Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुक्यातील विविध रस्ते मजबुतीकरणासाठी ३ कोटी रुपयांचा निधी मंजूर; आमदार सत्यजित तांबे यांच्या पाठपुराव्याला यश

10/10/2026

MPSC आंदोलनाला डॉ. जयश्रीताई थोरात यांचा पाठिंबा; समाज आणि आयोगातील ब्लड कॅन्सर ठीक करायचाय!

10/10/2026

आमदार अमोल खताळ यांनी वेधले ऊर्जा राज्यमंत्र्यांचे लक्ष; मेंढवन उपकेंद्राचे काम तातडीने सुरू करण्याची मागणी

10/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » निमजमध्ये खासगी रस्त्यासाठी अवैध मुरूम वाहतूक; तलाठ्याने पकडला ट्रॅक्टर नंतर घडले असं काही…
पत्रकारिता

निमजमध्ये खासगी रस्त्यासाठी अवैध मुरूम वाहतूक; तलाठ्याने पकडला ट्रॅक्टर नंतर घडले असं काही…

महसूल विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे संगमनेर तालुक्यातील नद्यांचे आणि जमिनीचे अक्षरशः लचके तोडले जात आहेत. राजकीय दबावामुळे कर्मचारी आणि अधिकारी कोणतीही कारवाई करत नसल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar01/07/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर, प्रतिनिधी: 

संगमनेर तालुक्यात गौण खनिज आणि वाळू तस्करीचे प्रमाण गेल्या काही महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात वाढले आहे. तालुक्यातील चारही दिशांना वाळू, मुरूम, खडी, डबर आणि मातीसारख्या गौण खनिजांची सर्रासपणे तस्करी सुरू आहे. निमज गावाच्या शिवारात खासगी रस्ता तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मुरूमाचा अवैध उपसा करून वापर केला जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. याची माहिती स्थानिक तलाठी यांना मिळाल्यानंतर, त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत एक ट्रॅक्टर ट्रॉलीसह ताब्यात घेतला. मात्र, कारवाई सुरू होताच जेसीबीसह इतर ट्रॅक्टर घटनास्थळावरून पसार झाल्याची माहिती मिळाली आहे.

महसूल विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे संगमनेर तालुक्यातील नद्यांचे आणि जमिनीचे अक्षरशः लचके तोडले जात आहेत. राजकीय दबावामुळे कर्मचारी आणि अधिकारी कोणतीही कारवाई करत नसल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे. कारवाई करताना सत्ताधारी आणि बिगर सत्ताधारी पुढाऱ्यांकडून महसूल कर्मचाऱ्यांवर दबाव येत असल्याचेही बोलले जात आहे.

सोमवारी निमज शिवारात मुरूम टाकून रस्ता तयार केला जात असल्याचे काही गावकऱ्यांच्या निदर्शनास आले. यासाठी जेसीबी आणि ट्रॅक्टर ट्रॉलीचा मोठ्या प्रमाणावर वापर सुरू होता. ग्रामस्थांनी याबाबत तलाठी फटांगरे यांना माहिती दिली. तलाठी फटांगरे घटनास्थळी पोहोचेपर्यंत जेसीबी आणि इतर ट्रॅक्टर पळून गेले होते. मात्र, रस्ता तयार करताना जमिनीत अडकलेला एक ट्रॅक्टर ट्रॉलीसह जागेवरच पकडण्यात आला. या ट्रॅक्टरला बाहेर काढताना आणखी एक ट्रॅक्टरही मिळून आला. तलाठी फटांगरे यांनी या ठिकाणी पंचनामा करून सर्व माहिती तहसील कार्यालयात कळवल्याचे सांगितले.

परवाना असल्याचा कांगावा, तरीही कारवाईचा पवित्रा- मुरूम उपसा करणाऱ्यांनी सत्ताधारी नेत्यांची नावे घेऊन तलाठी मंडलिक यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा आहे. ‘आमच्याकडे परवाना आहे,’ असा कांगावाही त्यांनी केला, मात्र कोणीही परवाना दाखवला नाही. सदर पंचनामा तहसील कार्यालयात सादर करण्यात आला असून, कागदपत्रांची शहानिशा करून संबंधितांवर कारवाई केली जाईल, असे तलाठी फटांगरे यांनी स्पष्ट केले आहे.

नागरिकांमध्ये तीव्र नाराजी- इतक्या मोठ्या प्रमाणात मुरूम तस्करीचा पंचनामा होऊनही, राजकीय दबावामुळे पकडलेला ट्रॅक्टर आणि जेसीबी अद्यापही तहसील कार्यालयात जमा न झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते, त्यांनीही या प्रकाराबद्दल संताप व्यक्त केला.

या घटनेमुळे संगमनेर तालुक्यातील अवैध गौण खनिज उत्खननाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. प्रशासनावर राजकीय दबावामुळे कारवाई होत नसल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. या प्रकरणात पुढील कारवाई कधी होणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 2,063
अवैध मुरूम वाहतूक गौण खनिज उत्खनन
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

जिल्हाधिकारी साहेब एकदा रस्त्यावर पायी फिराच! संगमनेरातील अतिक्रमण हटाव मोहीम दिखावा की केवळ समाधान?

05/08/2026

संगमनेरमध्ये रेशनच्या धान्याचा काळा बाजार? पोलीस अन् पुरवठा विभागाच्या संशयास्पद भूमिकेने संभ्रम!

05/08/2026

अतिक्रमणाच्या नावाखाली संगमनेरात गरिबांवर बुलडोझर, धनदांडग्यांवर मेहेरनजर; ‘सिंघम’ बनलेल्या प्रशासनाविरोधात नागरिकांचा संतप्त सवाल

19/07/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुक्यातील विविध रस्ते मजबुतीकरणासाठी ३ कोटी रुपयांचा निधी मंजूर; आमदार सत्यजित तांबे यांच्या पाठपुराव्याला यश

By Annant Ppangarkar10/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- भौगोलिकदृष्ट्या विस्ताराने मोठ्या असलेल्या संगमनेर तालुक्यातील ग्रामीण रस्त्यांचे जाळे अधिक भक्कम…

MPSC आंदोलनाला डॉ. जयश्रीताई थोरात यांचा पाठिंबा; समाज आणि आयोगातील ब्लड कॅन्सर ठीक करायचाय!

10/10/2026

आमदार अमोल खताळ यांनी वेधले ऊर्जा राज्यमंत्र्यांचे लक्ष; मेंढवन उपकेंद्राचे काम तातडीने सुरू करण्याची मागणी

10/10/2026

शनिवार १० ऑक्टोंबर — जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा असेल

10/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.