Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

उसनवारीवरील कर्मचाऱ्यांना १० सप्टेंबरपर्यंत मूळ विभागात पाठवा; मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर मुख्य सचिवांचे कडक आदेश

25/08/2026

‘कर्माकडून कृतार्थतेकडे’ जाण्यासाठी प्रत्येक कृतीत ईश्वरभाव जागवा: डॉ. संजय मालपाणी

25/08/2026

पोलिसांची गुटख्याविरोधात मोठी कारवाई; सिनेस्टाईल पाठलाग करून ५१ लाखांचा मुद्देमाल जप्त

25/08/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » 21 जूनला संगमनेरमध्ये भव्य योग दिनाचे आयोजन: डॉ. जयश्री थोरात
आरोग्य

21 जूनला संगमनेरमध्ये भव्य योग दिनाचे आयोजन: डॉ. जयश्री थोरात

या भव्य योग शिबिरात शहर व तालुक्यातील सर्व युवक, कार्यकर्ते, पदाधिकारी, महिला व नागरिक यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar19/06/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

गुरुवार, 19 जून- संगमनेर : 

धावपळीच्या जीवनात उत्तम आरोग्यासाठी योगाचे महत्त्व अनमोल आहे. याच विचाराने एकविरा फाउंडेशन, सह्याद्री विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, आणि जयहिंद लोकचळवळ यांच्यावतीने शनिवारी, 21 जून 2025 रोजी सकाळी साडेसात वाजता सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुलात भव्य योग दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. ही माहिती कॅन्सरतज्ज्ञ डॉ. जयश्री थोरात यांनी दिली.

युवक काँग्रेसच्या अध्यक्ष डॉ. जयश्री थोरात यांनी सांगितले की, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली एकविरा फाउंडेशन महिलांच्या आरोग्य आणि सबलीकरणासाठी सातत्याने विविध उपक्रम राबवत आहे. 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन असल्याने या निमित्ताने सकाळी साडेसात ते साडेआठ या वेळेत हे भव्य योग शिबिर आयोजित केले आहे.

या शिबिरात माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे आणि आमदार सत्यजित तांबे सहभागी होणार आहेत. तसेच, सह्याद्री विद्यालय व ज्युनिअर कॉलेजमधील सुमारे 2000 विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, आणि संगमनेर शहर व तालुक्यातील महिला, युवक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.

डॉ. थोरात यांनी आरोग्याचे महत्त्व अधोरेखित करताना सांगितले की, प्रत्येक जण व्यस्त असला तरी आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये. आरोग्यासाठी प्रत्येकाने थोडा वेळ काढणे आवश्यक आहे. योगामुळे काम करण्यासाठी ऊर्जा आणि उत्साह मिळतो. विशेषतः कुटुंबातील इतरांच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या महिलांना या योग शिबिरातून नक्कीच उत्साह आणि ऊर्जा मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

या भव्य योग शिबिरात शहर व तालुक्यातील सर्व युवक, कार्यकर्ते, पदाधिकारी, महिला व नागरिक यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन एकविरा फाउंडेशन, सह्याद्री विद्यालय व ज्युनिअर कॉलेज आणि जयहिंद लोकचळवळ यांच्यावतीने करण्यात आले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 573
डॉ. जयश्री थोरात योग दिन योगा
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयातील ढिसाळ कारभारावर शिवसेना शहरप्रमुख विनोद सूर्यवंशी आक्रमक; आंदोलनाचा इशारा

19/07/2026

मध्यरात्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे रुग्णालयात दाखल; आगामी दौरे आणि कार्यक्रम तूर्तास पुढे ढकलले

04/07/2026

केमिकलयुक्त दूषित पाण्यामुळे बदापूर येथील शेती धोक्यात; विहिरींचे पाणी दूषित, तलावातील मासे मृत

11/06/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
प्रशासन

उसनवारीवरील कर्मचाऱ्यांना १० सप्टेंबरपर्यंत मूळ विभागात पाठवा; मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर मुख्य सचिवांचे कडक आदेश

By Annant Ppangarkar25/08/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन  विशेष प्रतिनिधी / मुंबई: मंत्रालयातील प्रशासकीय कामकाजाची शिस्त आणि…

‘कर्माकडून कृतार्थतेकडे’ जाण्यासाठी प्रत्येक कृतीत ईश्वरभाव जागवा: डॉ. संजय मालपाणी

25/08/2026

पोलिसांची गुटख्याविरोधात मोठी कारवाई; सिनेस्टाईल पाठलाग करून ५१ लाखांचा मुद्देमाल जप्त

25/08/2026

संगमनेरमध्ये सह्याद्री कॉलेज शेजारील ‘बर्गेज कॅफे’वर पोलिसांची धाड; अश्लील चाळ्यांसाठी जागा पुरवणाऱ्या चालकावर गुन्हा दाखल

25/08/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.