Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

निष्क्रिय लोकांनी विकासावर बोलू नये; मुरूम-वाळूच्या पुढे न जाणाऱ्या लोकप्रतिनिधींवर बाळासाहेब थोरातांचा घणाघात

18/09/2026

गाजलेल्या गीतांचा नजराणा संगमनेरकरांना ‘दिल से’ आवडला! ‘संगमनेर फेस्टिव्हल’चा दुसरा दिवस; रहेमान म्युझिकने गाजवला

18/09/2026

कोकणातील गणेशोत्सवासाठी एसटी बसफेऱ्या वळवल्याने संगमनेरच्या ग्रामीण भागात प्रवाशांचे हाल; प्रशासनाविरोधात आंदोलनाचा इशारा

18/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » महिलांनी बचत गटांच्या माध्यमातून आत्मनिर्भर व्हावे – शालिनीताई विखे यांचे आवाहन
राजकारण

महिलांनी बचत गटांच्या माध्यमातून आत्मनिर्भर व्हावे – शालिनीताई विखे यांचे आवाहन

नीलम खताळ यांनी याप्रसंगी बोलताना सांगितले की, महिलांच्या दृष्टीने वटपौर्णिमा हा सण महत्त्वाचा आहे. जसा हा वड वाढत गेला, तसेच या तालुक्यातील सर्व लाडक्या बहिणींनी एकत्रित येऊन परिवर्तन केले आहे. त्यामुळे मी आणि तुमचे भाऊ तुमच्या पाठीशी भक्कम उभे राहू
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar10/06/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर, प्रतिनिधी

प्रत्येक महिलेमध्ये काहीतरी विशेष गुण असतात या गुणांचा उपयोग करून महिलांनी स्वतःला सक्षम करावे आणि मिळालेल्या प्रत्येक संधीचं सोनं करावं, असं आवाहन जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे यांनी करीत महिला बचत गटांच्या माध्यमातून सर्वच महिलांनी स्वतःचा व्यवसाय उभारून आत्मनिर्भर व्हावे, अस आवाहन केलं.

संगमनेर तालुक्यातील ऐतिहासिक पेमगिरी येथील महाकाय वटवृक्षाच्या सानिध्यात, वटपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्ताने आयोजित ‘उत्सव माझ्या कुंकवाचा वटसावित्री पौर्णिमेचा’ या विशेष महिला कार्यक्रमात त्या बोलत होत्या. जाकमत बाबा तरुण मित्र मंडळ आणि संगमनेर तालुका महायुती महिला आघाडी यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी व्यासपीठावर आमदार अमोल खताळ यांच्या मातोश्री मंगल खताळ, पत्नी नीलम खताळ, पंचायत समितीच्या माजी सदस्य सुनिता कानवडे, वर्षा डुबे यांच्यासह अनेक महिला उपस्थित होत्या. कार्यक्रमादरम्यान, शालिनीताई विखे, मंगल खताळ, नीलम खताळ आणि इतर उपस्थित महिलांनी महाकाय वटवृक्षाची पूजा करून सर्व महिलांसोबत सात फेरे घेतले.

शालिनीताई विखे म्हणाल्या, पूर्वीच्या काळी एकत्र कुटुंब पद्धतीमुळे मुलांना योग्य संस्कार मिळत होते. मात्र, आता विभक्त कुटुंब पद्धतीमुळे संस्कार मिळणे कठीण झाले आहे. महिलांनी एकमेकींचे पाय ओढण्याऐवजी एकमेकींना सहकार्य करावे. विधवा महिलेला समाजबाह्य न करता तिला मान-सन्मान द्यावा. पती निवर्तल्यानंतरही महिला कुंकू लावू शकते, कारण ती देखील समाजाचा एक भाग आहे. मुलगाच वंशाचा दिवा नाही, तर मुलगी देखील पणती आहे आणि ती कायम प्रकाश देते.

वटसावित्री पौर्णिमेनिमित्त भेट देण्यात येणाऱ्या वडाच्या रोपांचे रोपण करण्याचे आवाहन केले. यामुळे ऑक्सिजन आणि स्वच्छ हवा मिळेल, त्यामुळे सर्व महिलांनी या वटवृक्षाचे संवर्धन करावे, असेही त्यांनी सांगितले.

नीलम खताळ यांनी याप्रसंगी बोलताना सांगितले की, महिलांच्या दृष्टीने वटपौर्णिमा हा सण महत्त्वाचा आहे. जसा हा वड वाढत गेला, तसेच या तालुक्यातील सर्व लाडक्या बहिणींनी एकत्रित येऊन परिवर्तन केले आहे. त्यामुळे मी आणि तुमचे भाऊ तुमच्या पाठीशी भक्कम उभे राहू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

या कार्यक्रमात, भारत मातेचे रक्षण करणाऱ्या सैनिक पत्नींचा आणि बिबट्याच्या तावडीतून आपल्या मुलाला वाचवणाऱ्या कविता खताळ यांचा वटवृक्ष देऊन विशेष सन्मान करण्यात आला. तसेच, महिला पोलीस अनिता गुंजाळ, मीरा बिबवे, सविता सोळशे, शशीकला हांडे, शिला साबळे, सुवर्णा नवले, लता जाधव, सुषमा भांगरे, सविता रुपवते, प्रतिभा थोरात, निशा धाडी, माधुरी मुंडलिक या महिला कर्मचाऱ्यांचा उपस्थित महिलांच्या हस्ते रोप देऊन गौरव करण्यात आला.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 847
नीलम खताळ वडसावित्री पोर्णिमा शालिनी विखे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेर ग्रामीण भागात सायंकाळी वीज खंडित; गणेशोत्सवात नागरिक अंधारात, सरकारने घोषणांचा उत्सव थांबवून आधी ग्रामीण भागाला वीज द्यावी, काँग्रेसचे कार्याध्यक्ष शेलकर यांची मागणी

17/09/2026

संगमनेर तालुक्यात ३३ हजार ७९२ हेक्टरवरील खरीप पिकांची दैना; आमदार अमोल खताळ यांची मुख्यमंत्र्यांकडे तातडीने आर्थिक मदतीची मागणी

16/09/2026

आंदोलनाची हवा काढण्यासाठीच मुख्यमंत्र्यांची भेट? : अमोल शेलकर यांचा घणाघात, पालकमंत्री व लोकप्रतिनिधींवर संगमनेरच्या हक्काची रेल्वे हिरावल्याचा थेट आरोप; कागदपत्रे सार्वजनिक करण्याचे आव्हान

09/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
शेती व सहकार

निष्क्रिय लोकांनी विकासावर बोलू नये; मुरूम-वाळूच्या पुढे न जाणाऱ्या लोकप्रतिनिधींवर बाळासाहेब थोरातांचा घणाघात

By Annant Ppangarkar18/09/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – तालुक्याचा विकास हा कष्टातून उभा राहिला असून केवळ मोबाईलवर अफवा…

गाजलेल्या गीतांचा नजराणा संगमनेरकरांना ‘दिल से’ आवडला! ‘संगमनेर फेस्टिव्हल’चा दुसरा दिवस; रहेमान म्युझिकने गाजवला

18/09/2026

कोकणातील गणेशोत्सवासाठी एसटी बसफेऱ्या वळवल्याने संगमनेरच्या ग्रामीण भागात प्रवाशांचे हाल; प्रशासनाविरोधात आंदोलनाचा इशारा

18/09/2026

वैद्यकीय क्षेत्र समाजसेवेचे प्रभावी माध्यम; डॉक्टरांनी सेवा भाव जपावा : डॉ. सतिष महाजन

18/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.