Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेरमधील वादग्रस्त ड्रग प्रकरण अखेर स्थानिक गुन्हे शाखेकडे; मात्र निर्दोषाला गोवणाऱ्या खाकी वर्दीतील ‘त्या’ अधिकाऱ्यावर कारवाई कधी?

18/09/2026

निष्क्रिय लोकांनी विकासावर बोलू नये; मुरूम-वाळूच्या पुढे न जाणाऱ्या लोकप्रतिनिधींवर बाळासाहेब थोरातांचा घणाघात

18/09/2026

गाजलेल्या गीतांचा नजराणा संगमनेरकरांना ‘दिल से’ आवडला! ‘संगमनेर फेस्टिव्हल’चा दुसरा दिवस; रहेमान म्युझिकने गाजवला

18/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची मोठी कारवाई: आरटीओ एजंट आणि मोटार वाहन निरीक्षक लाच प्रकरणी एसीबीच्या जाळ्यात
गुन्हेगारी

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची मोठी कारवाई: आरटीओ एजंट आणि मोटार वाहन निरीक्षक लाच प्रकरणी एसीबीच्या जाळ्यात

आरोपी संदीप ढोले यांनी राजू नागरे यांच्यासाठी लाचेची मागणी केल्याचे आणि नागरे यांनी ढोले यांना यासाठी मदत केल्याचे निष्पन्न झाले.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar26/06/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

अहिल्यानगर: 

छत्रपती संभाजीनगर येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयात (RTO) लाचखोरीचा प्रकार उघडकीस आला आहे. अहिल्यानगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) केलेल्या कारवाईत एका खाजगी एजंटसह एका मोटार वाहन निरीक्षक एसीबीच्या जाळ्यात अडकला आहे. तक्रारदाराकडून ओव्हरलोड कारवाई टाळण्यासाठी १८,००० रुपयांची लाच स्वीकारताना ही कारवाई करण्यात आली.

३३ वर्षीय तक्रारदार यांचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय आहे. त्यांच्याकडे आयशर कंपनीचे सहा चाकी वाहन असून, ते जालना ते मुंबई तुरीची डाळ आणि इतर कडधान्याची वाहतूक करतात. त्यांचे वाहन छत्रपती संभाजीनगरच्या हद्दीतून विनाअडथळा चालू देण्यासाठी आणि त्यांच्या वाहनावर ओव्हरलोडची कारवाई न करण्यासाठी छत्रपती संभाजीनगर येथील प्रादेशिक परिवहन कार्यालय (RTO) येथील खाजगी एजंट संदीप रामदास ढोले (वय ४२) यांनी २०,००० रुपये लाचेची मागणी केली होती.

लाचेची ही रक्कम राजू मुरलीधर नागरे (वय ३९, मोटार वाहन निरीक्षक, वर्ग-२) यांच्यासाठी मागण्यात आली होती. वाटाघाटीनंतर लाचेची रक्कम १८,००० रुपयांवर निश्चित करण्यात आली.

तक्रारदाराने या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अहिल्यानगर येथे तक्रार दाखल केली. एसीबीने २३ जून २०२५ रोजी लाचेच्या मागणीची पडताळणी केली. यात आरोपी संदीप ढोले यांनी राजू नागरे यांच्यासाठी लाचेची मागणी केल्याचे आणि नागरे यांनी ढोले यांना यासाठी मदत केल्याचे निष्पन्न झाले.

त्यानंतर, २४ जून २०२५ रोजी सापळा रचण्यात आला. या कारवाईदरम्यान आरोपी संदीप रामदास ढोले यांनी तक्रारदाराकडून १८,००० रुपये लाच स्वीकारली. मोटार वाहन निरीक्षक राजू मुरलीधर नागरे यांनी लाच स्वीकारण्यासाठी संदीप ढोले यांना प्रोत्साहन दिल्याचेही तपासात समोर आले आहे. लाचेची रक्कम तात्काळ हस्तगत करण्यात आली आहे. या प्रकरणी दोन्ही आरोपींविरुद्ध छत्रपती संभाजीनगर येथील वेदांतनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलीस निरीक्षक राजू आल्हाट यांच्या पथकाने ही कारवाई केली. या पथकात पोलीस हवालदार राधा खेमनर, पोलीस कॉन्स्टेबल रविंद्र निमसे, पोलीस नाईक चंद्रकांत काळे आणि चालक पोलीस हवालदार हारून शेख यांचा समावेश होता.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,242
RTO लाचखोरी लाचलुचपत
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेरमधील वादग्रस्त ड्रग प्रकरण अखेर स्थानिक गुन्हे शाखेकडे; मात्र निर्दोषाला गोवणाऱ्या खाकी वर्दीतील ‘त्या’ अधिकाऱ्यावर कारवाई कधी?

18/09/2026

अवैध वाळू तस्करांवर एलसीबीचा दणका; ३० लाख ४० हजारांचा मुद्देमाल जप्त, ३ आरोपींना बेड्या

18/09/2026

ओम ज्वेलर्स चोरी प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेकडून पर्दाफाश; तिघांना अटक, मिरजगाव येथील गुन्ह्याचीही उकल

16/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

संगमनेरमधील वादग्रस्त ड्रग प्रकरण अखेर स्थानिक गुन्हे शाखेकडे; मात्र निर्दोषाला गोवणाऱ्या खाकी वर्दीतील ‘त्या’ अधिकाऱ्यावर कारवाई कधी?

By Annant Ppangarkar18/09/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – संगमनेर शहरातील बहुचर्चित आणि वादग्रस्त ठरलेल्या एमडी ड्रग प्रकरणाला आता…

निष्क्रिय लोकांनी विकासावर बोलू नये; मुरूम-वाळूच्या पुढे न जाणाऱ्या लोकप्रतिनिधींवर बाळासाहेब थोरातांचा घणाघात

18/09/2026

गाजलेल्या गीतांचा नजराणा संगमनेरकरांना ‘दिल से’ आवडला! ‘संगमनेर फेस्टिव्हल’चा दुसरा दिवस; रहेमान म्युझिकने गाजवला

18/09/2026

कोकणातील गणेशोत्सवासाठी एसटी बसफेऱ्या वळवल्याने संगमनेरच्या ग्रामीण भागात प्रवाशांचे हाल; प्रशासनाविरोधात आंदोलनाचा इशारा

18/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.