Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

निष्क्रिय लोकांनी विकासावर बोलू नये; मुरूम-वाळूच्या पुढे न जाणाऱ्या लोकप्रतिनिधींवर बाळासाहेब थोरातांचा घणाघात

18/09/2026

गाजलेल्या गीतांचा नजराणा संगमनेरकरांना ‘दिल से’ आवडला! ‘संगमनेर फेस्टिव्हल’चा दुसरा दिवस; रहेमान म्युझिकने गाजवला

18/09/2026

कोकणातील गणेशोत्सवासाठी एसटी बसफेऱ्या वळवल्याने संगमनेरच्या ग्रामीण भागात प्रवाशांचे हाल; प्रशासनाविरोधात आंदोलनाचा इशारा

18/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » सरकारी नोकरदार महिलांकडून ‘लाडकी बहीण’ योजनेचा गैरवापर: २६५२ अर्ज बाद, सरकार कठोर कारवाईच्या तयारीत
राजकारण

सरकारी नोकरदार महिलांकडून ‘लाडकी बहीण’ योजनेचा गैरवापर: २६५२ अर्ज बाद, सरकार कठोर कारवाईच्या तयारीत

दरम्यान, 'नमो शेतकरी' आणि 'लाडकी बहीण' या दोन्ही योजनांचा लाभ घेणाऱ्या ८ लाख ८५ हजार महिलांच्या अर्जांचीही पडताळणी करण्यात आली आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar31/05/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

मुंबई – प्रतिनिधी 

राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘लाडकी बहीण’ योजनेत मोठा घोळ समोर आला आहे. तब्बल २ हजार ६५२ सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी योजनेच्या निकषांचे उल्लंघन करत आर्थिक लाभ घेतल्याचे उघड झाले आहे. या महिलांचे अर्ज आता बाद करण्यात आले असून, त्यांच्यावर सरकारकडून कठोर कारवाई होण्याची शक्यता आहे.

योजनेसाठी अर्ज केलेल्या महिलांच्या पडताळणी मोहिमेदरम्यान हा गैरप्रकार समोर आला. माहिती व तंत्रज्ञान विभागाने सामान्य प्रशासन विभागाला १ लाख ६० हजार कर्मचाऱ्यांचा युआयडी डेटा उपलब्ध करून दिल्यावर पोर्टलवरील नोंदी तपासण्यात आल्या. या तपासणीत, सरकारी कर्मचारी असूनही ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ घेणाऱ्या २,६५२ महिलांची नावे समोर आली. योजनेच्या नियमांनुसार, सरकारी कर्मचाऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येत नाही.

या प्रकरणावर बोलताना, गिरीष महाजन यांनी सांगितले की, “याची तपासणी सुरू आहे. काही सरकारी कर्मचारी असतील, काही आयकर भरणारे असतील, त्यांची नावे त्यात आली आहेत. ज्यांनी चुकीच्या पद्धतीने योजनेचा फायदा घेतला आहे, त्यांना आता फायदा मिळणार नाही आणि त्यांना योजनेतून बाद करण्यात आले आहे.”

दरम्यान, ‘नमो शेतकरी’ आणि ‘लाडकी बहीण’ या दोन्ही योजनांचा लाभ घेणाऱ्या ८ लाख ८५ हजार महिलांच्या अर्जांचीही पडताळणी करण्यात आली आहे. या महिलांना ‘लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत आता केवळ ५०० रुपये प्रति महिना मिळणार आहेत, कारण त्या ‘नमो शेतकरी’ योजनेतून वर्षाला ६ हजार रुपये घेत आहेत. येत्या काळात, सुमारे ६ लाख सरकारी कर्मचाऱ्यांचीही अशीच सखोल तपासणी केली जाणार असल्याचे समजते.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 615
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेर ग्रामीण भागात सायंकाळी वीज खंडित; गणेशोत्सवात नागरिक अंधारात, सरकारने घोषणांचा उत्सव थांबवून आधी ग्रामीण भागाला वीज द्यावी, काँग्रेसचे कार्याध्यक्ष शेलकर यांची मागणी

17/09/2026

संगमनेर तालुक्यात ३३ हजार ७९२ हेक्टरवरील खरीप पिकांची दैना; आमदार अमोल खताळ यांची मुख्यमंत्र्यांकडे तातडीने आर्थिक मदतीची मागणी

16/09/2026

आंदोलनाची हवा काढण्यासाठीच मुख्यमंत्र्यांची भेट? : अमोल शेलकर यांचा घणाघात, पालकमंत्री व लोकप्रतिनिधींवर संगमनेरच्या हक्काची रेल्वे हिरावल्याचा थेट आरोप; कागदपत्रे सार्वजनिक करण्याचे आव्हान

09/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
शेती व सहकार

निष्क्रिय लोकांनी विकासावर बोलू नये; मुरूम-वाळूच्या पुढे न जाणाऱ्या लोकप्रतिनिधींवर बाळासाहेब थोरातांचा घणाघात

By Annant Ppangarkar18/09/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – तालुक्याचा विकास हा कष्टातून उभा राहिला असून केवळ मोबाईलवर अफवा…

गाजलेल्या गीतांचा नजराणा संगमनेरकरांना ‘दिल से’ आवडला! ‘संगमनेर फेस्टिव्हल’चा दुसरा दिवस; रहेमान म्युझिकने गाजवला

18/09/2026

कोकणातील गणेशोत्सवासाठी एसटी बसफेऱ्या वळवल्याने संगमनेरच्या ग्रामीण भागात प्रवाशांचे हाल; प्रशासनाविरोधात आंदोलनाचा इशारा

18/09/2026

वैद्यकीय क्षेत्र समाजसेवेचे प्रभावी माध्यम; डॉक्टरांनी सेवा भाव जपावा : डॉ. सतिष महाजन

18/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.