Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडून घुलेवाडीच्या पायी ज्योतीचे स्वागत; नवरात्रोत्सव हा शक्ती, भक्ती आणि चैतन्याचा उत्सव असल्याचे प्रतिपादन

11/10/2026

रविवार विशेष लेख — ज्ञानेशकुमारांचे समर्थक ढोंगी सत्यवान!

11/10/2026

दूध भेसळ प्रकरणी मुख्य आरोपीला सात दिवसांत अटकपूर्व जामीन मंजूर

11/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » दोन हजार रुपयांसाठी तरुणाची हत्या, दोघांना जन्मठेप!
न्यायालय

दोन हजार रुपयांसाठी तरुणाची हत्या, दोघांना जन्मठेप!

कोर्टासमोर व्हॉइस सॅम्पल, मोबाइल लोकेशन आणि सीसीटीव्ही फुटेज यांसारखे ठोस पुरावे सादर केले. या पुराव्यांच्या आधारावरच न्यायालयाने आरोपींना दोषी ठरवले.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar29/06/2025Updated:29/06/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज – पुणे: 

रस्त्यावरून चाललेल्या एका तरुणाचे अपहरण करून, केवळ दोन हजार रुपयांसाठी त्याचा निर्घृण खून करणाऱ्या दोन आरोपींना न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणात ४० साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली, यामुळे आरोपींना शिक्षा होण्यास मदत झाली.

पुणे सत्र न्यायालयाचे न्यायाधीश जे. जी. डोरले यांनी हा महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. सुमित ऊर्फ सोन्या सुधीर काळे आणि अक्षय ऊर्फ भीमा बाळू दिवटे अशी शिक्षा झालेल्यांची नावे आहेत. जन्मठेपेसोबतच प्रत्येकाला सहा हजार रुपये दंडही ठोठावण्यात आला आहे. दंड न भरल्यास आणखी सहा महिने कारावास भोगावा लागेल, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

ही दुर्दैवी घटना १८ मार्च २०१७ रोजी सकाळी आठच्या सुमारास घडली होती. मृत तरुणाचे नाव रामअवतार बनवारीलाल जाटव (वय १९) असे आहे, तो मूळचा मध्य प्रदेशचा होता आणि पुण्यात बांधकामांच्या ठिकाणी फरशी बसवण्याचे काम करत होता.

घटनेच्या दिवशी आरोपी त्यांच्या दुचाकीवरून मार्केटयार्ड येथे जात असताना रामअवतार रस्त्यात आडवा आला. यामुळे त्यांची दुचाकी घसरली आणि ते खाली पडले. यावरून आरोपींनी रामअवतारकडे नुकसान भरपाईची मागणी केली. मात्र, त्याने नकार दिल्याने त्यांनी त्याला जबरदस्तीने दुचाकीवर बसवले आणि वनशिव वस्ती येथील एका मोकळ्या जागेत नेले.

तिथे त्यांनी रामअवतारच्या नातेवाइकांशी संपर्क साधला आणि त्याला सोडण्यासाठी दोन हजार रुपयांची मागणी केली. नातेवाइकांनी पैसे देण्यास नकार दिल्यावर आरोपींनी क्रौर्याची परिसीमा गाठली. त्यांनी संगनमत करून रामअवतारचा दोरीने गळा आवळला आणि त्याच्या डोक्यात दगड घालून त्याचा खून केला. त्यानंतर दोघेही घटनास्थळावरून पसार झाले.

पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेत आरोपींना तात्काळ अटक केली आणि त्यांच्याविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील वामन कोळी यांनी बाजू मांडली. त्यांनी कोर्टासमोर व्हॉइस सॅम्पल, मोबाइल लोकेशन आणि सीसीटीव्ही फुटेज यांसारखे ठोस पुरावे सादर केले. या पुराव्यांच्या आधारावरच न्यायालयाने आरोपींना दोषी ठरवले. न्यायालयीन कामकाजासाठी हवालदार गणेश तेळकर यांनी सरकार पक्षाला मोलाचे सहकार्य केले.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 688
अतिरिक्त व जिल्हा सत्र न्यायालय जन्मठेप
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

दूध भेसळ प्रकरणी मुख्य आरोपीला सात दिवसांत अटकपूर्व जामीन मंजूर

11/10/2026

३९ ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त, तरी आरोपीला जामीन! संगमनेर न्यायालयाच्या आदेशात नेमके काय?

09/10/2026

सायखिंडी फाटा गांजा तस्करीत आरोपींना पुन्हा १२ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कस्टडी; बँक खात्यांचे आर्थिक व्यवहार पोलिसांच्या रडारवर

09/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडून घुलेवाडीच्या पायी ज्योतीचे स्वागत; नवरात्रोत्सव हा शक्ती, भक्ती आणि चैतन्याचा उत्सव असल्याचे प्रतिपादन

By Annant Ppangarkar11/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर संगमनेर तालुक्यात विविध ठिकाणांहून देवीच्या पायी ज्योती आणण्याची धार्मिक…

रविवार विशेष लेख — ज्ञानेशकुमारांचे समर्थक ढोंगी सत्यवान!

11/10/2026

दूध भेसळ प्रकरणी मुख्य आरोपीला सात दिवसांत अटकपूर्व जामीन मंजूर

11/10/2026

रविवार ११ ऑक्टोबर २०२६ — जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा असेल

11/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.