महाराष्ट्र संवाद न्यूज- 

गृहपाठाच्या बहाण्याने एका ८ वर्षीय विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याप्रकरणी ५४ वर्षीय शिक्षकाला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीवर विनयभंग आणि बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण (पोक्सो) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीडित मुलीच्या आईने कांजूरमार्ग पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, शुक्रवारी (२० जून) सायंकाळी पीडित मुलगी शाळेतून घरी परतल्यावर रडू लागली. आईने विचारणा केली असता, गणिताच्या तासाला शिक्षकाने स्वाध्याय आणि गणिताचे प्रश्न सोडवण्याच्या बहाण्याने तिच्याशी अश्लील कृत्य केल्याचे तिने सांगितले.

या घटनेचे गांभीर्य लक्षात घेत, कांजूरमार्ग पोलिसांनी तात्काळ भारतीय न्याय संहिता कलम ७५ आणि पोक्सो कायद्याच्या कलम ८ व १२ अंतर्गत गुन्हा दाखल केला. त्यानंतर शनिवारी (२१ जून) आरोपी शिक्षकाला अटक करण्यात आली. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Share.
Leave A Reply