Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

लिफ्ट देण्याच्या बहाण्याने ज्येष्ठ महिलांना लुटणारी टोळी जेरबंद; अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेकडून दोन गुन्ह्यांचा उलगडा

26/08/2026

सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी बँकेला मिळाले हे आंतरराष्ट्रीय मानांकन; माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते कॉर्पोरेट ट्रेनिंग हॉलचे उद्घाटन

26/08/2026

आमदार खताळ यांच्या प्रयत्नांना यश; डोळासणे निवासी वीजजोडणीसाठी १० लाखांचा निधी मंजूर, प्रत्यक्ष कामालाही सुरुवात

26/08/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » सेंट किट्स अँड नेव्हिस येथे अमृतवाहिनी एमबीएच्या विद्यार्थ्याला सुमारे 15 लाखाच्या पॅकेजची नोकरी! प्रज्वल साळुंकेचे यश
यश / निवड / पुरस्कार

सेंट किट्स अँड नेव्हिस येथे अमृतवाहिनी एमबीएच्या विद्यार्थ्याला सुमारे 15 लाखाच्या पॅकेजची नोकरी! प्रज्वल साळुंकेचे यश

आंतरराष्ट्रीय कंपनीमध्ये तब्बल $180,000 (सुमारे ₹15 लाख) वार्षिक पॅकेजवर नोकरीसाठी निवड झाली आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar01/06/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर, प्रतिनिधी – 

अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेच्या अमृतवाहिनी एम.बी.ए. महाविद्यालयातील प्रतिभावान विद्यार्थी प्रज्वल दीपक साळुंके याची कॅरिबियन बेटांवरील सेंट किट्स अँड नेव्हिस येथे एका आंतरराष्ट्रीय कंपनीमध्ये तब्बल $180,000 (सुमारे ₹15 लाख) वार्षिक पॅकेजवर नोकरीसाठी निवड झाली आहे. प्रज्वलने आपले उत्कृष्ट शैक्षणिक प्रदर्शन, प्रभावी नेतृत्वगुण आणि व्यावसायिक कौशल्याच्या बळावर ही महत्त्वपूर्ण संधी प्राप्त केली आहे.

या यशाबद्दल बोलताना प्रज्वलने आपले श्रेय अमृतवाहिनी एम.बी.ए. महाविद्यालयाला दिले. तो म्हणाला, अमृतवाहिनी एम.बी.ए. मध्ये विद्यार्थ्यांचा केवळ शैक्षणिकच नव्हे, तर त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास केला जातो. महाविद्यालयात नियमितपणे विविध क्षेत्रांतील तज्ञांचे मार्गदर्शन, आंतरराष्ट्रीय चर्चासत्रे, मॉक इंटरव्ह्यू यांसारखे अनेक उपक्रम राबवले जातात, ज्यामुळे विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावर स्पर्धा करण्यासाठी तयार केले जाते.

अमृत ट्रॉफीसारख्या स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांचे इंग्रजीवरील प्रभुत्व, बिझनेस क्विझ, बिझनेस स्किल्स, मॅनेजमेंट विषयावरील ॲड शो, सिनेमा ॲट्रोग्राफी आणि डेटा ॲनालिटिक्ससारख्या अनेक उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये समन्वय आणि नेतृत्व कौशल्ये विकसित होतात. या सर्व गोष्टींमुळेच व्यावसायिक दृष्टिकोन असलेले विद्यार्थी घडतात.

प्रज्वल हा संगमनेर मधील चहा विक्रेते व शिवसैनिक दीपक साळुंके यांचा मुलगा असून त्याच्या या नेत्रदीपक यशाबद्दल त्याचा संस्थेच्या वतीने सत्कार करून त्याला पुढील कामासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. त्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात, संस्थेचे विश्वस्त माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, संस्थेच्या कार्यकारी विश्वस्त शरयू देशमुख, इंद्रजित थोरात, डॉ. जयश्री थोरात, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल बी. शिंदे, मॅनेजर प्रा. व्ही. बी. धुमाळ, शैक्षणिक संचालक डॉ. जे. बी. गुरव, महाविद्यालयाचे संचालक डॉ. बी. एम. लोंढे आणि अमृतवाहिनी एम.बी.ए. महाविद्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 906
प्रज्वल साळुंके
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

प्रवीण बागडे यांना ‘लोकशाहीर अण्णाभाऊ साठे साहित्यरत्न’ राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर

18/08/2026

संगमनेर तालुका व शहर काँग्रेसच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर; अजय फटांगरे, सोमेश्वर दिवटे आणि अमोल शेलकर यांच्यावर मोठी जबाबदारी

18/07/2026

रोटरी डिस्ट्रीक्ट ३१३२ च्या असिस्टंट गव्हर्नरपदी आनंद हासे

16/07/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

लिफ्ट देण्याच्या बहाण्याने ज्येष्ठ महिलांना लुटणारी टोळी जेरबंद; अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेकडून दोन गुन्ह्यांचा उलगडा

By Annant Ppangarkar26/08/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन  अहिल्यानगर: वाहनात लिफ्ट देण्याचा बहाणा करून एकट्या-दुकट्या ज्येष्ठ महिलांना…

सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी बँकेला मिळाले हे आंतरराष्ट्रीय मानांकन; माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते कॉर्पोरेट ट्रेनिंग हॉलचे उद्घाटन

26/08/2026

आमदार खताळ यांच्या प्रयत्नांना यश; डोळासणे निवासी वीजजोडणीसाठी १० लाखांचा निधी मंजूर, प्रत्यक्ष कामालाही सुरुवात

26/08/2026

पत्रकारावर हल्ला करणाऱ्या कुख्यात गुन्हेगार टोळीचे तोफखाना पोलिसांनी मोडले कंबरडे; केली ही मोठी कारवाई

26/08/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.