Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

प्रशासनाच्या नाकर्तेपणाचा बळी; अतिक्रमण आणि अवजड वाहनांविरोधात नागरिक रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत! सार्वजनिक बांधकाम विभागाला इशारा; रस्ता रुंदीकरण आणि वाहतूक नियंत्रणासाठी तीव्र आंदोलनाचा अल्टीमेटम

16/09/2026

बुधवार, १६ सप्टेंबर ___ जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल

16/09/2026

संगमनेरमध्ये बुधवारी रंगणार ७५० कलावंतांचे भव्य महावादन; ‘आय लव्ह संगमनेर’ चळवळीचा उपक्रम

15/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेरमध्ये सेवानिवृत्त व्यक्तीला ‘CID’ असल्याचे भासवून लुटले; 65 हजारांची सोन्याची चैन लंपास
गुन्हेगारी

संगमनेरमध्ये सेवानिवृत्त व्यक्तीला ‘CID’ असल्याचे भासवून लुटले; 65 हजारांची सोन्याची चैन लंपास

गोसावी यांच्या तक्रारीवरून अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस शिपाई आशिष कुंडलिक आरवाडे पुढील तपास करत आहे
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar18/06/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर, प्रतिनिधी

आत्ताच आम्ही सात लाखाची चोरी पकडली असून तुमच्यावर आमचा संशय आहे, असे सांगत सेवानिवृत्त व्यक्तीला तिघांनी सीआयडी अधिकारी असल्याचे सांगून लुटण्यात आले. बनावट सीआयडी अधिकाऱ्यांनी या व्यक्तीकडील 65 हजार रुपये किमतीची सोन्याची चैन लंपास करण्याची घटना संगमनेर तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत नाशिक-पुणे महामार्गावर चौधरी ढाब्याजवळ घडली आहे.

14 जून 2025 रोजी सकाळी अकरा ते पावणे बारा वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता 2023 च्या कलम 303(2) आणि 3(5) अंतर्गत गुन्हा ( No. 0391/2025) दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, धार्मिक विधीसाठी गेलेले केशव नाथा गोसावी (वय 69, रा. सावित्रीबाई फुले चौक, गल्ली नं. 02 बटवाल मळा, ता. संगमनेर, जि. अहिल्यानगर) हे 14 जून रोजी सकाळी साडेदहा वाजता त्यांच्या प्लॅटिना मोटारसायकलवरून (MH 17 DF 8035) चंदनापुरी घाटातून पुणे-नाशिक हायवे रोडने येत असताना, चौधरी ढाब्याजवळ त्यांना तीन मोटारसायकलवरील अनोळखी इसमांनी थांबवले.

त्यापैकी एका इसमाने स्वतःला सीआयडी अधिकारी असल्याचे सांगत, “आत्ताच आम्ही सात लाखांची चोरी पकडली आहे, तुमच्यावर आमचा संशय आहे,” असे धमकावले.

त्यांनी गोसावी यांना मोटारसायकलची डिक्की उघडून दाखवण्यास सांगितले आणि त्यांच्या गळ्यातील सोन्याची चैन काढण्यास सांगितले, सोने गळ्यात घालून जायचे नाही असे ते म्हणाले. घाबरलेल्या गोसावी यांनी खिशातून रुमाल काढला. यावेळी आरोपींनी त्यांच्या खिशातील तंबाखूची पुडी, पाकीट आणि सोन्याची चैन रुमालात बांधली. त्यानंतर आरोपींनी रुमालातील वस्तू डिक्कीत ठेवण्यास सांगितले आणि गोसावी यांचे लक्ष विचलित करून सोन्याची चैन चोरून नेली. आरोपींनी गोसावी यांना “येथे थांबू नका” असे सांगून ते संगमनेर रोडने निघून गेले.

गोसावी पावणे बारा वाजता घरी पोहोचल्यानंतर त्यांनी डिक्कीतील रुमाल उघडला असता, त्यात इतर वस्तू होत्या; परंतु सोन्याची चैन नव्हती. गोसावी यांनी तात्काळ ही बाब घरच्यांना सांगितली. सीआयडी अधिकारी असल्याचे भासविणाऱ्यांनी “ओम” चे पेडल असलेली, अंदाजे साडेतीन तोळे वजनाची आणि 65,000 रुपये किमतीची सोन्याची साखळी लंपास केल्याचे त्यांच्या लक्षात आले.

या संदर्भात संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात गोसावी यांच्या तक्रारीवरून अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस शिपाई आशिष कुंडलिक आरवाडे पुढील तपास करत आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,836
बनावट सीआयडी लुटमार
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

पोलीस प्रशासनाचा मोठा निर्णय, गणेशोत्सवादरम्यान ‘यांना’ संगमनेर व अकोले तालुक्यात प्रवेश बंदीचे आदेश जारी___वाचा यादी

15/09/2026

सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर संगमनेर उपविभागात पोलीस प्रशासनाची मोठी कारवाई; गुन्हेगारी पार्श्वभूमीचे सात जण जिल्ह्यातून हद्दपार

15/09/2026

मोठी कारवाई: तीन कुंटणखान्यांवर छापे, ८ महिलांची सुटका; तिघांवर गुन्हे दाखल

14/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
आंदोलन

प्रशासनाच्या नाकर्तेपणाचा बळी; अतिक्रमण आणि अवजड वाहनांविरोधात नागरिक रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत! सार्वजनिक बांधकाम विभागाला इशारा; रस्ता रुंदीकरण आणि वाहतूक नियंत्रणासाठी तीव्र आंदोलनाचा अल्टीमेटम

By Annant Ppangarkar16/09/20260

Annant Ppangarkar प्रतिनिधी | संगमनेर प्रशासनाच्या उघड्या डोळ्यांसमोर चाललेला कारभार आणि निष्काळजीपणामुळे संगमनेर शहरातील रस्ते…

बुधवार, १६ सप्टेंबर ___ जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल

16/09/2026

संगमनेरमध्ये बुधवारी रंगणार ७५० कलावंतांचे भव्य महावादन; ‘आय लव्ह संगमनेर’ चळवळीचा उपक्रम

15/09/2026

पोलीस प्रशासनाचा मोठा निर्णय, गणेशोत्सवादरम्यान ‘यांना’ संगमनेर व अकोले तालुक्यात प्रवेश बंदीचे आदेश जारी___वाचा यादी

15/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.