Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

रविवार विशेष लेख — ज्ञानेशकुमारांचे समर्थक ढोंगी सत्यवान!

11/10/2026

दूध भेसळ प्रकरणी मुख्य आरोपीला सात दिवसांत अटकपूर्व जामीन मंजूर

11/10/2026

रविवार ११ ऑक्टोबर २०२६ — जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा असेल

11/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेरजवळ भीषण अपघात: स्लिपरकोच ट्रॅव्हल्स-ट्रक धडकेत तिघांचा मृत्यू, अनेक जखमी
अपघात

संगमनेरजवळ भीषण अपघात: स्लिपरकोच ट्रॅव्हल्स-ट्रक धडकेत तिघांचा मृत्यू, अनेक जखमी

रविवारी सकाळीच संगमनेरकरांसाठी दुःखद वार्ता समोर आली आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar15/06/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp
संगमनेर, प्रतिनिधी –
रविवारी सकाळीच संगमनेरकरांसाठी दुःखद वार्ता समोर आली आहे. सकाळी पावणे सात वाजण्याच्या दरम्यान कोल्हार घोटी राज्यमार्गावर कोकणगावजवळ स्लिपरकोच ट्रॅव्हल्स आणि आंब्याने भरलेल्या ट्रकची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला असून, सहा ते सात जण गंभीर जखमी झाले आहेत.
कोल्हार घोटी मार्गावरील हॉटेल भाग्यलक्ष्मीसमोर ही दुर्दैवी घटना घडली असून या अपघातात प्रवीण सोपान कांदळकर (वय २८, रा. सुकेवाडी, ता. संगमनेर), फिरोज लाला शेख (वय ४६, रा. कसारादुमाला, ता. संगमनेर) आणि अंजु प्रवीण वाल्मिकी (वय ३९, रा. पानिपत हरियाणा) या तिघांचा मृत्यू झाला आहे.
तर या अपघातात हर्षिता सोनू वाल्मिकी, बिराला पूनम, सोनिया रमेश बिर्ला, रिया अजय चावरीया (सर्व रा. मुंबई), मोहम्मद रफीक जलील शेख (रा. नाईकवाडपुरा, ता. संगमनेर) हे गंभीर जखमी झाले आहेत. दरम्यान जखमींची संख्या अधिक असून अन्य जखमींची नावे समजू शकली नाही. सर्व जखमींवर संगमनेर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अपघाताचा आवाज ऐकून परिसरातील नागरिक तात्काळ घटनास्थळी धावले. महामार्गावरून ये-जा करणाऱ्या लोकांनी आपली वाहने थांबवून जखमींना रुग्णालयात पोहोचविण्यास मदत केली. मात्र, तिघांचा जास्त रक्तस्राव झाल्याने उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. अपघाताची माहिती मिळताच संगमनेर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी घटनास्थळी पोहोचले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, एम. एच. ४६ सी. यु. २७५४ क्रमांकाची स्लिपरकोच ट्रॅव्हल्स संगमनेरहून शिर्डी आणि शनी शिंगणापूरकडे भाविकांना घेऊन जात होती. त्यात मोठ्या संख्येने भाविक होते, जे बहुतांश बाहेरगावांहून देवदर्शनासाठी आले होते. कोकणगाव परिसरात असताना, समोरून लोणीच्या दिशेने एम. एच. १२ एन. एक्स. १४५४ क्रमांकाचा आंब्याने भरलेला ट्रक भरधाव वेगाने येत होता. पावसाळा सुरू असल्याने रस्ता ओला होता. त्यामुळे, दोन्ही वाहनचालकांना वेगावर नियंत्रण ठेवता आले नाही आणि त्यांची समोरासमोर जोरदार धडक झाली. धडकेनंतर दोन्ही वाहने रस्त्याखाली फेकली गेली. ट्रकचालकाचा सहाय्यक जागीच ठार झाला, तर ट्रकमध्ये प्रवासी नसल्याने मोठी जीवितहानी टळली. अपघातातील वाहनांचे व आंब्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 4,825
अपघात कोकणगाव
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

पुणे-नाशिक महामार्गावरील चंदनापुरी घाटात आर्टिका इर्टिका कारचा भीषण अपघात; एका युवतीचा जागीच मृत्यू, चार प्रवासी गंभीर

08/10/2026

नाशिक-पुणे बायपासवर भीषण अपघात: बुलेटची कंटेनरला धडक, तरुणाचा मृत्यू

05/10/2026

माजी खासदारावर गुन्हा दाखल

01/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
रविवार विशेष

रविवार विशेष लेख — ज्ञानेशकुमारांचे समर्थक ढोंगी सत्यवान!

By Annant Ppangarkar11/10/20260

प्रवीण पुरो – देश एका वेगळ्या वळणावर असताना, या देशाचं सार्वभौमत्व संकटात आणणाऱ्या सरकारला आणि…

दूध भेसळ प्रकरणी मुख्य आरोपीला सात दिवसांत अटकपूर्व जामीन मंजूर

11/10/2026

रविवार ११ ऑक्टोबर २०२६ — जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा असेल

11/10/2026

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुक्यातील विविध रस्ते मजबुतीकरणासाठी ३ कोटी रुपयांचा निधी मंजूर; आमदार सत्यजित तांबे यांच्या पाठपुराव्याला यश

10/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.