Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

वीज प्रश्नावर संगमनेर काँग्रेसचा ‘जनआक्रोश मोर्चा’; बाळासाहेब थोरातांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात जोरदार तयारी

19/09/2026

राज्यात सरसकट दुष्काळ जाहीर करा; माजी कृषिमंत्री बाळासाहेब थोरात यांची मागणी, रेल्वेप्रश्नी लोकप्रतिनिधीच्या बालिश वक्तव्यावरही केले भाष्य

19/09/2026

थोरात कारखान्याचे ११ लाख मेट्रिक टनाचे गाळप उद्दिष्ट; बॉयलर अग्नीप्रदीपन समारंभात बाळासाहेब थोरात यांचे आवाहन

19/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेरमध्ये सराईतांच्या दोन टोळ्या पकडल्या! सात आरोपींना अटक, दीड लाखाचा मुद्देमाल जप्त
गुन्हेगारी

संगमनेरमध्ये सराईतांच्या दोन टोळ्या पकडल्या! सात आरोपींना अटक, दीड लाखाचा मुद्देमाल जप्त

पकडलेल्या आरोपींकडून शहरातील तसेच त्यांनी केलेल्या गुन्हेगारी घटनांची माहिती घेतली जात असून पुढील तपास सुरू आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar12/06/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर, 12 जून: 

संगमनेर शहर आणि परिसरात वाढत्या लुटमारीच्या घटनांमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना संगमनेर पोलिसांनी मोठा दिलासा दिला आहे. दोन सराईत गुन्हेगारी टोळ्यांना जेरबंद करत पोलिसांनी एकूण सात आरोपींना अटक केली असून, त्यांच्याकडून तब्बल 1,55,500/- किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या कारवाईमुळे शहरातील गुन्हेगारीला आळा बसण्याची आशा निर्माण झाली आहे.

सातत्याने घडणाऱ्या गुन्हेगारी घटनांमुळे संगमनेरमधील नागरिक भयभीत झाले होते, पण आता पोलिसांच्या कारवाईमुळे दिलासा मिळाला असून या धडक कारवाईचं सर्वत्र कौतुक होत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेले सर्व नऊ आरोपी सराईत गुन्हेगार असून साई शरद सूर्यवंशी (वय 20, रा. अकोले नाका, संगमनेर), राहुल भरत सोनवणे (वय 24, रा. अकोले नाका, संगमनेर), आदित्य संपत सूर्यवंशी (वय 27, रा. अकोले नाका, संगमनेर), पिल्या उर्फ विक्रम रामनाथ घोडेकर (वय 27, रा. पंपिंग स्टेशन, संगमनेर), सिद्धार्थ दीपक मावस (वय 22, रा. खांडगाव, संगमनेर), प्रशांत उर्फ परशा दीपक मावस (वय 19, रा. खांडगाव, संगमनेर), सौरभ पप्पू खर्डे (वय 19, गणेशवाडी, रा. खांडगाव, संगमनेर) अशी पोलिसांनी पकडलेल्या दोन्ही टोळीतील आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी पकडलेल्या आरोपींकडून खुनाचा प्रयत्न, दरोडा आणि लुटमार असे गंभीर गुन्हे उघडतेस आले असल्याचे सांगण्यात आले. याशिवाय पकडलेल्या आरोपींकडून रोकड रकमेसह, देवघरातील चार देव, पितळी दिवटे, ताम्हण, तांब्या, ताट असे पूजेचे साहित्य, चाकू, 1 लाख 20 हजार रुपये किमतीच्या दोन दुचाकी, मोबाईल, चॉपर, काठ्या असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

अहिल्यानगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, संगमनेरचे पोलीस उपअधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख, पोलीस उपनिरीक्षक समीर अभंग व संतोष पगारे, पोलीस कॉन्स्टेबल संदीप शिरसाठ, अजित कुऱ्हे, संतोष बाचकर, सुरेश मोरे, अतुल उंडे, हरिश्चंद्र बांडे, आत्माराम पवार यांच्यासह पोलीस उपअधीक्षकांच्या पथकातील पोलीस नाईक राहुल डोके, पोलीस कॉन्स्टेबल राहुल सारबंदे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता… पकडलेल्या आरोपींकडून शहरातील तसेच त्यांनी केलेल्या गुन्हेगारी घटनांची माहिती घेतली जात असून पुढील तपास सुरू आहे. आरोपींना न्यायालयासमोर हजर करून त्यांची अधिक चौकशी करण्यात येणार आहे. यामुळे शहरातील इतरही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. – रविंद्र देशमुख, पोलीस निरीक्षक, संगमनेर शहर पोलीस स्टेशन.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 3,082
गुन्हेगारी
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

बेकायदेशीर गॅस रिफिलींगच्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश; २१.८० लाखांच्या मुद्देमालासह १३३ टाक्या जप्त

19/09/2026

संगमनेरमधील वादग्रस्त ड्रग प्रकरण अखेर स्थानिक गुन्हे शाखेकडे; मात्र निर्दोषाला गोवणाऱ्या खाकी वर्दीतील ‘त्या’ अधिकाऱ्यावर कारवाई कधी?

18/09/2026

अवैध वाळू तस्करांवर एलसीबीचा दणका; ३० लाख ४० हजारांचा मुद्देमाल जप्त, ३ आरोपींना बेड्या

18/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
आंदोलन

वीज प्रश्नावर संगमनेर काँग्रेसचा ‘जनआक्रोश मोर्चा’; बाळासाहेब थोरातांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात जोरदार तयारी

By Annant Ppangarkar19/09/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – संगमनेर तालुक्यातील ग्रामीण भागात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने सुरू असलेला…

राज्यात सरसकट दुष्काळ जाहीर करा; माजी कृषिमंत्री बाळासाहेब थोरात यांची मागणी, रेल्वेप्रश्नी लोकप्रतिनिधीच्या बालिश वक्तव्यावरही केले भाष्य

19/09/2026

थोरात कारखान्याचे ११ लाख मेट्रिक टनाचे गाळप उद्दिष्ट; बॉयलर अग्नीप्रदीपन समारंभात बाळासाहेब थोरात यांचे आवाहन

19/09/2026

बेकायदेशीर गॅस रिफिलींगच्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश; २१.८० लाखांच्या मुद्देमालासह १३३ टाक्या जप्त

19/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.