Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

अहिल्यानगरमध्ये ४० नशेची इंजेक्शन्स जप्त; व्यायामपटूंकडून वापराचा संशय, तिघांना अटक

03/09/2026

अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; ५.३० लाखांचा मुद्देमाल जप्त, ११ जणांवर गुन्हे दाखल

03/09/2026

अवैध वाळू वाहतूक करणारा हायवा जप्त, २५.६० लाखांचा मुद्देमाल हस्तगत

03/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » पाण्याच्या प्रवाहाने संगमनेर तालुक्यात जलसमृद्धी: निळवंडे कालव्यांच्या पाण्याने भरले बंधारे, शेतकऱ्यांमध्ये आनंदोत्सव
राजकारण

पाण्याच्या प्रवाहाने संगमनेर तालुक्यात जलसमृद्धी: निळवंडे कालव्यांच्या पाण्याने भरले बंधारे, शेतकऱ्यांमध्ये आनंदोत्सव

अण्णासाहेब राहिंज यांनी यावेळी बोलताना, ज्या लोकांनी धरणाला विरोध केला, त्यांची आज सत्ता आहे. त्यांचे कालवे आणि धरणामध्ये कोणतेही योगदान नाही. निळवंडेचे पाणी तालुक्यातील प्रत्येक गावात येणे हा तालुक्यासाठी आनंदाचा क्षण आहे, असे सांगितले.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar04/06/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर (प्रतिनिधी): 

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या अथक प्रयत्नांमुळे आणि पाठपुराव्यामुळे निळवंडे धरणाचे डावे आणि उजवे कालवे त्यांच्याच कार्यकाळात पूर्ण झाले असून, या कालव्यांमधून संगमनेर तालुक्यातील विविध गावांमध्ये पाणी पोहोचले आहे. यामुळे अनेक बंधारे आणि गावतळी भरली असून, तालुक्यात जलसमृद्धी निर्माण झाल्याचे संगमनेर तालुका दूध संघाचे अध्यक्ष रणजितसिंह देशमुख यांनी म्हटले आहे.

बुधवारी (४ जून) रणजितसिंह देशमुख यांच्या हस्ते अंभोरे, पानोडी, मालुंजे, पिंपारणे येथील उजव्या कालव्यातून भरलेल्या बंधाऱ्यांचे जलपूजन करण्यात आले. यावेळी संचालक सतीश वर्पे, गंगाराम वाकचौरे, अण्णा राहिंज, लहानभाऊ वर्पे, रवींद्र रोहम, अरुणराव देशमुख, शुभम काळे, दिनकर वाकचौरे, नवनीत देशमुख, राजेंद्र देशमुख, सरपंच नारायण मरभळ, अरुण राहिंज, रमेश राहिंज, बाबासाहेब राहिंज, संजय राहिंज, कृष्णा रकटे, भिमाजी राहिंज यांच्यासह विविध पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून उजव्या कालव्यालगतच्या गावांना पाणी मिळावे याकरिता सुमारे २ कोटी रुपयांच्या पाईपलाईनची सोय करण्यात आली आहे. यामुळे या गावांमधील बंधारे पाण्याने भरण्यात आली असून, या जलपूजनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.

यावेळी बोलताना रणजितसिंह देशमुख यांनी, विभागाच्या विकासासाठी पाणी अत्यंत महत्त्वाचे आहे. माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दुष्काळी भागाचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी निळवंडे धरण आणि कालवे पूर्ण केले. डावा आणि उजवा कालवा पूर्ण करण्यासाठी त्यांनी आमदारकी आणि मंत्रिपद पणाला लावले. त्यांच्या कठोर परिश्रमातून हे ऐतिहासिक काम पूर्ण झाले आहे.

त्यांच्या पाठपुराव्यामुळे आणि प्रयत्नांमुळे आज दोन्हीही कालव्यांमधून पाणी वाहत आहे, यामुळे या भागातील बंधारे पाण्याने भरली आहेत. याचा शेतीसाठी मोठा उपयोग होणार असून, पाण्यामुळे जलसमृद्धी निर्माण झाली आहे. माजी मंत्री थोरात यांच्या प्रयत्नांमुळे दुष्काळी तालुक्याचे रूपांतर आता प्रगतशील तालुक्यात झाले आहे. कृषी, दुग्ध, शिक्षण, सहकार अशा सर्व क्षेत्रांमध्ये संगमनेर तालुका राज्याला दिशादर्शक ठरत आहे.

अण्णासाहेब राहिंज यांनी यावेळी बोलताना, ज्या लोकांनी धरणाला विरोध केला, त्यांची आज सत्ता आहे. त्यांचे कालवे आणि धरणामध्ये कोणतेही योगदान नाही. निळवंडेचे पाणी तालुक्यातील प्रत्येक गावात येणे हा तालुक्यासाठी आनंदाचा क्षण आहे, असे सांगितले.

याप्रसंगी गावोगावी मोठ्या उत्साहात जलपूजन करण्यात आले. गावातील युवकांनी मिरवणुका काढून आणि आनंदोत्सव साजरा करून आपला उत्साह व्यक्त केला. निळवंडेच्या पाण्यामुळे संगमनेर तालुक्यात समृद्धीची नवी पहाट उगवली असून, शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 906
जलपूजन निळवंडे पाणी रणजीतसिंह देशमुख
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

आमदार अमोल खताळ यांच्या सूचनेनंतर लोहारे-कासारे पाझर तलावातून पाण्याचा विसर्ग सुरू

30/08/2026

संगमनेर पालिकेचा अनोखा उपक्रम! १ ते २५ सप्टेंबरदरम्यान होणार प्रभागनिहाय बैठका; नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे यांच्या पुढाकाराने नागरिकांच्या प्रश्नांना थेट व्यासपीठ

29/08/2026

संगमनेरकरांच्या अभिप्रेत असलेलेच छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य-दिव्य स्मारक उभारणार! “दीड वर्षे खाती हातात असूनही वाढीव जागेचा प्रश्न सोडवला नाही; आता स्मारकाच्या कामात खोडा घालून संगमनेरकरांची दिशाभूल करू नका”

28/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

अहिल्यानगरमध्ये ४० नशेची इंजेक्शन्स जप्त; व्यायामपटूंकडून वापराचा संशय, तिघांना अटक

By Annant Ppangarkar03/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन: समाजमाध्यमांच्या माध्यमातून खरेदी केलेल्या आणि नशेसह शारीरिक ताकदीसाठी बेकायदेशीरपणे…

अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; ५.३० लाखांचा मुद्देमाल जप्त, ११ जणांवर गुन्हे दाखल

03/09/2026

अवैध वाळू वाहतूक करणारा हायवा जप्त, २५.६० लाखांचा मुद्देमाल हस्तगत

03/09/2026

आज गुरुवार, ०३ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

03/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.