Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

सोमवार २१ सप्टेंबर — जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

21/09/2026

जेष्ठ पत्रकार विनोद बूब यांचे पुणे येथे निधन; उद्या संगमनेर येथे अंत्यसंस्कार

20/09/2026

रविवार विशेष लेख — नाकर्त्या राज्यकर्त्यांचा बहुभाषिक महाराष्ट्र

20/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » मुळा नदी पाणलोट क्षेत्रात मान्सूनची दमदार बॅटिंग: आंबीत पाठोपाठ पिंपळगाव खांड धरण ओव्हरफ्लो!
महाराष्ट्र संवाद विशेष

मुळा नदी पाणलोट क्षेत्रात मान्सूनची दमदार बॅटिंग: आंबीत पाठोपाठ पिंपळगाव खांड धरण ओव्हरफ्लो!

ओढे-नाले सक्रिय झाल्याने मुळा नदीचा प्रवाह आणखी वाढला आहे, यामुळे पिंपळगाव खांड धरणात पाण्याची मोठी आवक झाली.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar19/06/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

गुरुवार १९ जून, – अकोले: 

मुळा नदीच्या पाणलोट क्षेत्रात मान्सून सक्रिय झाल्यामुळे अकोले तालुक्यात उत्साहाचं वातावरण आहे. तालुक्यात मंगळवारपासून पावसाने जोरदार हजेरी लावली असून, बुधवारी रात्रभर झालेल्या संततधार पावसामुळे मुळा नदी दुथडी भरून वाहत आहे. यामुळे, आंबीत धरणानंतर आता मुळा नदीवरील पिंपळगाव खांड धरण आज (गुरुवारी) पहाटे साडेपाच वाजता पूर्ण क्षमतेने भरून ओसंडून वाहू लागले आहे. 

पिंपळगाव खांड धरणातून पाण्याचा प्रवाह आता मुळा धरणाकडे वेगाने झेपावला आहे. मुळा नदीच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून पावसाची दमदार बॅटिंग सुरू आहे. या जोरदार पावसामुळे मुळा नदीची पाणी पातळी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. ६०० दशलक्ष घनफूट (दलघफू) क्षमतेचे पिंपळगाव खांड धरण पूर्ण भरल्याने परिसरातील शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

या वर्षीच्या पावसाळ्यात भरलेले हे अकोले तालुक्यातील दुसरे धरण आहे. यापूर्वी, मुळा नदीच्या उगमावर असलेले १९३ दशलक्ष घनफूट क्षमतेचे आंबीत धरण २७ मे २०२५ रोजी दुपारी १ वाजता ओव्हरफ्लो झाले होते. जिल्ह्यामध्ये सर्वात प्रथम भरलेले हेच धरण होते. आता पिंपळगाव खांड धरण भरल्याने मुळा नदीच्या पाण्याची पातळी आणखी वाढली आहे.

मान्सूनच्या या दमदार बॅटिंगमुळे अकोले तालुक्यातील सह्याद्रीच्या डोंगररांगा आता पूर्णपणे ओल्याचिंब झाल्या आहेत. यामुळे आता पर्यटकांचीही तालुक्यात गर्दी होण्याची चिन्हे आहेत. ओढे-नाले सक्रिय झाल्याने मुळा नदीचा प्रवाह आणखी वाढला आहे, यामुळे पिंपळगाव खांड धरणात पाण्याची मोठी आवक झाली. आजही पावसाचे सातत्य टिकून असल्यामुळे मुळा नदीचा प्रवाह असाच कायम राहण्याची शक्यता आहे.

सध्या पिंपळगाव खांड धरणातून वेगाने पाणी मुळा धरणाकडे सोडले जात आहे. यामुळे, मुळा नदीवर राहुरी तालुक्यात असलेल्या २६ टीएमसी (दशलक्ष घनमीटर) क्षमतेच्या मुळा धरणात आता पाण्याची आवक सुरू होणार आहे, त्यामुळे मुळा धरणाची पाणी पातळी वाढण्यास मदत होईल.

अकोले तालुक्यातील आंबीत धरणापाठोपाठ पिंपळगाव खांड धरण भरल्याने यंदाच्या पावसाळ्यात तालुक्यातील हे दुसरे धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. मुळा नदी पुन्हा वाहती झाल्यामुळे संगमनेर आणि अकोले तालुक्यातील मुळा नदीच्या लाभक्षेत्रात आनंद व्यक्त होत आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 716
ओव्हर फ्लो पिंपळगाव खांड धरण
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

गाजलेल्या गीतांचा नजराणा संगमनेरकरांना ‘दिल से’ आवडला! ‘संगमनेर फेस्टिव्हल’चा दुसरा दिवस; रहेमान म्युझिकने गाजवला

18/09/2026

संगमनेरमध्ये बुधवारी रंगणार ७५० कलावंतांचे भव्य महावादन; ‘आय लव्ह संगमनेर’ चळवळीचा उपक्रम

15/09/2026

माजी मंत्री थोरात आणि डॉ. तांबे यांनी घेतली पद्मभूषण अण्णा हजारे यांची भेट; प्रकृतीची केली चौकशी

13/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

सोमवार २१ सप्टेंबर — जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

By Annant Ppangarkar21/09/20260

मेष- आजचा दिवस तुमच्यासाठी प्रगतीचे नवीन मार्ग उघडणारा ठरेल. कार्यक्षेत्रात तुमच्या मेहनतीचे चीज होईल आणि…

जेष्ठ पत्रकार विनोद बूब यांचे पुणे येथे निधन; उद्या संगमनेर येथे अंत्यसंस्कार

20/09/2026

रविवार विशेष लेख — नाकर्त्या राज्यकर्त्यांचा बहुभाषिक महाराष्ट्र

20/09/2026

आज रविवार, २० सप्टेंबर — जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा असेल

20/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.