Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

बिबट्याच्या भीतीने शेततळ्यात पडून ११ वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू; जवळे कडलगमध्ये तीव्र संताप, माजी मंत्री बाळासाहेब थोरातांनी दुःख व्यक्त करत आर्थिक मदतीची केली मागणी

29/08/2026

संगमनेर पालिकेचा अनोखा उपक्रम! १ ते २५ सप्टेंबरदरम्यान होणार प्रभागनिहाय बैठका; नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे यांच्या पुढाकाराने नागरिकांच्या प्रश्नांना थेट व्यासपीठ

29/08/2026

स्थानिक गुन्हे शाखेकडून सराईत गुन्हेगाराला बेड्या

29/08/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचे संगमनेरमध्ये उत्साहात स्वागत, आमदार खताळ आणि अपर जिल्हाधिकारी कोळेकरांनी केले स्वागत
धार्मिक

निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचे संगमनेरमध्ये उत्साहात स्वागत, आमदार खताळ आणि अपर जिल्हाधिकारी कोळेकरांनी केले स्वागत

आमदार अमोल खताळ यांनी स्वतः पालखीतील बैलजोडीचा दोर धरून भक्तिभाव व्यक्त केला. त्यांनी गळ्यात वीणा घातला होता, तर त्यांच्या पत्नी नीलम डोईवर तुळशी वृंदावन घेऊन "विठ्ठल-नाम" च्या जयघोषात पायी चालत सहभागी झाल्या होत्या.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar17/06/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर, प्रतिनिधी –
“ज्ञानोबा माऊली तुकाराम” च्या गजरात संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या त्र्यंबकेश्वरहून पंढरपूरकडे निघालेल्या पायी दिंडीचे संगमनेर तालुक्यात सोमवारी संध्याकाळी उत्साहात स्वागत करण्यात आले. नाशिक जिल्ह्यातून अहिल्यानगर जिल्ह्यातील पारेगाव बुद्रुक येथील अश्विनाथ महाराज गडावर पालखी पोहोचताच, संगमनेरचे आमदार अमोल खताळ आणि प्रशासनाच्या वतीने शिर्डीचे अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर यांनी भक्तिमय वातावरणात पालखीचे पुष्पहार अर्पण करून स्वागत केले.
पारेगाव ग्रामस्थांनी पालखीवर जेसीबीतून पुष्पवृष्टी केली. आमदार अमोल खताळ यांनी स्वतः पालखीतील बैलजोडीचा दोर धरून भक्तिभाव व्यक्त केला. त्यांनी गळ्यात वीणा घातला होता, तर त्यांच्या पत्नी नीलम डोईवर तुळशी वृंदावन घेऊन “विठ्ठल-नाम” च्या जयघोषात पायी चालत सहभागी झाल्या होत्या.
यावेळी, निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळ्याचे प्रमुख ॲड. सोमनाथ घोटेकर यांच्या हस्ते आमदार अमोल खताळ आणि नीलम खताळ यांचा गुलाबपुष्प, श्रीफळ, संत निवृत्ती महाराज प्रतिमा आणि ज्ञानेश्वरी देऊन सन्मान करण्यात आला.
या प्रसंगी आमदार अमोल खताळ यांच्यासोबत शिर्डीचे अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर, श्रीरामपूर विभागाचे अपर पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्मे, संगमनेर उपविभागाचे प्रांताधिकारी अरुण उंडे, पोलीस उपाधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे, तहसीलदार धीरज मांजरे, गटविकास अधिकारी राजेंद्र ठाकूर, पोलीस निरीक्षक देविदास ढुमणे, तालुका आरोग्याधिकारी डॉ. सुरेश घोलप तसेच भाजप नेते भीमराज चत्तर, विठ्ठल घोरपडे, शिवसेना तालुकाध्यक्ष रामभाऊ राहणे, सरपंच संदीप देशमुख, साहेबराव घुगे, रावसाहेब गडाख, सुरेश दळवी, किशोर गडाख, गणेश गडाख, भाऊपाटील गडाख, अमोल दिघे, दत्तात्रय दिघे, गणेश संपत फड यांच्यासह महायुतीचे कार्यकर्ते, पारेगाव ग्रामस्थ, अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

वारकऱ्यांसाठी अडीच कोटींचा निधी…
मागील वर्षी वारकऱ्यांना आलेल्या अडचणी लक्षात घेता, या वर्षी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे जिल्हा नियोजनच्या बैठकीत निधीची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार, राज्य शासनाकडून जिल्हा नियोजन समितीमार्फत अडीच कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. या निधीतून वारकऱ्यांसाठी आरोग्य, निवास आणि इतर आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. पालखी प्रमुखांनीही शासनाच्या या प्रयत्नांबद्दल समाधान व्यक्त केले. – अमोल खताळ, आमदार.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 816
अमोल खताळ कुणाल सोनवणे बाळासाहेब कोळेकर संत निवृत्तीनाथ महाराज पालखी
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

अश्विनाथ गड हे सामाजिक एकतेचे प्रतीक : माजी मंत्री बाळासाहेब थोरात

27/08/2026

संगमनेरचा ईद ए मिलाद जुलूस शांततेत पार; आयोजक, नागरिक आणि पोलीस प्रशासनाचे कौतुक!

27/08/2026

आमदार खताळ यांच्या प्रयत्नांना यश; डोळासणे निवासी वीजजोडणीसाठी १० लाखांचा निधी मंजूर, प्रत्यक्ष कामालाही सुरुवात

26/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
दुर्दैवी

बिबट्याच्या भीतीने शेततळ्यात पडून ११ वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू; जवळे कडलगमध्ये तीव्र संताप, माजी मंत्री बाळासाहेब थोरातांनी दुःख व्यक्त करत आर्थिक मदतीची केली मागणी

By Annant Ppangarkar29/08/20260

Annat Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: संगमनेर तालुक्यातील जवळे कडलग येथे बिबट्याच्या भीतीने पळताना…

संगमनेर पालिकेचा अनोखा उपक्रम! १ ते २५ सप्टेंबरदरम्यान होणार प्रभागनिहाय बैठका; नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे यांच्या पुढाकाराने नागरिकांच्या प्रश्नांना थेट व्यासपीठ

29/08/2026

स्थानिक गुन्हे शाखेकडून सराईत गुन्हेगाराला बेड्या

29/08/2026

एलसीबीची छापेमारी, २.९९ लाखांचा मुद्देमाल जप्त करत १४ आरोपींवर गुन्हा दाखल

29/08/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.