Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेरातील ‘या’ मुख्य रस्त्याचे नशीब बदलणार! आमदार अमोल खताळ यांच्या प्रयत्नांना यश; १० कोटींचा मोठा निधी मंजूर

17/10/2026

संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक येथे नवरात्रोत्सवातील दांडिया कार्यक्रमादरम्यान तुफान राडा; दोन्ही बाजूंच्या परस्परविरोधी गुन्ह्यांत लोखंडी रॉड, चाकू आणि फायटरने जीवघेणा हल्ला

17/10/2026

महावितरण कर्मचाऱ्यांवर हल्ला आणि शासकीय कामात अडथळा आणल्याचा गंभीर गुन्हा ठरला फोल; संगमनेर कोर्टाकडून सर्व ५ आरोपींची निर्दोष मुक्तता!

17/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » आमदार साहेब, आधी माहिती घ्या, मग श्रेय घ्या! दुसऱ्यांच्या कामाचे श्रेय घेण्यात कोणता मोठेपणा? – ट्रक टर्मिनसवरून स्थानिक नागरिकांचा सवाल
राजकारण

आमदार साहेब, आधी माहिती घ्या, मग श्रेय घ्या! दुसऱ्यांच्या कामाचे श्रेय घेण्यात कोणता मोठेपणा? – ट्रक टर्मिनसवरून स्थानिक नागरिकांचा सवाल

तत्कालीन मुख्याधिकारी राहुल वाघ यांना फोन करून या कामाची सर्व माहिती विचारून घ्यावी, असा सल्लाही नागरिकांनी दिला आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar27/06/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp
संगमनेर, प्रतिनिधी – 
संगमनेर शहरात वर्दळीचा भाग असलेल्या पंचायत समिती जवळील गुंजाळ मळा परिसरात प्रस्तावित ट्रक टर्मिनसच्या कामावरून सध्या राजकारण तापले आहे. नवीन लोकप्रतिनिधींनी या कामाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न केल्याने गुंजाळ मळ्यातील नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. आधी या कामाची सविस्तर माहिती घ्यावी आणि मगच श्रेय घेण्याचा प्रयत्न करावा, असा थेट सवाल करत नागरिकांनी दुसऱ्यांच्या कामाचे श्रेय घेण्यात कोणता मोठेपणा आहे, असे म्हटले आहे.
स्थानिक नागरिक शुभम गुंजाळ आणि राहुल गुंजाळ यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे म्हटले आहे की, या ट्रक टर्मिनसचे काम मार्च २०२४ मध्ये नगरपरिषदेने निविदा प्रसिद्ध करून सुरू केले आहे. हे काम ‘भांडवली गुंतवणुकीतील राज्यांना विशेष सहाय्य योजने’ अंतर्गत निधी मिळवून सुरू झाले आहे. या कामासाठी निधी मिळवण्यासाठी कोणी पाठपुरावा केला, स्थानिक शेतकऱ्यांनी जमीन देण्यासाठी कशी मदत केली, आणि कामाची निविदा कधी निघाली, याविषयीची पूर्ण माहिती नवीन लोकप्रतिनिधींनी घेणे आवश्यक होते.
आमच्या परिसरातील ट्रक टर्मिनसची पाहणी करण्यासाठी नवीन लोकप्रतिनिधी आणि महायुतीचे काही कार्यकर्ते आले होते. पण, खरे तर त्यांनी हे काम कधी सुरू झाले, कोणी निधी मिळवला, याची आधी माहिती घ्यायला हवी होती.
संगमनेर शहरात वाहनांची संख्या वाढल्याने पार्किंगची मोठी समस्या निर्माण झाली आहे. यावर उपाय म्हणून नगरपालिकेने पंचायत समिती जवळील गुंजाळ मळा येथील जागेची निवड केली. यासाठी गुंजाळ बंधूंनी आपल्या जमिनी दिल्या. या जागेवर ‘रिझर्वेशन’ होते आणि स्थानिकांनी त्यासाठी मोठे सहकार्य केले.
नगरपालिकेने भांडवली गुंतवणुकीतील राज्यांना विशेष सहाय्य योजनेतील भाग-६ नागरी सुविधा योजनेंतर्गत या ट्रक टर्मिनससाठी निधी मिळवला. बांधकाम विभागाच्या जावक क्रमांक १४/१२६/२०२४ नुसार, १५ मार्च २०२४ रोजी या कामाची निविदा १६ मार्च २०२४ रोजी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली. या मोठ्या कामासाठी ५ कोटी ८४ लाख रुपयांच्या निधीची आवश्यकता होती. हा निधी मिळावा यासाठी शासन दरबारी कोणी पाठपुरावा केला, याची माहिती नवीन लोकप्रतिनिधींनी घेतली पाहिजे. त्यांना शंका असल्यास, त्यांनी तत्कालीन मुख्याधिकारी राहुल वाघ यांना फोन करून या कामाची सर्व माहिती विचारून घ्यावी, असा सल्लाही नागरिकांनी दिला आहे.
साहेब, दुसऱ्याच्या कामाचे श्रेय घेण्यात कोणता मोठेपणा आहे? असा थेट सवाल करत नागरिकांनी ज्याचे काम त्याचेच श्रेय त्याला दिले पाहिजे, अशी मागणी केली आहे. तसेच, कोणत्याही कामाची माहिती न घेता, केवळ राजकीय हेतूने ज्यांचा कामाशी संबंध नाही अशा पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन फोटोसेशन करणे, बातम्या देणे, आणि सोशल मीडियावर प्रसिद्धी करणे हे अत्यंत चुकीचे आहे, असेही गुंजाळ मळा परिसरातील नागरिक आणि महिलांनी म्हटले आहे. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 2,343
अमोल खताळ टीका ट्रक टर्मिनल
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेरातील ‘या’ मुख्य रस्त्याचे नशीब बदलणार! आमदार अमोल खताळ यांच्या प्रयत्नांना यश; १० कोटींचा मोठा निधी मंजूर

17/10/2026

संगमनेरात प्रशासनाविरोधात संतापाचा उद्रेक; यांचा ‘दिमाग और दफ्तर ठीक करो’ आंदोलनाचा इशारा

17/10/2026

आमदार सत्यजीत तांबे यांच्या प्रयत्नांना यश; संगमनेरच्या रस्ते विकासासाठी १० कोटींचा निधी मंजूर! बसस्थानक ते प्रवरापुलापर्यंतच्या रस्त्याचा होणार विकास; रुंदीकरणासह ड्रेनेज व्यवस्थेचाही समावेश

16/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

संगमनेरातील ‘या’ मुख्य रस्त्याचे नशीब बदलणार! आमदार अमोल खताळ यांच्या प्रयत्नांना यश; १० कोटींचा मोठा निधी मंजूर

By Annant Ppangarkar17/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर शहरातील अत्यंत महत्त्वाच्या आणि वर्दळीच्या रस्त्याच्या विकासाला अखेर मोठा वेग…

संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक येथे नवरात्रोत्सवातील दांडिया कार्यक्रमादरम्यान तुफान राडा; दोन्ही बाजूंच्या परस्परविरोधी गुन्ह्यांत लोखंडी रॉड, चाकू आणि फायटरने जीवघेणा हल्ला

17/10/2026

महावितरण कर्मचाऱ्यांवर हल्ला आणि शासकीय कामात अडथळा आणल्याचा गंभीर गुन्हा ठरला फोल; संगमनेर कोर्टाकडून सर्व ५ आरोपींची निर्दोष मुक्तता!

17/10/2026

संगमनेरात प्रशासनाविरोधात संतापाचा उद्रेक; यांचा ‘दिमाग और दफ्तर ठीक करो’ आंदोलनाचा इशारा

17/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.