Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

वीज प्रश्नावर संगमनेर काँग्रेसचा ‘जनआक्रोश मोर्चा’; बाळासाहेब थोरातांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात जोरदार तयारी

19/09/2026

राज्यात सरसकट दुष्काळ जाहीर करा; माजी कृषिमंत्री बाळासाहेब थोरात यांची मागणी, रेल्वेप्रश्नी लोकप्रतिनिधीच्या बालिश वक्तव्यावरही केले भाष्य

19/09/2026

थोरात कारखान्याचे ११ लाख मेट्रिक टनाचे गाळप उद्दिष्ट; बॉयलर अग्नीप्रदीपन समारंभात बाळासाहेब थोरात यांचे आवाहन

19/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » मोरवाडी धरणासंदर्भात जलसंपदामंत्री विखे पाटलांच्या उपस्थितीत बुधवारी महत्त्वपूर्ण बैठक, आमदार खताळ यांची ‘मोरवाडी’साठी फिल्डिंग!
राजकारण

मोरवाडी धरणासंदर्भात जलसंपदामंत्री विखे पाटलांच्या उपस्थितीत बुधवारी महत्त्वपूर्ण बैठक, आमदार खताळ यांची ‘मोरवाडी’साठी फिल्डिंग!

आमदार निधीतून दत्त महाराजांच्या मंदिराच्या सभामंडपासाठी १० लाख रुपये देण्याची घोषणाही केली.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar08/06/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर, प्रतिनिधी

पठार भागातील पाण्याची दीर्घकाळ चाललेली समस्या सोडवण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले जात आहे. येत्या बुधवारी मंत्रालयात जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत मोरवाडी धरणासंदर्भात एक महत्त्वपूर्ण बैठक होणार असल्याची माहिती आमदार अमोल खताळ यांनी दिली.

वरवंडी येथे आमदार खताळ यांच्या पेढेतुला कार्यक्रमात त्यांनी ही माहिती दिली. यावेळी महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

आमदार खताळ म्हणाले की, पठार भागासाठी मोरवाडी धरण व्हावे, ही अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. या धरणासाठी पूर्वी जागाही संपादित करण्यात आली होती. मात्र, नंतर मुळा नदीवर राहुरी तालुक्यात मुळा धरण बांधले गेले. सद्यस्थितीत मुळा नदीवर आंबीत व पिंपळगाव खांड ही दोन धरणे आहेत. दुर्दैवाने, पिंपळगाव खांड धरणाच्या लाभक्षेत्रात साकूर पठार भागातील गावांचा समावेश नसल्याने ती अनेक वर्षांपासून पाण्यापासून वंचित आहेत.

पिंपळगाव खांड धरणाच्या लाभक्षेत्रात पठार भागाच्या समावेशाला अकोले तालुक्यातील अनेक गावांचा विरोध आहे. त्यामुळे या भागातील नागरिक मोरवाडी येथे स्वतंत्र धरण व्हावे अशी इच्छा व्यक्त करत आहेत. यामुळे जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना या भागाचा सर्व्हे करण्याचे निर्देश दिले होते. हा सर्व्हे पूर्ण झाला असून, आता येत्या बुधवारी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत या संदर्भात बैठक आयोजित करण्यात आली आहे.

कार्यकर्त्यांना धमकावल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील… विधानसभा निवडणुकीच्या वेळी कार्यकर्त्यांना धमकावणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा देत खताळ म्हणाले, माजी आमदारांच्या बगलबच्चांचा आपण बंदोबस्त केला आहे. जे काही थोडेफार राहिले आहेत, त्यांचा सुद्धा बंदोबस्त केला जाईल. परंतु माझ्या कार्यकर्त्यांच्या केसालाही धक्का लावला तर गाठ माझ्याशी आहे. कार्यकर्त्यांनी अशा धमक्यांकडे दुर्लक्ष करावे, मात्र जर जास्त त्रास दिला तर नक्कीच बंदोबस्त केला जाईल.

दत्त महाराज मंदिराच्या सभामंडपासाठी १० लाख रुपयांची घोषणा… आमदार खताळ यांनी वरवंडी येथील दत्त महाराजांच्या मंदिराच्या सर्वांगीण विकासासाठी प्रस्ताव देण्याचे आवाहन केले. तसेच हे मंदिर ‘क’ वर्ग तीर्थक्षेत्र विकास आराखड्यात घेण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. त्यांनी आमदार निधीतून दत्त महाराजांच्या मंदिराच्या सभामंडपासाठी १० लाख रुपये देण्याची घोषणाही केली. सभामंडप कुठे घ्यायचा, हे ग्रामस्थांनी एकत्रित बसून ठरवावे, असा सल्लाही त्यांनी दिला.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 656
अमोल खताळ पठार भाग मोरवाडी धरण
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेर ग्रामीण भागात सायंकाळी वीज खंडित; गणेशोत्सवात नागरिक अंधारात, सरकारने घोषणांचा उत्सव थांबवून आधी ग्रामीण भागाला वीज द्यावी, काँग्रेसचे कार्याध्यक्ष शेलकर यांची मागणी

17/09/2026

संगमनेर तालुक्यात ३३ हजार ७९२ हेक्टरवरील खरीप पिकांची दैना; आमदार अमोल खताळ यांची मुख्यमंत्र्यांकडे तातडीने आर्थिक मदतीची मागणी

16/09/2026

भंडारदरा धरणातून खरीप पिकांसाठी सोमवारपासून पाणी सुटणार; गणेशोत्सवात दिलासा : आमदार खताळ

13/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
आंदोलन

वीज प्रश्नावर संगमनेर काँग्रेसचा ‘जनआक्रोश मोर्चा’; बाळासाहेब थोरातांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात जोरदार तयारी

By Annant Ppangarkar19/09/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – संगमनेर तालुक्यातील ग्रामीण भागात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने सुरू असलेला…

राज्यात सरसकट दुष्काळ जाहीर करा; माजी कृषिमंत्री बाळासाहेब थोरात यांची मागणी, रेल्वेप्रश्नी लोकप्रतिनिधीच्या बालिश वक्तव्यावरही केले भाष्य

19/09/2026

थोरात कारखान्याचे ११ लाख मेट्रिक टनाचे गाळप उद्दिष्ट; बॉयलर अग्नीप्रदीपन समारंभात बाळासाहेब थोरात यांचे आवाहन

19/09/2026

बेकायदेशीर गॅस रिफिलींगच्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश; २१.८० लाखांच्या मुद्देमालासह १३३ टाक्या जप्त

19/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.