Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आदिवासी बांधवांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश! आमदार खताळ सोडविणार शिरसगाव धुप्याचा पाणी, रस्ते, वीज प्रश्न

16/10/2026

घारगाव बहुचर्चित खून प्रकरणात मोठा ट्विस्ट! मुख्य आरोपीच्या जामीन अर्जावर न्यायालयाचा निर्णय… न्यायालयीन युक्तिवादात काय घडले वाचा सविस्तर

16/10/2026

शुक्रवार १६ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या

16/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » मंत्री विखे पाटलांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून म्हाळुंगी नदी पुलाचे लोकार्पण, चार वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पूल वाहतुकीसाठी सज्ज; विद्यार्थी, नागरिकांमध्ये आनंद
राजकारण

मंत्री विखे पाटलांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून म्हाळुंगी नदी पुलाचे लोकार्पण, चार वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पूल वाहतुकीसाठी सज्ज; विद्यार्थी, नागरिकांमध्ये आनंद

संगमनेर शहरातील साईनगर, पंपिंग स्टेशन, घोडेकर मळा भागातील नागरिक समस्या सोडवण्यासाठी आम्ही नेहमीच तत्पर आहोत.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar15/06/2025Updated:15/06/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर, प्रतिनिधी: 

शहरातील स्वामी समर्थ नगर ते संतोषी माता मंदिर दरम्यान म्हाळुंगी नदीवर नव्याने बांधण्यात आलेला पूल जनतेसाठी खुला करण्यात आला आहे. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून, आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते या पुलाचे लोकार्पण झाले. शाळा सुरू होण्याच्या पूर्वसंध्येला हा पूल वाहतुकीसाठी खुला झाल्याने विद्यार्थी आणि स्थानिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

चार वर्षांपूर्वी हा पूल कोसळल्याने विद्यार्थी आणि नागरिकांना प्रचंड गैरसोयीचा सामना करावा लागला होता. स्थानिक नागरिकांनी अनेकदा आंदोलने केल्यानंतर या पुलाच्या कामास सुरुवात झाली होती.

यावेळी बोलताना आमदार अमोल खताळ यांनी सांगितले की, पूर्वी या पुलाचे बांधकाम स्वर्गीय बाळासाहेब विखे पाटील यांच्या निधीतून झाले होते. काही वर्षांपूर्वी एका ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे हा पूल कोसळला. त्यानंतर महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी तत्कालीन महसूल मंत्री आणि विद्यमान जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे निधीसाठी पाठपुरावा केला. दोन वर्षांपूर्वी, त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशीच या पुलाच्या नव्या कामास मंजुरी मिळाली होती आणि आता पुन्हा त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशीच या नव्या पुलाचे लोकार्पण झाले, हा एक सकारात्मक योगायोग आहे 

म्हाळुंगी नदीचा पूल पडल्याने अनेक वर्षांपासून विद्यार्थ्यांना होणाऱ्या त्रासातून या पुलामुळे मुक्ती मिळाली आहे. आमदार खताळ यांनी दोन वेळा या पुलाची पाहणी करून ठेकेदारांना दर्जेदार कामासाठी सूचना दिल्या होत्या. अल्पावधीत हे बांधकाम पूर्ण करून नागरिकांसाठी पूल खुला करण्यात आला.

या लोकार्पण सोहळ्याला आमदार अमोल खताळ यांच्या पत्नी नीलम खताळ, नगर परिषदेचे मुख्याधिकारी रामदास कोकरे, महायुतीचे ज्ञानेश्वर कर्पे, शिरीष मुळे, अविनाश थोरात, कैलास लोणारी, कैलास वाकचौरे, रामभाऊ राहणे, संदीप देशमुख, सागर भोईर, अल्पना तांबे, उषा कपिले, कांचन ढोरे, कावेरी नवले, दिपाली वाव्हळ, रेखा गलांडे, पुनम अनाप, शिवसेनेचे शहर प्रमुख विनोद सूर्यवंशी, लखन घोरपडे, सौरभ देशमुख, शौकत जहागीरदार, आरपीआयचे (आठवले) शहराध्यक्ष कैलास कासार, संपत गलांडे, राहुल भोईर, शशांक नामन, सुशील शेवाळे, मुजफ्फर जहागीरदार, सुयोग गुंजाळ, तुषार ठाकूर, तसेच या पुलाचे बांधकाम करणारे ठेकेदार राऊत मामा, अजित गुंजाळ, गौतम शाह, शैलेश मंडलिक, जमशेद मिर्झा यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, साईनगर, घोडेकर मळा, पंपिंग स्टेशन परिसरातील नागरिक आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

‘आम्ही कायम जनतेसोबत’ –

“संगमनेर शहरातील साईनगर, पंपिंग स्टेशन, घोडेकर मळा भागातील नागरिक समस्या सोडवण्यासाठी आम्ही नेहमीच तत्पर आहोत. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सहकार्याने या भागात विकासाची कामे आणखी गतीने होणार आहेत. नागरिकांनी आमच्यावर विश्वास ठेवावा, आम्ही त्यांच्यासोबत आहोत.” – अमोल खताळ, आमदार.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 910
अमोल खताळ म्हाळुंगी पूल लोकार्पण
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

आदिवासी बांधवांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश! आमदार खताळ सोडविणार शिरसगाव धुप्याचा पाणी, रस्ते, वीज प्रश्न

16/10/2026

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत कधी मिळणार? आमदार अमोल खताळांनी दिली ही माहिती

13/10/2026

संगमनेर आगारात आणखी पाच इलेक्ट्रिक शिवाई बसेस; जिल्ह्यांतर्गत मार्गांवर धावणार

12/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

आदिवासी बांधवांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश! आमदार खताळ सोडविणार शिरसगाव धुप्याचा पाणी, रस्ते, वीज प्रश्न

By Annant Ppangarkar16/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर तालुक्यातील शिरसगाव धुपे येथील आदिवासी बांधवांनी आमदार अमोल खताळ यांच्या…

घारगाव बहुचर्चित खून प्रकरणात मोठा ट्विस्ट! मुख्य आरोपीच्या जामीन अर्जावर न्यायालयाचा निर्णय… न्यायालयीन युक्तिवादात काय घडले वाचा सविस्तर

16/10/2026

शुक्रवार १६ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या

16/10/2026

कर्ज वसुलीच्या नावाखाली संगमनेरात महिलेचा विनयभंग; आरोपीवर गुन्हा दाखल

15/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.