Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेरमधील वादग्रस्त ड्रग प्रकरण अखेर स्थानिक गुन्हे शाखेकडे; मात्र निर्दोषाला गोवणाऱ्या खाकी वर्दीतील ‘त्या’ अधिकाऱ्यावर कारवाई कधी?

18/09/2026

निष्क्रिय लोकांनी विकासावर बोलू नये; मुरूम-वाळूच्या पुढे न जाणाऱ्या लोकप्रतिनिधींवर बाळासाहेब थोरातांचा घणाघात

18/09/2026

गाजलेल्या गीतांचा नजराणा संगमनेरकरांना ‘दिल से’ आवडला! ‘संगमनेर फेस्टिव्हल’चा दुसरा दिवस; रहेमान म्युझिकने गाजवला

18/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेरमध्ये अवैध कत्तलखान्यावर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा: 34.84 लाखांचा मुद्देमाल जप्त; स्थानिक पोलिसांचा हलगर्जीपणा उघड!
गुन्हेगारी

संगमनेरमध्ये अवैध कत्तलखान्यावर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा: 34.84 लाखांचा मुद्देमाल जप्त; स्थानिक पोलिसांचा हलगर्जीपणा उघड!

स्थानिक गुन्हे शाखेच्या या कारवाईमुळे संगमनेर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar30/06/2025Updated:30/06/2025No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर, अहिल्यानगर: 

अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेने संगमनेरच्या जमजम कॉलनीत एका पत्र्याच्या गोदामावर छापा टाकून 2700 किलो गोमांसासह एकूण 34 लाख 84 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. मात्र या कारवाईत देखील आरोपी नेहमीप्रमाणे फरार होण्यात यशस्वी झाले आहे. संगमनेर शहर आणि तालुका पोलीस अवैध कत्तलखान्यांवर नियंत्रण असल्याचा कितीही दावा करत असले तरी, स्थानिक गुन्हे शाखेने केलेल्या एका मोठ्या कारवाईमुळे त्यांचे पितळ उघडे पडले. संगमनेरातील गोवंश कत्तली राजरोसपणे सुरू असल्याचे आणि स्थानिक पोलिसांचा याकडे असलेला अक्षम्य हलगर्जीपणा पुन्हा एकदा यामुळे समोर आला आहे.

स्थानिक गुन्हे शाखा व तपास पथकातील पोलीस अंमलदार गणेश धोत्रे, अशोक लिपणे, सोमनाथ झांबरे, रणजीत जाधव, बाळासाहेब गुंजाळ, विशाल तनपुरे आणि इतर कर्मचाऱ्यांच्या पथकाला संगमनेर शहर पोलीस स्टेशन हद्दीत जमजम कॉलनीत हाजी मुदस्सर कुरेशी व नवाज जावेद कुरेशी हे त्यांच्या पत्र्याच्या गोदामात काही इसमांच्या मदतीने गोवंश जनावरांची कत्तल करत असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पथकाने तात्काळ सदर ठिकाणी छापा टाकला असता, तिथे 8 ते 9 इसम गोवंश जनावरांची कत्तल करताना आढळून आले. मात्र, पोलिसांची चाहूल लागताच हे संशयित आडोशाचा फायदा घेऊन पळून जाण्यात यशस्वी झाले.

घटनास्थळावरून पोलिसांनी एकूण 34 लाख 84 हजार 400 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये 2700 किलो गोमांस, 2 महिंद्रा बोलेरो पिकअप, 1 अशोक लेलंड कंपनीचा ‘बडा दोस्त’, 5 दुचाकी वाहने, 4 इलेक्ट्रिक वजनकाटे, लोखंडी सुरा, लोखंडी कुऱ्हाड आणि 2 मोबाईल फोन यांचा समावेश आहे.

या प्रकरणी, पथकाच्या कारवाईदरम्यान घटनास्थळावरून पळून गेलेले मुख्य संशयित आणि गोवंश कत्तलीच्या व्यवसायात गुंतलेल्या व्यक्तींची माहिती मिळवत त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झालेल्यामध्ये हाजी मुदस्सर कुरेशी (रा. संगमनेर, जि. अहिल्यानगर), नवाज जावेद कुरेशी (रा. संगमनेर, जि. अहिल्यानगर), फईम कुरेशी (पूर्ण नाव व पत्ता अज्ञात), अक्रम कुरेशी (पूर्ण नाव व पत्ता अज्ञात), समीर कुरेशी (पूर्ण नाव व पत्ता अज्ञात) आणि इतर 4 ते 5 अज्ञात इसमांचा समावेश आहे. या सर्व आरोपीविरोधात संगमनेर शहर पोलीस स्टेशनमध्ये गु.र.नं. 600/2025 बीएनएस कलम 271, 325, 3 (5) आणि महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम सन 1995 च्या सुधारित 2015 च्या कलम 5 (क), 9 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

स्थानिक गुन्हे शाखेच्या या कारवाईमुळे संगमनेर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नागरिकांमध्ये याबाबत तीव्र नाराजी व्यक्त होत असून, अवैध धंदे रोखण्यासाठी पोलिसांकडून अधिक कठोर कारवाईची मागणी होत आहे.

  • वारंवार कारवाईतून तेच-तेच आरोपी निष्पन्न, कारवाई शून्य… संगमनेर मधील बेकायदेशीर कत्तलखान्यांवर पोलिसांनी आतापर्यंत शेकड्याने कारवाया केल्या आहे. या  कारवाईमध्ये प्रत्यक्षात सापडणाऱ्या आरोपींची संख्या बोटावर मोजण्या एवढी असते. तर अनेकदा कारवाईदरम्यान आरोपी पळून गेल्याचे सांगितले जाते. मात्र दाखल होणाऱ्या गुन्ह्यांची पार्श्वभूमी बघता या कत्तलीच्या संदर्भातील गुन्ह्यांमध्ये वारंवार तेच तेच आरोपी निष्पन्न झाले आहे मात्र या आरोपींच्या मुसक्या आवळण्यात स्थानिक पोलिसांसह एलसीबी आणि पोलीस अधीक्षकांचे पथक देखील अपयशी ठरले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,289
अहिल्यानगर एलसीबी कत्तलखाना छापा
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेरमधील वादग्रस्त ड्रग प्रकरण अखेर स्थानिक गुन्हे शाखेकडे; मात्र निर्दोषाला गोवणाऱ्या खाकी वर्दीतील ‘त्या’ अधिकाऱ्यावर कारवाई कधी?

18/09/2026

अवैध वाळू तस्करांवर एलसीबीचा दणका; ३० लाख ४० हजारांचा मुद्देमाल जप्त, ३ आरोपींना बेड्या

18/09/2026

ओम ज्वेलर्स चोरी प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेकडून पर्दाफाश; तिघांना अटक, मिरजगाव येथील गुन्ह्याचीही उकल

16/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

संगमनेरमधील वादग्रस्त ड्रग प्रकरण अखेर स्थानिक गुन्हे शाखेकडे; मात्र निर्दोषाला गोवणाऱ्या खाकी वर्दीतील ‘त्या’ अधिकाऱ्यावर कारवाई कधी?

By Annant Ppangarkar18/09/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – संगमनेर शहरातील बहुचर्चित आणि वादग्रस्त ठरलेल्या एमडी ड्रग प्रकरणाला आता…

निष्क्रिय लोकांनी विकासावर बोलू नये; मुरूम-वाळूच्या पुढे न जाणाऱ्या लोकप्रतिनिधींवर बाळासाहेब थोरातांचा घणाघात

18/09/2026

गाजलेल्या गीतांचा नजराणा संगमनेरकरांना ‘दिल से’ आवडला! ‘संगमनेर फेस्टिव्हल’चा दुसरा दिवस; रहेमान म्युझिकने गाजवला

18/09/2026

कोकणातील गणेशोत्सवासाठी एसटी बसफेऱ्या वळवल्याने संगमनेरच्या ग्रामीण भागात प्रवाशांचे हाल; प्रशासनाविरोधात आंदोलनाचा इशारा

18/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.