Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेरमधील वादग्रस्त ड्रग प्रकरण अखेर स्थानिक गुन्हे शाखेकडे; मात्र निर्दोषाला गोवणाऱ्या खाकी वर्दीतील ‘त्या’ अधिकाऱ्यावर कारवाई कधी?

18/09/2026

निष्क्रिय लोकांनी विकासावर बोलू नये; मुरूम-वाळूच्या पुढे न जाणाऱ्या लोकप्रतिनिधींवर बाळासाहेब थोरातांचा घणाघात

18/09/2026

गाजलेल्या गीतांचा नजराणा संगमनेरकरांना ‘दिल से’ आवडला! ‘संगमनेर फेस्टिव्हल’चा दुसरा दिवस; रहेमान म्युझिकने गाजवला

18/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » प्रवाशांचे दुबई टूरचे स्वप्न अधुरेच: संगमनेरच्या ट्रॅव्हल एजन्सीकडून नाशिकच्या कंपनीला १० लाखांचा गंडा, बोगस विमान तिकिटे देऊन केली फसवणूक; गुन्हा दाखल
गुन्हेगारी

प्रवाशांचे दुबई टूरचे स्वप्न अधुरेच: संगमनेरच्या ट्रॅव्हल एजन्सीकडून नाशिकच्या कंपनीला १० लाखांचा गंडा, बोगस विमान तिकिटे देऊन केली फसवणूक; गुन्हा दाखल

या प्रकरणी 'माईल्सस्टोन हॉलिडेज' कंपनीचे संचालक तेजस शशिकांत वैष्णव, मधुमती शशिकांत वैष्णव आणि शशिकांत वैष्णव यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar27/06/2025Updated:27/06/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

 

संगमनेर, प्रतिनिधी: 

नाशिक येथील एका ट्रॅव्हल कंपनीला दुबईच्या टूरसाठी बनावट विमान तिकिटे देऊन तब्बल १० लाख रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी संगमनेर येथील ‘माईल्सस्टोन हॉलिडेज’ या ट्रॅव्हल एजन्सीचे संचालक संशयित आरोपी असून, त्यांच्याविरुद्ध नाशिक शहर सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे संगमनेरसह नाशिकमध्येही एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकच्या एका कंपनीने त्यांच्या ५० प्रवाशांसाठी दुबईच्या प्रवासाचे तिकीट काढण्यासाठी संगमनेरच्या ‘माईल्सस्टोन हॉलिडेज’ या कंपनीला १० लाख ८२ हजार ५०० रुपये दिले होते. मात्र, संगमनेरच्या या कंपनीने प्रवाशांना बनावट विमान तिकिटे देऊन त्यांची फसवणूक केली. प्रवाशांना मुंबई विमानतळावर प्रवेश नाकारण्यात आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. काही प्रवाशांना अस्तित्वात नसलेल्या पीएनआर क्रमांकाची बनावट तिकिटे देण्यात आली होती, तर काही तिकिटे काढल्यानंतर ती लगेच रद्द करण्यात आली. यामुळे नाशिकच्या कंपनीला आपली दुबई टूर तात्काळ रद्द करावी लागली.

या फसवणुकीमुळे नाशिकच्या कंपनीचे मोठे आर्थिक नुकसान झाले. त्यांना प्रवाशांना परतावा द्यावा लागला, तसेच टूरच्या आयोजनासाठी झालेला ९ लाखांचा इतर खर्चही वाया गेला. त्यामुळे एकूण १९ लाख ८२ हजार ५०० रुपयांचे नुकसान झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी ‘माईल्सस्टोन हॉलिडेज’ कंपनीचे संचालक तेजस शशिकांत वैष्णव, मधुमती शशिकांत वैष्णव आणि शशिकांत वैष्णव (सर्व रा. शक्तिमान टॉवर, बस स्थानकाजवळ, संगमनेर) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

नाशिक पोलिसांचे एक पथक या प्रकरणाच्या पुढील तपासासाठी लवकरच संगमनेरला येणार असल्याचे समजते. या घटनेमुळे ट्रॅव्हल एजंटची निवड करताना प्रवाशांनी योग्य ती खबरदारी घेणे आवश्यक असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 2,677
टूर कंपनी फसवणूक
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेरमधील वादग्रस्त ड्रग प्रकरण अखेर स्थानिक गुन्हे शाखेकडे; मात्र निर्दोषाला गोवणाऱ्या खाकी वर्दीतील ‘त्या’ अधिकाऱ्यावर कारवाई कधी?

18/09/2026

अवैध वाळू तस्करांवर एलसीबीचा दणका; ३० लाख ४० हजारांचा मुद्देमाल जप्त, ३ आरोपींना बेड्या

18/09/2026

ओम ज्वेलर्स चोरी प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेकडून पर्दाफाश; तिघांना अटक, मिरजगाव येथील गुन्ह्याचीही उकल

16/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

संगमनेरमधील वादग्रस्त ड्रग प्रकरण अखेर स्थानिक गुन्हे शाखेकडे; मात्र निर्दोषाला गोवणाऱ्या खाकी वर्दीतील ‘त्या’ अधिकाऱ्यावर कारवाई कधी?

By Annant Ppangarkar18/09/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – संगमनेर शहरातील बहुचर्चित आणि वादग्रस्त ठरलेल्या एमडी ड्रग प्रकरणाला आता…

निष्क्रिय लोकांनी विकासावर बोलू नये; मुरूम-वाळूच्या पुढे न जाणाऱ्या लोकप्रतिनिधींवर बाळासाहेब थोरातांचा घणाघात

18/09/2026

गाजलेल्या गीतांचा नजराणा संगमनेरकरांना ‘दिल से’ आवडला! ‘संगमनेर फेस्टिव्हल’चा दुसरा दिवस; रहेमान म्युझिकने गाजवला

18/09/2026

कोकणातील गणेशोत्सवासाठी एसटी बसफेऱ्या वळवल्याने संगमनेरच्या ग्रामीण भागात प्रवाशांचे हाल; प्रशासनाविरोधात आंदोलनाचा इशारा

18/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.