Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

रविवार विशेष लेख – भगव्या देशा.. अनपढ देशा.. मोदींच्या देशा…

August 2, 2026

रविवार, ०२ ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

August 2, 2026

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे संगमनेर शहरात अद्यावत स्मारक उभारणार : माजी आमदार डॉ. सुधीर तांबे

August 1, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » पोलीस हवालदाराला लाच घेताना रंगेहाथ पकडले; दोघा पोलिसांसह तिघांवर गुन्हा दाखल
गुन्हेगारी

पोलीस हवालदाराला लाच घेताना रंगेहाथ पकडले; दोघा पोलिसांसह तिघांवर गुन्हा दाखल

रामदास सोनवणे हे लाचेच्या रकमेसह पळून गेले आणि त्यांनी पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला.
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरJune 18, 2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

अहिल्यानगर, १८ जून २०२५: 

पाथर्डी (अहिल्यानगर) येथील शिवनेरी मिसळच्या हॉटेल चालकाकडून मासिक हप्ता म्हणून १५०० रुपयांची लाच स्वीकारताना मंगळवारी नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) पाथर्डी पोलीस स्टेशनमधील पोलीस हवालदार लक्ष्मण सुखदेव पोटे (वय ३५) यांना रंगेहाथ पकडले. या प्रकरणी पोलीस नाईक रामदास जयराम सोनवणे आणि पोलीस कोठडीतील आरोपी राहुल शिवाजी साबळे (वय २२) यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांचे पाथर्डी येथे ‘शिवनेरी मिसळ’ नावाचे हॉटेल असून, ते रात्री १० नंतरही सुरू असते. यावरून कारवाई न करण्यासाठी पोलीस हवालदार लक्ष्मण पोटे यांनी तक्रारदाराकडे मासिक २००० रुपये हप्त्याची मागणी केली होती. याबाबत तक्रारदाराने १५ जून २०२५ रोजी नाशिक एसीबीकडे तक्रार केली. एसीबीने पडताळणी केली असता, लक्ष्मण पोटे यांनी तडजोड करून १५०० रुपये लाच स्वीकारण्यास सहमती दर्शविल्याचे समोर आले.

त्यामुळे १७ जून २०२५ रोजी सापळा रचण्यात आला. लक्ष्मण पोटे यांनी तक्रारदाराला पाथर्डी उपजिल्हा रुग्णालयात बोलावले होते, जिथे ते पोस्को कायद्यांतर्गत दाखल असलेल्या गुन्ह्यातील पोलीस कोठडीतील आरोपी राहुल शिवाजी साबळे याच्या वैद्यकीय तपासणीसाठी आले होते. तिथेच त्यांनी तक्रारदाराला लाचेची रक्कम राहुल साबळे याच्याकडे देण्यास सांगितले. राहुल साबळे याने लाचेची रक्कम असल्याचे माहीत असूनही ती स्वीकारली.

लाचेची रक्कम घेऊन राहुल साबळे आणि लक्ष्मण पोटे हे दुचाकीवरून पोलीस ठाण्याकडे येत असताना, रस्त्यात एका चहाच्या टपरीवर त्यांनी ती रक्कम पोलीस नाईक रामदास जयराम सोनवणे यांच्याकडे दिली. रामदास सोनवणे हे लाचेच्या रकमेसह पळून गेले आणि त्यांनी पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला.

या प्रकरणी पाथर्डी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एसीबीने लक्ष्मण पोटे यांना ताब्यात घेतले असून, त्यांचा मोबाईल फोन आणि राहुल साबळे यांचे कपडे जप्त केले आहेत. तसेच, पुढील तपास सुरू आहे.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 697
लाचखोरी लाचलुचपत
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

संगमनेर तालुक्यात लपून-छपून उरकला बालविवाह; ५ जणांवर घारगाव पोलिसांत गुन्हा

July 30, 2026

कचरा वेचण्याच्या बहाण्याने ‘रेकी’; बंद घरे गाठून घरफोडी करणाऱ्या दोन महिला जेरबंद

July 25, 2026

संघटित गुन्हेगारीविरोधात मोठे पाऊल; गोवंश तस्करीप्रकरणी ‘बीएनएस’ कलम १११ अन्वये दोघांवर पहिली मोठी कारवाई संगमनेरात

July 24, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
विश्लेषण

रविवार विशेष लेख – भगव्या देशा.. अनपढ देशा.. मोदींच्या देशा…

By अनंत पांगारकरAugust 2, 20260

प्रवीण पुरो  केंद्र सरकारच्या नव्या शिक्षण अभियानांतर्गत शैक्षणिक व्यवस्थेत करण्यात आलेल्या बदलाचे विपरीत आणि दीर्घकालीन…

रविवार, ०२ ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

August 2, 2026

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे संगमनेर शहरात अद्यावत स्मारक उभारणार : माजी आमदार डॉ. सुधीर तांबे

August 1, 2026

‘कडलग इन्व्हेस्टमेंट’च्या आर्थिक साक्षरता कार्यशाळेला गुंतवणूकदारांचा प्रतिसाद

August 1, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.