Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

प्रशासनाच्या नाकर्तेपणाचा बळी; अतिक्रमण आणि अवजड वाहनांविरोधात नागरिक रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत! सार्वजनिक बांधकाम विभागाला इशारा; रस्ता रुंदीकरण आणि वाहतूक नियंत्रणासाठी तीव्र आंदोलनाचा अल्टीमेटम

16/09/2026

बुधवार, १६ सप्टेंबर ___ जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल

16/09/2026

संगमनेरमध्ये बुधवारी रंगणार ७५० कलावंतांचे भव्य महावादन; ‘आय लव्ह संगमनेर’ चळवळीचा उपक्रम

15/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » दरोडेखोरांची टोळी जेरबंद: अहिल्यानगर आणि छत्रपती संभाजीनगर येथील गुन्हे उघड… स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; ३ लाखांचा मुद्देमाल जप्त, ५ आरोपी गजाआड
गुन्हेगारी

दरोडेखोरांची टोळी जेरबंद: अहिल्यानगर आणि छत्रपती संभाजीनगर येथील गुन्हे उघड… स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; ३ लाखांचा मुद्देमाल जप्त, ५ आरोपी गजाआड

या कारवाईमुळे अहिल्यानगर जिल्ह्यातील विळद येथील दरोड्याबरोबरच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गुन्हेही उघडकीस आले आहेत.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar17/06/2025No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

अहिल्यानगर, १७ जून – 

अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत दरोडा टाकणाऱ्या एका आंतरजिल्हा टोळीला जेरबंद केले आहे. या कारवाईमुळे अहिल्यानगर जिल्ह्यातील विळद येथील दरोड्याबरोबरच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गुन्हेही उघडकीस आले आहेत. पोलिसांनी ५ आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून ३ लाख ४ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

भैय्या कडू काळे (वय १८, रा. शिरोडी, ता. गंगापूर, जि. छत्रपती संभाजीनगर), ताराचंद विरूपन भोसले (वय ३५, रा. गाजगाव, ता. गंगापूर, जि. छत्रपती संभाजीनगर), किसन उर्फ विजय गौतम काळे (वय २३, रा. पानसवाडी, ता. नेवासा, जि. अहिल्यानगर), नागेश विरूपन भोसले (वय २०, रा. गाजगाव, ता. गंगापूर, जि. छत्रपती संभाजीनगर), सोनुल लक्षरी भोसले (वय १९, रा. बिडकीन, ता. पैठण, जि. छत्रपती संभाजीनगर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. 

आरोपींनी चौकशीदरम्यान आपले साथीदार बदाम कडू काळे, रघुवीर विरूपन भोसले आणि महेश नंदू काळे (सर्व फरार) यांच्यासोबत अहिल्यानगर जिल्ह्यातील विळद गावातील डोंगरमाथ्यावर मेंढपाळाच्या पालावर ५-६ दिवसांपूर्वी महिला व पुरुषांना मारहाण करून चोरी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी या आरोपींकडून १२ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, चार मोबाईल आणि दोन मोटारसायकली असा एकूण ३ लाख ४ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. पकडलेल्या आरोपीकडून आणखी काही गुन्हे उघडते सेनेचे शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

काय होती नेमकी घटना… ९ जून २०२५ रोजी पिंपरी घुमट, विळद (ता. अहिल्यानगर) येथील मेंढपाळ पोपट बन्सी होडगर (वय ३५) हे आपल्या कुटुंबासह शेतात झोपले असताना अज्ञात ६ ते ७ दरोडेखोरांनी त्यांच्यावर लाकडी दांडक्याने हल्ला केला. चाकूचा धाक दाखवून त्यांनी होडगर यांच्या पत्नीचे दागिने जबरदस्तीने चोरून नेले. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा (गु.र.नं. ४४७/२०२५, बीएनएस कलम ३१० (२), ३११) दाखल करण्यात आला होता.

या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी तात्काळ दखल घेतली. त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना या गुन्ह्याचा समांतर तपास करण्याचे आदेश दिले. आहेर यांनी उपनिरीक्षक तुषार धाकराव यांच्या नेतृत्वाखाली दत्तात्रय हिंगडे, बिरप्पा करमल, गणेश धोत्रे, अरुण गांगुर्डे, भगवान धुळे, गणेश लोंढे, शाहीद शेख, फुरकान शेख, बाळासाहेब नागरगोजे, सोमनाथ झांबरे, रवींद्र घुंगासे, आकाश काळे, भगवान थोरात, भाऊसाहेब काळे, सुनील मालणकर, रमीजराजा आत्तार, अमोल कोतकर, अमृत आढाव, प्रशांत राठोड, मेघराज कोल्हे, चंद्रकांत कुसळकर आणि अरुण मोरे यांचा समावेश असलेले विशेष पथक तयार केले. आरोपींचा शोध घेण्यासाठी पथके तात्काळ रवाना करण्यात आली.

१५ जून २०२५ रोजी हे पथक एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपींचा शोध घेत होते. त्यावेळी मिळालेल्या माहितीनुसार, किसन उर्फ विजय गौतम काळे (रा. पानसवाडी, ता. नेवासा, जि. अहिल्यानगर) याने आपल्या साथीदारांसह हा गुन्हा केला असून, चोरीचे सोने विकण्यासाठी ते मोटारसायकलवरून नेवासा मार्गे अहिल्यानगर येथील पांढरीपूल येथे येणार होते. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचला होता.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,000
अहिल्यानगर एलसीबी कारवाई
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

पोलीस प्रशासनाचा मोठा निर्णय, गणेशोत्सवादरम्यान ‘यांना’ संगमनेर व अकोले तालुक्यात प्रवेश बंदीचे आदेश जारी___वाचा यादी

15/09/2026

सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर संगमनेर उपविभागात पोलीस प्रशासनाची मोठी कारवाई; गुन्हेगारी पार्श्वभूमीचे सात जण जिल्ह्यातून हद्दपार

15/09/2026

मोठी कारवाई: तीन कुंटणखान्यांवर छापे, ८ महिलांची सुटका; तिघांवर गुन्हे दाखल

14/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
आंदोलन

प्रशासनाच्या नाकर्तेपणाचा बळी; अतिक्रमण आणि अवजड वाहनांविरोधात नागरिक रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत! सार्वजनिक बांधकाम विभागाला इशारा; रस्ता रुंदीकरण आणि वाहतूक नियंत्रणासाठी तीव्र आंदोलनाचा अल्टीमेटम

By Annant Ppangarkar16/09/20260

Annant Ppangarkar प्रतिनिधी | संगमनेर प्रशासनाच्या उघड्या डोळ्यांसमोर चाललेला कारभार आणि निष्काळजीपणामुळे संगमनेर शहरातील रस्ते…

बुधवार, १६ सप्टेंबर ___ जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल

16/09/2026

संगमनेरमध्ये बुधवारी रंगणार ७५० कलावंतांचे भव्य महावादन; ‘आय लव्ह संगमनेर’ चळवळीचा उपक्रम

15/09/2026

पोलीस प्रशासनाचा मोठा निर्णय, गणेशोत्सवादरम्यान ‘यांना’ संगमनेर व अकोले तालुक्यात प्रवेश बंदीचे आदेश जारी___वाचा यादी

15/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.