र संवाद विशेष

MPSC आंदोलनाला डॉ. जयश्रीताई थोरात यांचा पाठिंबा; समाज आणि आयोगातील ब्लड कॅन्सर ठीक करायचाय!

By Annant Ppangarkar10/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- पुण्यात विविध मागण्यांसाठी गेल्या नऊ दिवसांपासून सुरू असलेल्या MPSC परीक्षार्थींच्या आंदोलनाला…

आमदार अमोल खताळ यांनी वेधले ऊर्जा राज्यमंत्र्यांचे लक्ष; मेंढवन उपकेंद्राचे काम तातडीने सुरू करण्याची मागणी

10/10/2026

शनिवार १० ऑक्टोंबर — जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा असेल

10/10/2026

३९ ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त, तरी आरोपीला जामीन! संगमनेर न्यायालयाच्या आदेशात नेमके काय?

09/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.