Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

प्रशासनाच्या नाकर्तेपणाचा बळी; अतिक्रमण आणि अवजड वाहनांविरोधात नागरिक रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत! सार्वजनिक बांधकाम विभागाला इशारा; रस्ता रुंदीकरण आणि वाहतूक नियंत्रणासाठी तीव्र आंदोलनाचा अल्टीमेटम

16/09/2026

बुधवार, १६ सप्टेंबर ___ जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल

16/09/2026

संगमनेरमध्ये बुधवारी रंगणार ७५० कलावंतांचे भव्य महावादन; ‘आय लव्ह संगमनेर’ चळवळीचा उपक्रम

15/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या आदेशानंतर संगमनेरमध्ये ‘त्या’ बहुचर्चित जुगार अड्ड्यावर छापा; १० जणांविरुद्ध गुन्हा, लाखोंचा मुद्देमाल जप्त
गुन्हेगारी

जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या आदेशानंतर संगमनेरमध्ये ‘त्या’ बहुचर्चित जुगार अड्ड्यावर छापा; १० जणांविरुद्ध गुन्हा, लाखोंचा मुद्देमाल जप्त

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिलेल्या आदेशांनंतर अवैध धंद्यांवर होणाऱ्या या कारवाईमुळे संगमनेरमधील गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवता येईल का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar23/06/2025Updated:23/06/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर, २३ जून – प्रतिनिधी: 

अहिल्यानगरचे जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी जिल्ह्यातील अवैध धंदे समूळ नष्ट करण्याचे आदेश दिल्यानंतर, संगमनेर शहर पोलिसांनी प्रवरा नदीकिनारी संगमनेर खुर्द गावच्या शिवारात सुरु असलेल्या एका मोठ्या जुगार अड्ड्यावर छापा टाकत १० जणांविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत रोख रक्कम, मोटारसायकली, मोबाईल फोन आणि जुगाराचे साहित्य असा एकूण ५,११,२००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

गेल्या काही दिवसांपासून संगमनेरमध्ये अवैध धंद्यांची चर्चा सुरू होती. विशेषतः, जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या पथकाने दोन दिवसांपूर्वीच संगमनेरमधील दोन मोठ्या मटका चालकांवर कारवाई केली होती. असे असतानाही, शहरात अवैध धंदे सर्रासपणे सुरू असल्याने, पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. अखेर, संगमनेर खुर्द मधील या बहुचर्चित जुगार अड्ड्यावर कारवाई झाल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त होत असले तरी शहरात जुगार अड्ड्यांसह सुरू असलेल्या अवैध धंद्यांकडे जिल्हा पोलिसांचे विशेष पथक काय कारवाई करते याकडे लक्ष लागले आहे.

पोलीस हवालदार आत्माराम दत्तात्रय पवार यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, रविवारी, (२२ जून) सायंकाळी सव्वा सहा वाजण्याच्या सुमारास संगमनेर खुर्द येथे सुरू असलेल्या एका पत्र्याच्या शेडमध्ये चालणाऱ्या ‘तिरट’ नावाच्या जुगार अड्ड्यावर संगमनेर पोलिसांनी छापा टाकला.

या छाप्यात पोलिसांनी २८,२००/- रुपये रोख रक्कम, ३,६५,०००/- रुपये किमतीच्या सहा दुचाकी, १,१८,०००/- रुपये किमतीचे नऊ मोबाईल फोन, आणि जुगाराचे साहित्य असा एकूण ५,११,२००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पोलिसांनी जुगार खेळणाऱ्या आणि खेळवणाऱ्या १० जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणी पोलिसांनी अनिल एकनाथ राक्षे (वय ४९, रा. संगमनेर खुर्द), शिवाजी छबु चव्हाण (वय ४२, रा. अकोले नाका, संगमनेर), शाम दामोधर बेल्हेकर (वय ४०, रा. साईमंदिराजवळ, संगमनेर), वाहीद अजिज पठाण (वय ३७, रा. सय्यद बाबा चौक, संगमनेर), राजेंद्र तुकाराम जोर्वेकर (वय ५२, रा. एकता नगर, घुलेवाडी), सुरज प्रताप कतारी (वय ३४, रा. कतारगल्ली, संगमनेर), संपत रमेश पवार (वय ४५, रा. संजय गांधीनगर, संगमनेर), तुळशीराम दादा वाळुंज (वय ६५, रा. कोल्हेवाडी), अक्षय पंढरीनाथ वाघमारे (वय २५, रा. संगमनेर), आणि अक्षय उर्फ मोबी कतारी (रा. कतारगल्ली, संगमनेर) या आरोपींना ताब्यात घेतले. हे सर्व आरोपी स्वतःच्या फायद्यासाठी तिरट नावाचा पत्त्यांचा जुगार खेळताना आणि खेळवताना आढळून आल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.

या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक समीर अभंग करत आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिलेल्या आदेशांनंतर अवैध धंद्यांवर होणाऱ्या या कारवाईमुळे संगमनेरमधील गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवता येईल का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,687
जुगार कारवाई
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

पोलीस प्रशासनाचा मोठा निर्णय, गणेशोत्सवादरम्यान ‘यांना’ संगमनेर व अकोले तालुक्यात प्रवेश बंदीचे आदेश जारी___वाचा यादी

15/09/2026

सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर संगमनेर उपविभागात पोलीस प्रशासनाची मोठी कारवाई; गुन्हेगारी पार्श्वभूमीचे सात जण जिल्ह्यातून हद्दपार

15/09/2026

मोठी कारवाई: तीन कुंटणखान्यांवर छापे, ८ महिलांची सुटका; तिघांवर गुन्हे दाखल

14/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
आंदोलन

प्रशासनाच्या नाकर्तेपणाचा बळी; अतिक्रमण आणि अवजड वाहनांविरोधात नागरिक रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत! सार्वजनिक बांधकाम विभागाला इशारा; रस्ता रुंदीकरण आणि वाहतूक नियंत्रणासाठी तीव्र आंदोलनाचा अल्टीमेटम

By Annant Ppangarkar16/09/20260

Annant Ppangarkar प्रतिनिधी | संगमनेर प्रशासनाच्या उघड्या डोळ्यांसमोर चाललेला कारभार आणि निष्काळजीपणामुळे संगमनेर शहरातील रस्ते…

बुधवार, १६ सप्टेंबर ___ जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल

16/09/2026

संगमनेरमध्ये बुधवारी रंगणार ७५० कलावंतांचे भव्य महावादन; ‘आय लव्ह संगमनेर’ चळवळीचा उपक्रम

15/09/2026

पोलीस प्रशासनाचा मोठा निर्णय, गणेशोत्सवादरम्यान ‘यांना’ संगमनेर व अकोले तालुक्यात प्रवेश बंदीचे आदेश जारी___वाचा यादी

15/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.